Thursday, June 4, 2026

*मराठीतील पहिला सिनेमॅटिक युनिव्हर्स ठरलेला ‘घबाडकुंड’ घेऊन येतोय थरार आणि रहस्याचा नवा अनुभव!*

 *मराठीतील पहिला सिनेमॅटिक युनिव्हर्स ठरलेला  ‘घबाडकुंड’ घेऊन येतोय थरार आणि रहस्याचा नवा अनुभव!*

मराठी चित्रपटसृष्टीत प्रेक्षकांना सतत काहीतरी वेगळं आणि नावीन्यपूर्ण देण्याचा प्रयत्न होत असतो. याच धडपडीतून अनेक नवे प्रयोग मराठी चित्रपटांमध्ये पाहायला मिळत आहेत. आता अशाच एका आगळ्यावेगळ्या आणि धाडसी प्रयोगासह ‘घबाडकुंड’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्यातील रहस्य, भय आणि अनपेक्षित घडामोडी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणाऱ्या आहेत. ट्रेलरमधील प्रत्येक दृश्य थराराची पातळी उंचावत नेतं आणि शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतं. धक्कादायक वळणं आणि अनपेक्षित रहस्यांनी भरलेला हा चित्रपट प्रत्येकाला एक मोठं ‘सरप्राईज’ देईल, असा विश्वास निर्माते डॉ. रसिक कदम यांनी व्यक्त केला आहे.

‘घबाडकुंड’मधून कल्पनेच्या पलीकडचं एक वेगळंच ‘युनिव्हर्स’ मोठ्या पडद्यावर साकारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटील यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून निर्माते डॉ. रसिक कदम यांची भक्कम साथ या प्रकल्पाला लाभली आहे. ‘आयकॉन दी स्टाईल’ प्रस्तुत मराठीतील पहिला सिनेमॅटिक युनिव्हर्स असलेला ‘घबाडकुंड’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट येत्या १९ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

रहस्यमय आणि गूढ गोष्टींबद्दल प्रत्येकाच्या मनात एक सुप्त आकर्षण असते. याच गूढतेचा आणि थराराचा अनुभव ‘घबाडकुंड’मधून प्रेक्षकांना मिळणार आहे. या गूढ रहस्याचा उलगडा करण्यासाठी सहा जण एका धोकादायक प्रवासाला निघतात; मात्र या शोधयात्रेत त्यांच्यासमोर उभं राहतं भीती, थरार आणि अनाकलनीय घटनांचं भयावह वास्तव! ‘घबाडकुंड’ मध्ये नेमकं काय दडलं आहे? आणि या अंधाऱ्या गूढतेमागचं सत्य काय आहे? अशा प्रश्नांची उत्सुकता वाढवणारी कथा, रहस्यमय वातावरण आणि अंगावर काटा आणणाऱ्या थरारक घटनांनी सजलेला ‘घबाडकुंड’ प्रेक्षकांना एका वेगळ्याच अनुभवाच्या प्रवासावर घेऊन जाणार आहे.

रहस्य, भय, थरार आणि अनोख्या सिनेमॅटिक अनुभवाचा संगम असलेला ‘घबाडकुंड’ प्रेक्षकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाणार आहे. शशांक शेंडे,  संदीप पाठक, देवदत्त नागे, कुशल बद्रिके, प्राजक्ता हनमघर, स्मिता पायगुडे-अंजुटे, वैष्णवी कल्याणकर, रॉकी देशमुख, आरोही भोईर, योगेश प्रकाश तनपुरे, साहिल अनलदेवर आदि कलाकारांची दमदार फौज ‘घबाडकुंड’ चित्रपटात आहे.

‘घबाडकुंड’मधील रहस्य, थरार आणि अनपेक्षित घडामोडी प्रेक्षकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातील. १९ जूनपासून हा अनोखा सिनेमॅटिक प्रवास मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी प्रेक्षकांनी नक्की चित्रपटगृहात यावे,’  असे आवाहन कलाकारांनी केले.

Trailer - 

https://youtu.be/R6XfA0MOZbs?si=HJsxLxPnyFhJ__tE

*‘जोडीचा मामला’चा अनोखा प्रयोग; अवधूत गुप्तेंकडून नाटकाच्या टीमचे कौतुक*

 *‘जोडीचा मामला’चा अनोखा प्रयोग; अवधूत गुप्तेंकडून नाटकाच्या टीमचे कौतुक*

*मराठी रंगभूमीवर प्रथमच नाटकाच्या गाण्यांचा भव्य म्युझिक लाँच सोहळा!*

मराठी रंगभूमीच्या इतिहासात प्रथमच एखाद्या नाटकातील गाण्यांचे स्वतंत्रपणे म्युझिक लाँच करण्याचा मान मिळवणाऱ्या ‘जोडीचा मामला’ या नाटकाचा भव्य म्युझिक लाँच सोहळा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याला प्रसिद्ध गायक-संगीतकार अवधूत गुप्ते, अभिनेते योगेश सोहोनी, एकविरा म्युझिकच्या चेअरमन-डायरेक्टर गिरीजा गुप्ते, यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

‘जोडीचा मामला' या नाटकाच्या टीमने केलेला हा प्रयोग अत्यंत नावीन्यपूर्ण असून नाजूक विषय मांडण्याचे धाडस केलं आहे त्यासाठी संपूर्ण टीमचे कौतुक करत गायक अवधूत गुप्ते यांनी नाटकाला शुभेच्छा दिल्या. ‘या नाटकाद्वारे पुण्यातील १३ कलाकार आज स्वतःचे स्थान निर्माण करत आहेत, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. विशेष म्हणजे हे सर्व कलाकार नवखे आहेत, असे त्यांच्या अभिनयावरून अजिबात जाणवत नाही,’ असे मत अवधूत गुप्ते यांनी व्यक्त केले. 

कार्यक्रमाची सुरुवात ‘जोडीचा मामला’ या नाटकाच्या प्रयोगाने झाली. प्रेक्षकांनी नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यानंतर नाटकातील गाण्यांच्या म्युझिक लाँचचा विशेष सोहळा पार पडला.या नाटकाचे गीतकार आणि संगीत दिग्दर्शक चैतन्य कुलकर्णी ह्यांनी कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन केले. त्यांच्या मनोगतातून नाटकातील संगीतनिर्मितीचा प्रवास आणि गाण्यांमागील संकल्पना उलगडून सांगण्यात आली. लगबत हे नाटकाच्या विषयाचे 'संकल्पना गीत आणि धुंदसे चांदणे हे नाविन्यपूर्ण प्रेमगीत अशी दोन गाणी या नाटकात असून यातील ‘लगबत’ गाण्याला अवधूत गुप्ते तर धुंदसे चांदणे गाण्याला श्रद्धा आपटे-केळकर यांचा स्वर लाभला आहे. युगंधर देशमुख ह्यांनी संगीत संयोजन केले आहे.

‘दृष्टी’ आणि ‘अद्वैत थिएटर्स’ निर्मित ‘जोडीचा मामला’ या नाटकात योगेश कदम, प्राची कात्रे, पायल साळुंके, वैभव महाले, विशाल दुराफे, अश्विनी माळी, विनायक जाधव, प्रदीप कसबे, श्वेता काजळे, अभिजीत पाटसकर, आकाश राठोड, दुर्गेश लांडगे आणि श्रेयस इंदापूरकर हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. नाटकाचे लेखक आणि संगीतकार चैतन्य कुलकर्णी असून दिग्दर्शनाची धुरा श्रेयस इंदापूरकर यांनी सांभाळली आहे. नाटकाची निर्मिती श्रेयस इंदापूरकर आणि राहुल भंडारे यांनी केली आहे. नेपथ्य संदेश बेद्रे, प्रकाशयोजना शीतल तळपदे, नृत्य दिग्दर्शन ऋषीकेश देसाई यांनी केले आहे. रंगभूषा उलेश खंदारे तर वेशभूषा प्राची कात्रे आणि श्रद्धा हांडे यांनी केली आहे.

*Barbara O’Neill’s “Digest with Ease 2026 – The Gut Health Revolution powered by Ace Blend” Draws Over 350 Wellness Enthusiasts in Mumbai*

 *Barbara O’Neill’s “Digest with Ease 2026 – The Gut Health Revolution powered by Ace Blend” Draws Over 350 Wellness Enthusiasts in Mumbai*

*Celebrity guests Helen, Alvira Khan Agnihotri, Mini Mathur and Sophie Choudry join a packed house for an inspiring day dedicated to gut health, natural healing and conscious living*

*Mumbai*, Internationally renowned natural health educator Barbara O’Neill concluded a highly successful edition of “Digest with Ease 2026 – The Gut Health Revolution powered by Ace Blend” on 29th May 2026 at Yashwantrao Chavan Centre, Nariman Point, bringing together over 350 attendees for a transformative day of wellness, education and holistic healing.

Presented by Empower Living in collaboration with Awaken Your Soul, the sold-out wellness experience witnessed an overwhelming response from health-conscious individuals, wellness practitioners, entrepreneurs and celebrities alike. The event was graced by notable guests including Helen, Alvira Khan Agnihotri, Mini Mathur and Sophie Choudry, further highlighting the growing mainstream interest in preventive healthcare and conscious living.

The event featured Barbara O’Neill’s much-anticipated keynote session, where she shared practical insights on digestive health, nutrition, natural healing and lifestyle choices that support the body's innate ability to restore and thrive. Her powerful message resonated deeply with audiences seeking sustainable, root-cause approaches to health and wellbeing.

A thought-provoking panel discussion featuring longevity researcher *Dr. Sajeev Nair, celebrity Pilates instructor Yasmin Karachiwala and functional neurologist *Dr. Shikhar Patanjali* further enriched the experience, exploring the interconnected roles of digestion, movement, stress management and lifestyle habits in achieving long-term wellness.

Designed as an immersive wellness experience, the event sparked meaningful conversations around gut health, preventive wellness and holistic healing, leaving attendees empowered with actionable tools and knowledge to transform their everyday health practices. The enthusiastic participation and packed venue underscored the increasing demand for evidence-informed, holistic wellness education in India.

 

“I am deeply grateful for the incredible response in Mumbai. Seeing so many people come together to learn about gut health and natural healing reinforces the growing interest in preventive, holistic wellness. It was a privilege to share this journey with such an engaged audience and I hope the insights shared inspire lasting, positive changes in their health and wellbeing.” *says Barbara *O’Neill post her show.*

Thursday, May 28, 2026

*‘द महाराष्ट्र फाईल्स’ चित्रपटाचे तांत्रिक अडचणी आणि सेन्सॉर बोर्डाच्या बदलांमुळे प्रदर्शन पुढे, नवीन तारीख लवकरच होईल जाहीर*

 *‘द महाराष्ट्र फाईल्स’ चित्रपटाचे तांत्रिक अडचणी आणि सेन्सॉर बोर्डाच्या बदलांमुळे प्रदर्शन पुढे, नवीन तारीख लवकरच होईल जाहीर*

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला ‘द महाराष्ट्र फाईल्स’ या सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. येत्या २९ मे रोजी प्रदर्शित होणारा ‘द महाराष्ट्र फाईल्स’ हा सिनेमा सेन्सॉर बोर्डाच्या विलंबामुळे आता या दिवशी प्रदर्शित होणार नसल्याचं समोर आलंय. मात्र लवकरच नव्या तारखेसह हा सिनेमा रसिकांच्या भेटीस येणार आहे. सेन्सॉर बोर्डाच्या विलंबामुळे चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर गेल्याने निर्मात्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. बंजारा समाजाच्या न्यायासाठी लढणारा हा सिनेमा असून याच्या प्रदर्शनाच्या तारखेकडे आता प्रेक्षकांचेही लक्ष लागून राहणार आहे. चित्रपटाची टीम आलेल्या अडथळ्यावर काम करत असून लवकरच प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर करतील.

‘द महाराष्ट्र फाईल्स’ चित्रपटाच्या टीजर ट्रेलर आणि गाण्यांनी सोशल मीडियावर आणि प्रेक्षकांच्या मनात घर केल्याच पाहायला मिळालं. यानंतर सगळ्या प्रेक्षकांना २९ मे ची उत्सुकता लागून राहिली होती. मात्र सेन्सॉर बोर्डाने कात्री लावल्याने या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असल्याचं समोर आलं आहे. असं असलं तरी आता प्रेक्षक वर्गाला जास्त काळ वाट पहावी लागणार नाही कारण हा सिनेमा संघर्षाचा लढा देत जून महिन्यातच प्रदर्शित होईल.

चित्रपटाच्या तारखेबाबत निर्माते व दिग्दर्शक संजीवकुमार राठोड यांनी वेदनादायक प्रतिक्रिया देत म्हटलं, “संघर्ष हा वंचित आणि बंजारा समाजाच्या पाचवीलाच पूजलेला आहे. संघर्षाला सामोरे जाऊन येत्या जून महिन्यातच हा चित्रपट महाराष्ट्राच्या तमाम जनतेला चित्रपटगृहात पाहायला मिळेल”. ‘द महाराष्ट्र फाईल्स'ची निर्मिती, दिग्दर्शन, लेखन, कथा, पटकथा अशी सर्व बाजूंनी चित्रपटाची धुरा संजीव  कुमार राठोड यांनी सांभाळली आहे. तर क्रिएटिव्ह दिग्दर्शक आणि सह निर्माते म्हणून शालिनी राठोड यांनी बाजू सांभाळली आहे. तर क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून आर्यन राठोड याने बाजू पाहिली.

या चित्रपटात दिग्गज कलाकार मंडळींची फौज पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री उषा नाडकर्णी, मंगेश देसाई, वीणा जामकर, सयाजी शिंदे, नागेश भोसले, सुनील गोडसे, सन्नी लिओनी, सपना चौधरी, आर्यन राठोड, गौतमी पाटील, मंगली ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी नितीन सावंत, अजित केतकर आणि सिद्धार्थ कश्यप यांनी सांभाळली आहे. लवकरच चित्रपटाची नवी तारीख घोषित करण्यात येईल, तोवर मात्र प्रेक्षकांना वाट पाहावी लागेल.

*Champions Return with a Roar: Mumbai South Central Maratha Royals Unveil New Jersey Ahead of T20 Mumbai League 2026*

 *Champions Return with a Roar: Mumbai South Central Maratha Royals Unveil New Jersey Ahead of T20 Mumbai League 2026* 

MSC Maratha Royals unveil their official jersey for the upcoming T20 Mumbai Premier League season, with Head Coach Amit Dani, CEO & Head of Operations Parag More, Owners Alisha Baheti and Mayank Khandwala, alongside Captain Siddhesh Lad at the launch event.

*Mumbai, Maharashtra | 28th May 2026:* Defending T20 Mumbai League champions Mumbai South Central Maratha Royals unveiled their official jersey for the upcoming season, kicking off their title defence with a bold new visual identity and campaign inspired by the team’s fearless cricketing philosophy.  

The unveiling was held at a special launch event in Mumbai, attended by Team owners Kapil Baheti and Alisha Baheti along with Mayank Khandwala and Raj Khandwala, MSC Maratha Royals CEO Parag More, Team Captain Siddhesh Lad, and Head Coach Amit Dani.

MSC Maratha Royals’ new jersey themed around _“The Royal Roar”_ , blends traditional regional ferocity with contemporary sports aesthetics. The jersey’s visual storytelling includes:

● Metallic gold claw marks reflecting aggression and attacking gameplay

● Subtle tiger-stripe textures integrated into the fabric to reinforce the predatory theme

● A phantom tiger graphic subtly embedded to add depth and edge as an intense ‘hidden’ detail

● A striking heritage orange upper body representing energy, passion, and Maharashtra’s valor

● Midnight navy sleeves and lower body indicating composure, resilience and strength

● Liquid gold accent detailing injects a sense of royalty and championship ambitions

As defending champions, Mumbai South Central Maratha Royals’ campaign this season draws from Mumbai’s raw street energy, hip-hop culture and Bollywood familiarity. Anchored by the tagline, “Bhag Bhag Bhag, Aya Sher,” it celebrates the city’s confidence and fearless self-expression, while signaling the powerful return of the champions to the league stage. The tiger remains a symbol of the team’s ferocity and dominance, mirroring the relentless spirit of Mumbai itself.

Speaking at the unveiling, Kapil Baheti & Alisha Baheti, Owners, MSC Maratha Royals, said: _“As defending champions, we wanted this jersey and campaign to stand for more than just cricket. It reflects the fearless attitude of our team and the spirit of Mumbai. This is not just a design refresh, but a clear statement of intent to play bold, fearless cricket this season. ‘The Royal Roar’ is designed to connect strongly with our fans and capture the energy we bring to the field.”_

Mayank Khandwala & Raj Khandwala, Owners, MSC Maratha Royals, added: _“Defending a title brings a different level of challenge, and that’s what drives us. What we’ve built at MSC Maratha Royals goes beyond winning; it's a strong culture and identity rooted in Mumbai. With ‘The Royal Roar’, we’re promising our fans a team that returns more focused, more determined, and ready to prove that last season was just the beginning.”_ 

Led by defending title-winning Captain Siddhesh Lad and Head Coach Amit Dani, MSC Maratha Royals look to mount a strong defence of its T20 Mumbai League crown with a championship squad featuring Chinmay Sutar, Rohan Raje, Tushar Deshpande, Maxwell Swaminathan, Arjun Dani, Ayaz Khan, Sahil Jadhav, Sachin Yadav, Pratik Shukla, Shreyanssh Rai, Swaraj Parulkar, Om Bangar, Irfan Umair, Atharva Bhosale, Aryan Patni, Yash Gadia, Shreyas Gurav, Jitendra Paliwal, and Aditya Dhumal.

With the return of the league, MSC Maratha Royals continue to position themselves not only as one of Mumbai’s strongest cricketing franchises, but also as a modern sports brand deeply rooted in the city’s energy, ambition and voice.

Bhag Bhag Bhag, Aya Sher. The champions are back 

About MSC Maratha Royals

Mumbai South Central Maratha Royals are a professional T20 franchise competing in the T20 Mumbai League, representing the passion, energy, and cricketing culture of Maharashtra. The franchise is focused on building a strong sporting ecosystem through competitive cricket, fan engagement, and long-term talent development.

Internet Applauds Rubina Dilaik’s The Ward, Claiming the Web Series is Built for Prime-Time Television

 Internet Applauds Rubina Dilaik’s The Ward, Claiming the Web Series is Built for Prime-Time Television

Rubina Dilaik’s motherhood-centric reality series, The Ward, is rapidly gaining traction as a standout digital format. Viewers are widely applauding the project for its genuine emotional depth, innovative concept, and highly relatable take on the journey of pregnancy. Ever since making its debut on The Little Adda Company’s YouTube channel, the show has ignited widespread discussion across social media platforms, earning labels like “heartwarming,” “beautiful,” and “one of the most impactful reality concepts in years.”

Backered by Moving Image Studios and fronted by actor and new mother Rubina Dilaik, the show features 10 expectant mothers sharing a common space as they handle the psychological, physical, and emotional milestones of maternity. Through unscripted dialogues, touching moments, and developing family ties, the narrative dives into mental wellness, interpersonal bonds, support networks, personal identity, and the modern experience of raising a family.

A particularly strong wave of online opinion suggests that The Ward has outgrown its digital boundaries and belongs on television. Because of its universal emotional resonance and timely social themes, many internet users feel the show needs a slot on mainstream TV to reach a broader, family-oriented household audience.

One viewer remarked, “Bahut hi badhiya show hai, ese TV par aana chahiye,” while another noted, “Not every reality show entertains, some educate and empower too. The Ward is one of them.” Sentiments such as “The most beautiful reality show ever,” “Honestly well done for trying something new,” and “Lovely show with a fresh concept on motherhood” continue to pour into comment sections, proving how deeply the show has touched its viewers.

In stark contrast to typical reality television that thrives on toxic fights and forced friction, The Ward stands out for offering a protective, vulnerable, and deeply moving environment for its participants. Audiences have given special credit to Rubina Dilaik for anchoring the episodes with real warmth and sensitivity, utilizing her own journey as a new parent to guide conversations that feel comfortable and sincere.

The production is also winning praise for normalized discussions surrounding maternal mental health, emotional struggles, and family support systems—topics that rarely get spotlighted in traditional mass media. By pairing vulnerable personal stories with a larger social purpose, The Ward is proving to digital viewers that reality TV can have real substance and still be incredibly engaging.

With online statistics and praise continuing to climb, The Ward is transforming from a simple web series into an important cultural dialogue about family values and motherhood, leaving its growing fanbase convinced that it deserves a prime spot on national television.

*शशांक शेंडे साकारणार रहस्यमय मांत्रिकाची भूमिका*

 *शशांक शेंडे साकारणार रहस्यमय मांत्रिकाची भूमिका*

आपली प्रत्येक भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारत रुपेरी पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेता शशांक शेंडे लवकरच प्रेक्षकांसमोर नव्या आणि गूढ भूमिकेत झळकणार आहेत. त्यांच्या दमदार अभिनयामुळे प्रत्येक भूमिकेला वेगळं वजन मिळतं, आणि त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक भूमिकेबद्दल रसिकांमध्ये कायमच उत्सुकता पाहायला मिळते.

‘घबाडकुंड’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये शशांक शेंडे तंत्र-मंत्रात पारंगत असलेल्या सिद्धयोगी मांत्रिकाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटात त्यांची व्यक्तिरेखा एका मांत्रिकाची असून, मंत्र आणि तांत्रिक विद्येचा गूढ अभ्यास केलेला ‘बाबा’ अशी त्यांची ओळख आहे. चित्रपटातील त्यांच्या लूकचीही सध्या चर्चा रंगली आहे. संपूर्ण टक्कल,  कपाळावर काळा टिळा, गळ्यात माळा आणि डोळ्यातील गूढ भाव या व्यक्तिरेखेला अधिकच  भयावह बनवतात.

या भूमिकेबद्दल बोलताना शशांक शेंडे म्हणतात, ‘ही भूमिका खूप वेगळी आणि आव्हानात्मक आहे. एका मांत्रिकाच्या मनोविश्वात शिरून त्याची शक्ती, त्यामागचं तत्त्वज्ञान आणि त्याचा उद्देश प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच खिळवून ठेवेल.’ 

हा रहस्यमय मांत्रिक नेमका कोण आहे? त्याच्या शक्तींचं गूढ काय आहे? आणि त्याचा खरा हेतू काय आहे? हे  पहाणं  नक्कीच औत्सुक्याचं आहे. ‘घबाडकुंड’ हा चित्रपट या सर्व प्रश्नांची उत्तरं देत प्रेक्षकांना थरारक आणि गूढ प्रवासावर घेऊन जाणार असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 

एक भव्य आणि रहस्यमय ‘युनिव्हर्स’ मोठ्या पडद्यावर साकारण्याचा धाडसी प्रयत्न दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटील यांनी केला आहे. या अभिनव संकल्पनेला ‘आयकॉन दी स्टाईल’ संस्थेचे निर्माते डॉ. रसिक कदम यांची भक्कम साथ लाभली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत नवा ट्रेंड निर्माण करण्याच्या तयारीत असलेला ‘घबाडकुंड’ येत्या १९ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

द चेंबर ऑफ टॅक्स कन्सलटंट्स'च्या शताब्दी महोत्सवात दिग्गज कायदेतज्ज्ञांचा विशेष सन्मान*

 ' द चेंबर ऑफ टॅक्स कन्सलटंट्स'च्या शताब्दी महोत्सवात दिग्गज कायदेतज्ज्ञांचा विशेष सन्मान मुंबई* : कर , लेखा , कायदेशीर आणि संलग्न क...