Wednesday, January 8, 2025

Actors Share Their Favorite Seasonal Drinks!

 

Actors Share Their Favorite Seasonal Drinks!


As winter’s chill embraces the nation, the season awakens a longing for warm, comforting beverages that bring a sense of coziness with every sip. To celebrate this cozy time of year, &TV artists including Aayudh Bhanushali (young Atal from Atal), Smita Sable (Dhaniya from Bheema), Yogesh Tripathi (Daroga Happu Singh from Happu Ki Ultan Paltan), and Shubhangi Atre (Angoori Bhabhi from Bhabiji Ghar Par Hai) share their favorite winter drinks, each infused with unique flavours and memories that make the season even more special. Aayudh Bhanushali, who plays young Atal in Atal, says, “Winter reminds me of my grandmother’s special ukado, a Gujarati herbal drink made with ajwain (carom seeds), ginger, black pepper, and jaggery. Not only does it keep me warm, but it’s also a powerful immune booster. Another favourite of mine is kesar shrikhand milk. The richness of saffron combined with the creamy shrikhand creates a velvety indulgence that’s perfect for chilly nights. And of course, I can’t forget my mom’s homemade bajra kanji, a fermented pearl millet drink. It’s a winter staple for me.”

Smita Sable, who portrays Dhaniya in Bheema, adds, “For me, winter isn’t complete without masala chai, a decadent Maharashtrian blend of milk, ginger, sugar, and cardamom. It’s the perfect drink for lazy winter days. I also adore solkadhi, made with coconut milk, tangy kokum, and a hint of spices. The soothing tanginess and subtle warmth make it a perfect match for hearty winter meals. These traditional drinks aren’t just beverages; they transport me back to festive family gatherings, where laughter and love fills the air.” Yogesh Tripathi, known as Daroga Happu Singh from Happu Ki Ultan Paltan, shares, “My winter favorite is bajre ki raab, a wholesome drink made with pearl millet flour, jaggery, and ghee. It’s not only delicious but also packed with nutrients, bringing back memories of cold nights in my hometown. Since moving to Mumbai, I’ve developed a fondness for hot chocolate. Served with cream on top, it’s a favorite treat of mine and my kids. Sharing these moments with them makes every sip even more special.” 

Shubhangi Atre, the beloved Angoori Bhabhi of Bhabiji Ghar Par Hai, says, “Winter is the perfect time to blend tradition with a modern twist. My go-to is garam masala chai, a spiced tea that feels like a warm hug. Coming from Indore, I also enjoy nimbu shikanji (warm lemon and honey water) during the season; it keeps me refreshed. My daughter’s love for experimenting introduced me to mulled pumpkin spice latte, which has become a family favourite for cozy evenings. To add an Indori touch to winter nights, I prepare warm dry fruit milk—a nutty delight that combines tradition with indulgence.”

Actor Pushkar Jog and actress Pooja Rathod will be seen in the song 'Byadi'

              Actor Pushkar Jog and actress Pooja Rathod will be seen in the song 'Byadi'


The teaser of actress Pooja Rathod's song 'Byadi' is out, the teaser goes viral on social media!



Actor Pushkar Jog, who has made a unique identity for himself with his acting in Marathi and Hindi films, and beautiful actress Pooja Rathod, who has appeared in Alyad Palyad films and Banjara songs, are soon coming to the audience with the Gavran love song 'Byadi' presented by 'We Are Music Station' in the new year. The duo has recently shared the teaser of the song Byadi on their social media. In the teaser of the song Byadi, actor Pushkar Jog and actress Pooja Rathod are seen in a retro look. Therefore, the teaser of the song has increased the excitement of the audience even more. Pushkar has previously worked on the reality show Bigg Boss Marathi as well as the television series Tu Tu Mai Mai, Vachan De Tu Mala, Aasaa Sundar Swapna Bangla and many Marathi Hindi films like Well Done Baby, Jaabud, Ti Aan Ti, Bapmanoos, Musafira. Actress Pooja Rathod is famous for her many Banjara songs like Sonero Bhuriya, Sokevalo Sado, Neelo Kalo Fetia. 'We Are Music Station' presents 'Bydi', the producer of the Gavran love song is Vishal Rathod. The director of the song is Abhijeet Dani. Famous singer Harshvardhan Vavare and singer Kasturi Vavare have sung this song. The music of this song is composed by Pritesh Mavale. The teaser of the song Bydi has recently been released on social media. Now the curiosity of the audience for this song is being seen

एकल नाट्यमहोत्सव उद्घाटन नाट्यप्रेमी , आमदार श्री महेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले...!

 एकल नाट्यमहोत्सव उद्घाटन  नाट्यप्रेमी , 

                               आमदार श्री महेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले...!                                     


अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सहयोगाने स्वामीराज प्रकाशन आयोजित एकल नाट्य महोत्सवाचे उद्घाटन आमदार महेश सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी सोबत नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे, कवी व प्राध्यापक अशोक बागवे, दिग्दर्शक मंगेश सातपुते, महोत्सवाचे सूत्रधार सुधीर चित्ते आणि स्वामीराज प्रकाशनाचे रजनीश राणे उपस्थित होते. यावेळी प्रा.अशोक बागवे यांच्या 'नाटयस्वधर्म' आणि अजितेम जोशी यांच्या 'स्मरण रंग' या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.‌

अभिनेत्री पर्ण पेठे आता ‘जिलबी’ चित्रपटात एका वेगळ्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे.

 पर्ण बनली रुबीना   

मालिका, नाटक चित्रपटांतून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री पर्ण पेठे आता ‘जिलबी’ चित्रपटात एका वेगळ्या व्यक्तिरेखेत  दिसणार आहे. पर्णने  आजवर साकारलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा ‘जिलबी’ चित्रपटातील रुबीना ही  मुस्लिम  मुलीची भूमिका खूपच वेगळी आहे. रुबिना अत्यंत कणखर आणि धाडसी मुलगी आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स निर्मित ‘जिलबी’ चित्रपट १७ जानेवारीला आपल्या भेटीला  येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी  केले  आहे.

अभिनेता स्वप्नील जोशी, प्रसाद ओक, शिवानी सुर्वे गणेश यादव, प्रणव रावराणे, अश्विनी चावरे, प्रियांका भट्टाचार्य या  कलाकारांच्या भूमिका ‘जिलबी’ चित्रपटात आहेत. या भूमिकेसाठी तिचा लूक वैशिष्ट्यपूर्ण आहे. आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना पर्ण सांगते, ‘मी खूप काही ठरवून असं करत नाही. कथेमध्ये, भूमिकेत काही वेगळेपण असेल, तर ते करायला आवडतं’. चांगल्या विषयामुळे मी या चित्रपटाला होकार दिला. माझ्या वेगवेगळ्या भूमिकांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला असून ‘जिलबी’ चित्रपटातील माझ्या या भूमिकेचं प्रेक्षक नक्कीच स्वागत करतील, असा विश्वास पर्ण व्यक्त करते. इतर जॉनरच्या चित्रपटांच्या तुलनेत मराठीमध्ये सस्पेन्स थ्रीलरपटांची संख्या फार कमी असून, ‘जिलबी’ हा चित्रपट त्यांची उणीव नक्की भरून काढणारा असेल, असे पर्ण  सांगते. 

‘जिलबी’ चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद मच्छिंद्र बुगडे यांचे आहेत. आनंद पंडित आणि रूपा पंडित हे निर्माते आहेत. क्रिएटिव्ह दिग्दर्शन आणि सहनिर्मितीची जबाबदारी राहुल व्ही. दुबे यांनी सांभाळली आहे. छायांकन गणेश उतेकर तर कलादिग्दर्शन कौशल सिंग यांचे आहे. कार्यकारी निर्माते महेश चाबुकस्वार आहेत.

हेमाचा बोल्ड अँड ब्युटीफुल अंदाज आपल्याला आगामी ‘इलू इलू’ या मराठी चित्रपटात दिसणार आहे.

 ‘इलू इलू’ चित्रपटात दिसणार हटके अंदाजात

हेमाचा बोल्ड अँड  ब्युटीफुल अंदाज  आपल्याला आगामी ‘इलू इलू’ या  मराठी  चित्रपटात दिसणार आहे.

आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने कायम चर्चेत राहणारी ‘बिग बॉस मराठी’ गाजवणारी अभिनेत्री मीरा जगन्नाथ आता हेमा बनून प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवायला सज्ज झाली आहे. हेमाचा बोल्ड अँड  ब्युटीफुल अंदाज  आपल्याला आगामी ‘इलू इलू’ या  मराठी  चित्रपटात दिसणार आहे. मीराचं दिलखेचक पोस्टर सध्या सोशल  मीडियावर चर्चेत आहे. फाळके फिल्म्स एण्टरटेन्मेंट प्रॉडक्शन आणि अजिंक्य बापू फाळके दिग्दर्शित ‘इलू इलू’ ३१ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.


‘आजवरच्या माझ्या भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका मला ‘इलू इलू’च्या निमित्ताने करायला मिळाली  याचा आनंद असून हेमा देसाई ही व्यक्तिरेखा मी स्वतः खूप एन्जॉय केली. पूर्णपणे नवं असं काहीतरी करून दाखवण्याचा माझा प्रयत्न होता. हेमा देसाई या भूमिकेच्या निमित्ताने मला ती संधी मिळाल्याचं  मीरा  सांगते.  

‘इलू इलू’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद नितीन विजय सुपेकर यांचे आहेत. निर्माते बाळासाहेब फाळके आणि हिंदवी फाळके तर सहनिर्माते यश मनोहर सणस आहेत.  छायांकन योगेश कोळी तर संकलन नितेश राठोड यांचे आहे. वैभव जोशी, वैभव देशमुख, प्रशांत मडपुवार यांच्या गीतांना अवधूत गुप्ते, ऋषिकेश रानडे, आर्या आंबेकर, रोहित राऊत, जनार्दन खंडाळकर यांचा स्वरसाज लाभला आहे. संगीत रोहित नागभिडे, विजय गवंडे  यांचे आहे. कलादिग्दर्शक योगेश इंगळे आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये संपन्न झाला ‘मिशन अयोध्या'चा दैदिप्यमान ट्रेलर लॉंच सोहळा संपन्न!

 छत्रपती संभाजीनगरमध्ये संपन्न झाला ‘मिशन अयोध्या'चा दैदिप्यमान ट्रेलर लॉंच सोहळा संपन्न!

संभाजीनगर(प्रतिनिधी) : अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला वर्षपूर्ती होण्याच्या पार्श्वभूमीवर प्रभू श्रीरामांची महिमा सांगणारा व विचार मांडणारा ‘मिशन अयोध्या' हा चित्रपट २४ जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. भारताचा इतिहास, संस्कृती आणि आध्यात्मिकतेचा अभूतपूर्व संगम असणारा आर. के. योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित आणि समीर सुर्वे दिग्दर्शित ‘मिशन अयोध्या' चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा महंत रामगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार, ७ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथे पार पडला.

आत्तापर्यंत चित्रपटांमध्ये हिंदू धर्मातील साधुसंतांना चुकीच्या पद्धतीने चित्रित केले गेले. त्याच पद्धतीने मुस्लिम धर्मगुरु किंवा ख्रिश्चन धर्मगुरु विरोधात असे दाखवले गेले नाही. मात्र आज हिंदू धर्मातील साधुसंता बद्दल चांगले दाखविण्यात येत आहेत, असे म्हणत त्यांनी, 'मिशन अयोध्या' मराठी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. नुकताच छत्रपती संभाजीनगर शहरातील एका भव्य मॅालमध्ये 'मिशन अयोध्या' या मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंगच्या प्रसंगी महंत रामगिरी महाराज बोलत होते. भविष्यामध्ये यासाठीही संघर्ष करावा लागेल, असेही महाराज म्हणाले. यावेळी व्यसपिठावर आमदार अनुराधाताई चव्हाण(आमदार), चित्रपटाचे निर्माते, कृष्णा शिंदे, योगीता शिंदे, दिग्दर्शक समीर सुर्वे, विरुपाक्ष महाराज, प्रल्हाद महाराज नवल, बद्री पठाडे, सुनील जगताप, रामचंद्र नरोटे, कृष्णा पाटील उकिर्डे, पद्माकर पडूळ, राम शिंदे, मधुकर महाराज, राधाकिशन पठाडे, विवेक ढोरे, रवी करमाडकर, बाबू महाराज आदींची उपस्थिती होती.

या चित्रपटाचे निर्माते म्हणून जबाबदारी कृष्णा शिंदे आणि योगिता शिंदे यांनी सांभाळली आहे. तर कथा कृष्णा शिंदे यांची असून पटकथा आणि संवाद लेखन समीर सुर्वे यांनी केले आहे. या चित्रपटातील सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांनी ट्रेलर लॉंच सोहळ्याला हजेरी लावली होती. संपूर्ण संभाजीनगर मिशन अयोध्यामय झाले होते. सर्व रस्त्यांवर पदोपदी मिशन अयोध्याचे बॅनर्स झळकत असल्याने शहरवासियांमध्ये कमालीचे कुतूहल तयार झाले आहे. या सोहळ्याला हजारोंच्या संख्येने चित्रपट रसिकांची उपस्थिती लाभली होती तसेच रामगिरी महाराज यांच्या अनुयायांनीही बहुसंख्येने गर्दी केली होती. ज्ञानोबा - तुकाराम माऊलींचा गजर करीत टाळ मृदुंगाच्या तालावर वारकऱ्यांनी हजेरी लावली होती. यावेळी उपस्थितांनी ‘जय श्री राम' नामाचाही जयघोष केला. तसेच यानिमित्ताने छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य रस्त्यांवर आणि चौकात चित्रपटाची फलकबाजी करण्यात आली होती. तसेच महंत रामगिरी महाराज यांच्या आगमनाचे फलकही जागोजागी लावण्यात आले होते.

चित्रपटाविषयी ......

मिशन सैनिकांचे असते, मिशन अतिरेक्यांचे असते. मग मिशन एका शिक्षकाचं का नसावं? असामान्य महानायकांचा इतिहास वाचत असताना आपलंही एक पान इतिहासात असावं, ही इच्छा मनाशी बाळगून आयुष्य जगणाऱ्या एका सामान्य शिक्षकाची एक असामान्य कथा आहे. अजित देशमुख हा इतिहास विषयचा शिक्षक असूनही छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या चरित्रावर व्याख्याने गाजवणारा प्रभावी वक्ता सुद्धा आहे. त्यांनी एका मिशनला पुढचे आयुष्य समर्पित  करायचे ठरवले आहे. ज्याचं नाव आहे "मिशन अयोध्या".

साधारण पाचशे वर्षाच्या एका अभूतपूर्व संघर्षानंतर भारतातील अयोध्यामध्ये सरते शेवटी श्री राम जन्मभूमी मंदिर उभारले गेले, त्या घटनेने देशमुख सर प्रभावित होतात. रामजन्मभूमी मंदिर उभारलं गेलं, पण पुढे काय? मंदिर उभारलं पण श्रीरामाच्या विचारांचं काय? असे त्यांच्यासमोर बरेच प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांनी स्वतः ते बेचैन होतात आणि प्रभू श्रीराम ही त्यांची अस्वस्थता बनते कारण ते ज्या छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांना आपला आदर्श मानतात त्या आदर्शांचा आदर्श श्रीराम आहे. अयोध्यात निर्माण झालेले भव्य मंदिर रामराज्याची सुरुवात असायला हवी, पुढच्या पिढ्यांना आदर्श राजा रामाचा इतिहास आपण सांगायला हवा. श्रीराम हा संपूर्ण विश्वाचा आहे त्याला कोणताही धर्म, जात-जमात अपवाद नाही. श्रीराम हा कोणाच्या द्वेषाचा, तिरस्काराचा विषय नसावा. त्याला सर्वांनी स्वीकारायला हवं असं त्यांचं आदर्श चरित्र आहे आणि हा विचार सर्व समाजात पोहोचवणं, तो पुढच्या पिढ्यात रुजवणे आणि रामराज्याकडे वाटचाल करणे हेच मिशन अयोध्या आहे.अत्यंत वेगळा विषय घेऊन येत्या २४ जानेवारी २०२५ रोजी मिशन अयोध्या चित्रपटगृहात दाखल होत असून हा चित्रपट रसिकांनी चित्रपटगृहातच पहावा असे आवाहन कलावंत तंत्रज्ञानी केले आहे. 


गायक हर्षवर्धन वावरेने गायलं ‘वी आर म्युझिक स्टेशन’ प्रस्तुत ‘बायडी’ हे गावरान प्रेम गीत

 गायक हर्षवर्धन वावरेने गायलं ‘वी आर म्युझिक स्टेशन’ प्रस्तुत ‘बायडी’ हे गावरान प्रेम गीत

दगडी चाळ या सिनेमातील धागा धागा गाण तसेच नुकतच आलेल फसक्लास दाभाडे या सिनेमातील दिस सरले गाणं अशी अनेक गीत प्रसिद्ध गायक हर्षवर्धन वावरे याने गायली आहेत. ‘वी आर म्युझिक स्टेशन’ प्रस्तुत ‘बायडी’ हे गावरान प्रेम गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या गाण्यात अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री पूजा राठोड एकत्र झळकणार आहेत. नुकतचं त्या दोघांनी आपल्या सोशल मीडियावर बायडी गाण्याचं टीझर शेयर करत ही बातमी दिली. बायडी या गाण्याच्या टीझरमध्ये अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री पूजा राठोड ही रेट्रो लुक मध्ये दिसत आहे. त्यामुळे गाण्याच्या टीझरने प्रेक्षकांची उत्कंठा अजूनच वाढवली आहे.


हर्षवर्धन वावरे 'बायडी' गाण्याच्या रेकॉर्डिंग विषयी सांगतो, "अभिनेता पुष्कर जोग यांच्यासाठी मी पहिल्यांदाचं पार्श्वगायक म्हणून काम करत आहे. ‘वी आर म्युझिक स्टेशन’ या म्युझिक रेकॉर्ड लेबल सोबत मी याआधी मॅड केलयं तू, पिल्लू आणि आता बायडी ही गाणी गायली आहेत. या गाण्याचा दिग्दर्शक अभिजीत दाणी हा खूप नम्र आहे आणि त्याची विचार करण्याची पद्धत फार युनिक आहे तर गाण्याचा निर्माता विशाल राठोड हा एक अष्टपैलू हुशार माणूस आहे. त्याचा मराठी संगीतसृष्टीकडे पाहण्याचा योग्य दृष्टीकोन आहे. टीम सोबत बायडी गाण रेकॉर्ड करताना फार आनंद झाला. मी या आधी तू दिसते, जीव रंगला, तुझी माझी जोडी जमली तसेच वारीसू या साऊथ सिनेमातील रणजिथामे अशी अनेक गाणी गायली आहेत. बायडी गाण्याच्या टिझरला सोशल मीडियावर प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद मिळतोय. ते पाहून आनंद होतोय. तुमचं असचं प्रेम कायम असू द्यात."

‘वी आर म्युझिक स्टेशन’ प्रस्तुत ‘बायडी’ हे गावरान प्रेम गीताचे निर्माते विशाल राठोड हे आहेत. तर गाण्याचे दिग्दर्शक अभिजीत दाणी हे आहेत. प्रसिद्ध गायक हर्षवर्धन वावरे आणि गायिका कस्तुरी तांबट यांनी हे गाणे गायले आहे. या गाण्याच संगीत प्रितेश मावळे याने केले आहे. बायडी गाण्याचा टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. तर आता प्रेक्षकांमध्ये या गाण्याची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

CanKids partners AIIMS Delhi for advocating patient-centered mental well-being in cancer care

Call to integrate mental health professionals into oncology teams, strengthen peer support networks, and reduce the stigma around mental hea...