Friday, April 11, 2025

*रविकांता फिल्म्स निर्मित व अकात डिस्ट्रीब्यूशन प्रस्तुत “मिशन मुंबई” चित्रपटाचा भव्य मुहूर्त संपन्न, अभिनेते विजय पाटकर यांच्यासोबत अनेक कलाकारांची उपस्थिती*

 *रविकांता फिल्म्स निर्मित  व अकात डिस्ट्रीब्यूशन प्रस्तुत “मिशन मुंबई” चित्रपटाचा भव्य मुहूर्त संपन्न, अभिनेते विजय पाटकर यांच्यासोबत अनेक कलाकारांची उपस्थिती*


*“मिशन मुंबई” ॲक्शन चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात*


ॲक्शन चित्रपटाची क्रेझ साउथ चित्रपटांसोबतच बॉलिवूड मध्येही असते. आता ती मराठी चित्रपटात पाहायला मिळेल. “मिशन मुंबई” हा शोध थरारक आणि ॲक्शन चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर सध्याच्या घडीला या चित्रपटाला एक्शनपट म्हणता येईल कारण यामध्ये सुमधूर संगीतासोबत एक्शनचा भडीमार आहे. जो आताच्या प्रेक्षकांना हमखास खिळवून ठेवेल. रविकांता फिल्म्स निर्मित व अकात डिस्ट्रीब्यूशन प्रस्तुत “मिशन मुंबई” या चित्रपटाचा मुहूर्त अभिनेते विजय पाटकर यांच्याहस्ते नुकताच संपन्न झाला. नव्या दमाचे कलाकार, सशक्त पटकथा, आणि मुंबईच्या मिशनवर आधारित दमदार कथा या चित्रपटात प्रेक्षकांना नक्की पाहायला मिळेल.


या चित्रपटाच्या मुहूर्ताला सुप्रसिद्ध अभिनेता अजय शर्मा, विजय पाटकर, ओम राणे, संकेत मोरे, प्रशांत कराड, सिद्धेश आचरेकर, शांती बावकर, अश्विनी तेंडुलकर, विपुल भोईर, राहुल कानाडोल, लक्ष्मी निवृत्ती पंधे, किरण चव्हाण, फाईट मास्टर फय्याज सय्यद तसेच दिग्दर्शक कैलाश पवार आणि चंद्रकांत विसपुते, मच्छिंद्र कदम, दिग्दर्शक शिरीष राणे, राजेश पाटील साहेब, श्री महालक्ष्मी मंदिराचे व्यवस्थापक नितीन कांबळी, नयन पडवळ यांची प्रमुख उपस्थिती होती. सध्या या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. 

“मिशन मुंबई” चित्रपटात प्रमुख भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेता अजय शर्मा असून विजय पाटकर, आनंद जोग, सुरेखा कुडची हे कलाकार प्रमुख भूमिकेत असतील, शिवाय ओम राणे, संकेत मोरे, प्रशांत, सिद्धेश आचरेकर शांती बावकर, अश्विनी तेंडुलकर, विपुल भोईर, राहुल कानाडोल, लक्ष्मी निवृत्ती पंधे, किरण चव्हाण हे कलाकार देखील या चित्रपटात असणार आहेत. रविकांता फिल्म्स निर्मित व अकात डिस्ट्रीब्यूशन प्रस्तुत ‘मिशन मुंबई’ या चित्रपटाचे दिग्दर्शन कैलाश पवार आणि चंद्रकांत विसपुते यांनी केले आहे. चित्रपटाची कथा चंद्रकांत विसपुते  यांची असून पटकथा व संवाद मच्छिंद्र कदम यांचे आहेत. छायाचित्रण नंदलाल चौधरी यांचे असून मेकअप किशोरजी पिंगळे हे करत आहेत. संगीताची धुरा समीर खोले सांभाळत असून फाइट मास्तर फय्याज सय्यद हे फाइटिंग एक्शनचा भाग करत आहेत. मिशन मुंबई चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे. तसेच सूत्रांच्या माहितीनुसार हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.



यंदाची उन्हाळ्याच्या सुट्टी असणार कुल !

 यंदाची उन्हाळ्याच्या सुट्टी असणार कुल !

धमाल करायला कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेश सज्ज


सध्या उकाडा प्रचंड वाढलेला असतानाच हा उकाडा सुसह्य करण्यासाठी 'एप्रिल मे ९९'चा मस्तीने भरलेला टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेशची धमाल मस्ती यात दिसत असून प्रत्येकाला आपल्या सुट्टीची आठवण करून देणारा हा जबरदस्त टिझर आहे. 


आजच्या इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या दुनियेत सुट्ट्यांचा आनंद स्क्रीनवरच मर्यादित राहिला आहे. परंतु एक काळ असा होता, जेव्हा ना स्मार्टफोन्स होते, ना वायफाय, तेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद गावाला जाऊन गावभर हुंदडण्यात, नदी, समुद्रावर फेरफटका मारण्यात, सायकलवरून फिरण्यात, सूर्य डोक्यावर येईपर्यंत झोपण्यात आणि बर्फाचे गोळे खाऊन लुटला जायचा. अशीच मजामस्ती ‘एप्रिल मे ९९’च्या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेश ही खोडकर मुलं संपूर्ण गावात कल्ला करत फिरताना दिसत आहेत. या तिघांचे प्लॅन्स होत असतानाच यात आणखी एक मेम्बर सहभागी होणार असल्याचे दिसतेय. ती 'जाई' तर नसेल ? आता ही 'जाई' नेमकी कोण आहे ? हे जाणून घेण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान टिझर प्रेक्षकांना 'त्यांच्या' काळात घेऊन जाणारा आहे आणि तरुणाईला खऱ्या सुट्टीची व्याख्या सांगणारा आहे. 

 

दिग्दर्शक रोहन मापुस्कर म्हणतात, “‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटातून प्रेक्षकांना जुन्या आठवणींची सफर घडेल. परीक्षा संपल्यानंतरचा सुट्टीचा काळ हा पूर्णपणे आनंददायी असतो. शाळा, अभ्यास यांच्यातून सुटका झाली असल्याने फक्त मजा करण्याचा हा काळ असतो. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात हा क्षण नक्कीच अनुभवला असेल. या चित्रपटातून प्रेक्षकांना पुन्हा एकदा याच अनुभवाची सफर घडेल.”


निर्माते राजेश मापुस्कर म्हणतात, “कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेश यांची मैत्री व खट्याळपणा पाहून प्रेक्षकांना त्यांच्या मित्रांची आठवण होईल. आजकालच्या सिमेंटच्या जंगलात, टेक्नोलॉजिकल दुनियेत खऱ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद काय असतो, हे लोक विसरले आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीचा खरा आनंद, मजा, धमाल या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.” 


मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत 'एप्रिल मे ९९’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केले असून राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी , मॉरिस नून हे निर्माते आहेत तर लॉरेन्स डिसोझा सह निर्माते आहेत.  यात  आर्यन मेंगजी (कृष्णा), श्रेयस थोरात (प्रसाद) आणि मंथन काणेकर (सिद्धेश) यांच्या भूमिका आहेत. येत्या मे महिन्याच्या सुट्टीत म्हणजेच १६ मे रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

‘तोडी मिल फँटसी’ सारखं ब्रॉडवे नाटक करण्याची अंकुश चौधरीची इच्छा

 ‘तोडी मिल फँटसी’ सारखं ब्रॉडवे नाटक करण्याची अंकुश चौधरीची इच्छा


तोडी मिल फँटसीसाठी अंकुश चौधरी आणि जिगीषा अष्टविनायक संस्थेचा सहकार्याचा हात


वेगवेगळ्या माध्यमांमध्ये सक्रिय असूनही अनेक तरुण कलावंतांनी वाट धरली आहे ती रंगभूमीची. प्रयोगशीलतेबरोबरच काळ अवकाशाच्या अनेक शक्यता आपल्या नाट्यकृतीतून आजमावू पाहणारी सृजनशील युवा पिढी त्यांना पडणारे प्रश्न  नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडतायेत. रंगभूमीवर सध्या येत असलेले विषय तरुण पिढीला भावताहेत. ज्यावर संवाद घडण्याची गरज असते असे विषय हाताळले जात आहेत. अशाच काही सृजनशील युवा कलाकारांनी आणलेल्या ‘तोडी मिल फँटसी’ या रॉक म्युझिकल नाटकासासाठी अभिनेता अंकुश चौधरी आणि जिगीषा अष्टविनायक संस्थने सहकार्याचा हात पुढे केला आहे. याबाबत माहिती देण्यासाठी नुकतीच एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली,  त्यावेळी अभिनेता अंकुश चौधरी, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, लेखक प्रशांत दळवी आणि नाटकातील कलाकार मंडळी उपस्थित होती.


या नाटकाला सहकार्य करण्याबद्दल अभिनेता अंकुश चौधरी म्हणाला, ‘माझ्या ‘ऑल द बेस्ट’ या एकांकिकेचे व्यावसायिक नाटक झालं आणि आजवर अनेक भाषांमध्ये त्याचे प्रयोग झाले. या एकांकिकेच व्यावसायिक नाटक व्हावे यासाठी ज्या दोन माणसांनी पुढाकार घेतला त्यातलं एक नाव म्हणजे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, दुसरं महेश मांजरेकर या दोन माणसांनी जो  विश्वास दाखवला त्यामुळे हे शक्य झालं. नव्या उमद्या काहीतरी वेगळं करू पाहणाऱ्यांसाठी मी  काय करू शकतो? तर त्यांना सहकार्य करू शकतो, म्हणून हा सहकार्याचा हात.  या सहकार्याला अनुभवी अशा जिगीषा अष्टविनायक संस्थेचा भक्कम पाठिंबा मिळाल्याने ‘तोडी मिल फँटसी’  हे नाटक आता चांगल्या प्रकारे पोहचेल याची खात्री त्यांनी बोलून दाखविली. ‘तोडी मिल फँटसी’ सारखं उच्च दर्जाचं ब्रॉडवे नाटक ज्याचे जगभरात एकाच दिवशी अनेक प्रयोग होतील असं नाटक करण्याची इच्छा अंकुशने यावेळी बोलून दाखविली. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी असं नाटक आणलं तर आपण नक्कीच रंगभूमीवर पुनरागमन करू असं अंकुशने  सांगताच, चंद्रकांत कुलकर्णी  यांनी त्यास सहमती दर्शवली. 


गिरण्यांच शहर म्हणून मुंबईची ओळख होती. मुंबई बद्दलली गिरण्या इतिहासजमा होऊन त्यांची जागा  आलिशान मॉल्स आणि पब्सनी घेतली. पूर्वीं गिरणी कामगार म्हणून काम करणाऱ्या कामगारांची मूल आज त्याच मॉलमध्ये हाऊस किपिंगची काम करतात. मात्र आजूबाजूच्या चकचकीतपणाची भुरळ त्यांना पडल्याशिवाय रहात नाही. आणि जे खऱ्या आयुष्यात शक्य नाही ते स्वप्नात नक्की होऊ शकतं आणि इथेच जन्म घेते ती म्हणजे फॅन्टसी.. याच फॅन्टसी वर  बेतलेलं गिरणगावातल्या भूमिपुत्रांची गोष्ट सांगणार सुजय जाधव लिखित आणि विनायक कोळवणकर दिग्दर्शित ‘तोडी मिल फॅन्टसी’ या नाटकाचे प्रयोग शुक्रवार १८ एप्रिल रात्रौ ८.३० वा.  डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे, १९ एप्रिल रात्रौ ८.३० वा. कालिदास नाट्यगृह मुलुंड, २० एप्रिल रात्रौ ८.३० वा. यशवंत नाट्यमंदिर माटुंगा या  ठिकणी रंगणार आहेत.   


‘तोडी मिल फँटसी’ ही कथा आहे तीन मित्रांची - घंट्या, अम्या, शिऱ्या आणि त्यांच्या स्वप्नांची, ज्यांनी मुंबई ह्या स्वप्नांच्या नगरीमधे आपले जीवन व्यतीत केले आहे. ही कथा सुरू होते एका आलिशान रेस्टो-बारच्या वॉशरूममध्ये , जेव्हा त्या रात्री, जेव्हा घंट्या, अम्या आणि शिऱ्या त्यांच्या स्लम टुरिझम व्यवसायाबद्दल एक महत्त्वाचा निर्णय घेणार असतात, तेव्हा ईशा सिंह नामक एक अत्यंत श्रीमंत मॉडेल, घंट्याच्या जीवनात अपघाताने प्रवेश करते आणि त्या सर्वांच्या जीवनात बदल घडतात. हे नाटक तुम्हाला एक संगीतमय प्रवास घडवते, तुम्हाला नाचवते, हसवते, रडवते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंबई शहरातील तुमच्या अस्तित्वाचा पुनर्विचार करायला लावते! या नाटकात शुभंकर एकबोटे, प्रमिती नरके, जयदीप मराठे, श्रीनाथ म्हात्रे, सुरज कोकरे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. मुंबईच्या या भूमिपुत्रांच्या फँटसीची गोष्ट  नाट्य स्वरूपात उभी करण्याची संपूर्ण प्रकिया पुण्यात झाली आहे.  या नाटकात रॅप, रॉक, मेटल, रेगे, कवाली अशा संगीताच्या वेगवेगळ्या प्रकारांचा वापर केला आहे. 


या नाटकाला देसी रिफ, अगस्ती परब आणि कपिल रेडेकरचं संगीत लाभलं आहे. नेपथ्य केतन दुधवडकर तर नेपथ्य निर्मिती प्रकाश परब यांची आहे. प्रकाशयोजना राहुल जोगळेकर, सचिन दूनाखे यांनी केली आहे.  वेशभूषा शुभांगी सूर्यवंशी, परीजा शिंदे तर रंगभूषा प्रदीप दरणे यांची आहे. नृत्य दिग्दर्शन अक्षय कुमार मांडे यांचे आहे.

Thursday, April 10, 2025

राम कृष्ण हरी संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई

 राम कृष्ण हरी 🚩


माऊली,


आपल्या महाराष्ट्राला संगीताचा जो महान वारसा पूर्वापार लाभला आहे, त्यातलं वारकरी संगीताचं योगदान फार मोलाचं आहे. त्यामुळे ही मौल्यवान परंपरा जपत संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटात तब्बल १२ अभंगांची योजना करण्यात आली आहे. 

हे संगीत सगळ्या महाराष्ट्राचे आहे. आणि महाराष्ट्र पांडुरंगाच्या पायी आम्ही हे संगीत दि. १२ एप्रिल २५ रोजी सायंकाळी अर्पण करण्याचे योजले आहे. या भव्य कार्यक्रमात आपल्याला भेटणार आहेत अनेक संत, प्रकटणार आहेत चांगदेव, आपण साक्षीदार होणार आहोत ७ नामवंत गायकांच्या सुरातून साकारणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीचे... 


या माऊली या सुवर्णक्षणांचे साक्षीदार होऊया.


दि. १२ एप्रिल २०२५

स्थळ : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर , मुंबई

वेळ : दुपारी ३ वाजता


|| पंढरीनाथ भगवान की जय ||

'सिंघम' अजय देवगणसह अवघ्या बॉलिवूडला लव फिल्म्सच्या 'देवमाणूस'ची भुरळ

 'सिंघम' अजय देवगणसह अवघ्या बॉलिवूडला लव फिल्म्सच्या 'देवमाणूस'ची भुरळ  


ट्रेलर शेअर करत दिल्या शुभेच्छा 


नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तेजस देऊस्कर दिग्दर्शित 'देवमाणूस' चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मराठी सिनेसृष्टीतूनही या ट्रेलरवर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच बॉलिवूडचा 'सिंघम' अजय देवगणलाही या ट्रेलरने भुरळ घातली आहे. आपल्या सोशल मीडियावर ट्रेलर पोस्ट करत त्याने निर्माते लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या मराठीतील पदार्पणाबद्दल अभिनंदन करत, ट्रेलर खूपच उत्कंठावर्धक आहे, देवमाणसाची सटकली की काय होते...?,  असे म्हणत संपूर्ण टीमला चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर राजकुमार राव, अर्जुन कपूर, सनी सिंग यानेही या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. 

लव फिल्म्स प्रस्तुत ‘देवमाणूस’ या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी केले असून, लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी निर्मिती केली आहे. महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके यांच्या भूमिका असणारा हा चित्रपट येत्या २५ एप्रिल २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Actress Madhuri Pawar will do a double bang

 Actress Madhuri Pawar will do a double bang


Actress Madhuri Pawar is happy in two ways, she will soon be seen in two projects

Actress Madhuri Pawar gave two good news!

Actress Madhuri Pawar makes a powerful comeback


Actress Madhuri Pawar became popular in households due to her works like 'Tujyaat Jeev Rangala', 'Devmanoos', 'Ranbaazar', Alyad Palyad, London Misal. She is also a great dancer. Recently she has got two big projects. She has shared the promos of two shows, Yed Lagal Premach and Shitti Vajli Re, on social media.


Actress Madhuri Pawar says about her new project, “My current feeling is that no matter how much you give, you will break the roof. I have not done a TV series for the last 2 years because I have some films and series. I have a close relationship with serials. After winning the dance reality show Apsara Aali, I did Tuzhat Jeev Rangala and Devmanus. I love serials. Because serials reach every household every day. Your work reaches people.”


She further says, “I am shooting for both now. I am doing the shows Yeda Lagal Premach and Shitti Vajli Re on Star Pravah. In Yeda Lagal Premach, I am playing the negative role of Nikki. This role is uninhibited, needy and rowdy. Then you will see me having fun in the reality show Shitti Vajli Re. I will be coming to you in different roles in both the projects. I am confident that all the viewers will definitely watch this show. I sincerely wish that your love will remain forever!”





Ranking the best stunts in Mission: Impossible history!

 Ranking the best stunts in Mission: Impossible history!


As the countdown has begun with Mission: Impossible - The Final Reckoning set to hit theatres soon,  there’s no better time to celebrate the franchise's legacy of jaw-dropping action. All eyes are once again on cinema’s most fearless man - Tom Cruise aka Ethan Hunt and how he’s gearing up for one final, historic mission.As Paramount Pictures India unveiled the explosive trailer of the biggest action film of the year, let’s revisit the most iconic, death-defying stunts that turned Ethan Hunt into a legend



1. The Burj Khalifa Climb - Ghost Protocol (2011)

The visual is unforgettable — Tom Cruise clinging to the side of the world’s tallest building, 2,722 feet above ground. Equipped with only suction gloves, Cruise scaled the Burj Khalifa in Dubai himself, delivering one of the most breathtaking sequences in cinematic history. It’s not just a stunt — it’s a high-altitude masterpiece. Cruise trained for months to pull this off and it’s still one of the most spine-chilling sequences in film history.



2. Motorcycle Cliff Jump - Dead Reckoning Part One (2023)

They called it ‘the biggest stunt in cinema history,’ and for good reason. Cruise rides a motorcycle off a Norwegian cliff followed by BASE jumps mid-air - all performed by Cruise himself. No green screen, no wires, just pure and undiluted madness.


3. Helicopter Chase - Fallout (2018)

Tom Cruise learned to fly a chopper for this - let that sink in! A heart-stopping aerial sequence, followed by gut wrenching mountain dives and mid-air barrel rolls - all shot practically. Insane? Yes. Iconic? Absolutely. This piece defines what makes the Mission: Impossible franchise so electrifying.



4. HALO Jump - Fallout (2018)

Nothing tops the high-altitude, low-opening jump at 25,000 feet. It’s a one-shot sequence filmed at dusk, requiring multiple jumps per day to catch the light. Cruise trained with the military to make this happen and the result? Pure cinema!


5.Underwater Heist - Rogue Nation (2015)

How long can you hold your breath? Cruise held his breath for over 6 minutes to shoot this single-take underwater scene- Zero cuts. The realism and risk involved make this one of the most impressive underwater scenes ever filmed.



6. Train Fight Finale - Dead Reckoning Part One (2023)

A throwback to classic action, the train action sequence is gritty, practical, and heart-pounding — reminiscent of Buster Keaton with a modern, high-octane twist. With Cruise hanging off collapsing carriages and running a top speeding locomotive, this one’s a love letter to old-school thrills.



As we await Mission: Impossible – The Final Reckoning, one question remains: What will Tom Cruise do next? With every chapter, he has shattered expectations and elevated the standard for practical stunt work. One final mission, one last impossible feat. Fans are eagerly waiting as it is anticipated that Tom Cruise is anticipated to create history again, For One Last Time.



The film makes its way to cinemas in India on 23rd May in English, Hindi, Tamil & Telugu in IMAX !

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...