Thursday, June 4, 2026

*‘जोडीचा मामला’चा अनोखा प्रयोग; अवधूत गुप्तेंकडून नाटकाच्या टीमचे कौतुक*

 *‘जोडीचा मामला’चा अनोखा प्रयोग; अवधूत गुप्तेंकडून नाटकाच्या टीमचे कौतुक*

*मराठी रंगभूमीवर प्रथमच नाटकाच्या गाण्यांचा भव्य म्युझिक लाँच सोहळा!*

मराठी रंगभूमीच्या इतिहासात प्रथमच एखाद्या नाटकातील गाण्यांचे स्वतंत्रपणे म्युझिक लाँच करण्याचा मान मिळवणाऱ्या ‘जोडीचा मामला’ या नाटकाचा भव्य म्युझिक लाँच सोहळा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याला प्रसिद्ध गायक-संगीतकार अवधूत गुप्ते, अभिनेते योगेश सोहोनी, एकविरा म्युझिकच्या चेअरमन-डायरेक्टर गिरीजा गुप्ते, यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

‘जोडीचा मामला' या नाटकाच्या टीमने केलेला हा प्रयोग अत्यंत नावीन्यपूर्ण असून नाजूक विषय मांडण्याचे धाडस केलं आहे त्यासाठी संपूर्ण टीमचे कौतुक करत गायक अवधूत गुप्ते यांनी नाटकाला शुभेच्छा दिल्या. ‘या नाटकाद्वारे पुण्यातील १३ कलाकार आज स्वतःचे स्थान निर्माण करत आहेत, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. विशेष म्हणजे हे सर्व कलाकार नवखे आहेत, असे त्यांच्या अभिनयावरून अजिबात जाणवत नाही,’ असे मत अवधूत गुप्ते यांनी व्यक्त केले. 

कार्यक्रमाची सुरुवात ‘जोडीचा मामला’ या नाटकाच्या प्रयोगाने झाली. प्रेक्षकांनी नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यानंतर नाटकातील गाण्यांच्या म्युझिक लाँचचा विशेष सोहळा पार पडला.या नाटकाचे गीतकार आणि संगीत दिग्दर्शक चैतन्य कुलकर्णी ह्यांनी कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन केले. त्यांच्या मनोगतातून नाटकातील संगीतनिर्मितीचा प्रवास आणि गाण्यांमागील संकल्पना उलगडून सांगण्यात आली. लगबत हे नाटकाच्या विषयाचे 'संकल्पना गीत आणि धुंदसे चांदणे हे नाविन्यपूर्ण प्रेमगीत अशी दोन गाणी या नाटकात असून यातील ‘लगबत’ गाण्याला अवधूत गुप्ते तर धुंदसे चांदणे गाण्याला श्रद्धा आपटे-केळकर यांचा स्वर लाभला आहे. युगंधर देशमुख ह्यांनी संगीत संयोजन केले आहे.

‘दृष्टी’ आणि ‘अद्वैत थिएटर्स’ निर्मित ‘जोडीचा मामला’ या नाटकात योगेश कदम, प्राची कात्रे, पायल साळुंके, वैभव महाले, विशाल दुराफे, अश्विनी माळी, विनायक जाधव, प्रदीप कसबे, श्वेता काजळे, अभिजीत पाटसकर, आकाश राठोड, दुर्गेश लांडगे आणि श्रेयस इंदापूरकर हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. नाटकाचे लेखक आणि संगीतकार चैतन्य कुलकर्णी असून दिग्दर्शनाची धुरा श्रेयस इंदापूरकर यांनी सांभाळली आहे. नाटकाची निर्मिती श्रेयस इंदापूरकर आणि राहुल भंडारे यांनी केली आहे. नेपथ्य संदेश बेद्रे, प्रकाशयोजना शीतल तळपदे, नृत्य दिग्दर्शन ऋषीकेश देसाई यांनी केले आहे. रंगभूषा उलेश खंदारे तर वेशभूषा प्राची कात्रे आणि श्रद्धा हांडे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

SRIT India Limited IPO Opens on September 28, 2026

SRIT India Limited IPO Opens on September 28, 2026  Left To Right  Mr. Anuj Killa Choice Capital Advisors Pvt Ltd Dr. Nambiar Raghavan Madhu...