Saturday, June 6, 2026

*गो. ब. देवल स्मृतिदिनी रंगकर्मींचा पुरस्कार वितरण सोहळा रंगणार*

 *गो. ब. देवल स्मृतिदिनी रंगकर्मींचा पुरस्कार वितरण सोहळा रंगणार*

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने प्रतिवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ १४ जून रोजी पुरस्कार वितरण सोहळा व कलावंत मेळावा आयोजित करण्यात येतो. यात रंगकर्मींना त्यांच्या रंगभूमीवरील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. *यावर्षीच्या जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस असून सदर ‘पुरस्कार वितरण. सोहळा रविवार, १४ जून रोजी दुपारी ४ वाजता, यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे संपन्न होणार आहे.* 

या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे ‘मर्म बंधातली ठेव ही’ ही बहारदार मैफिल यावेळी रंगणार आहे. स्वरस्वामिनी आशा भोसले आणि मा. दीनानाथ मंगेशकर यांनी अजरामर केलेल्या नाट्यपदांचा सुरेल नजराणा या कार्यक्रमातून रसिकांना अनुभवता येणार आहे. या मैफिलीत गायक श्रीरंग भावे, मृण्मयी फाटक आणि निधी रानडे हे आपल्या स्वरांनी नाट्यसंगीताची जादू उलगडणार आहेत. त्यांना महेश खानोलकर (व्हायोलिन), नीला सोहोनी (हार्मोनिअम) आणि धनंजय पुराणिक (तबला) यांची साथ लाभणार आहे. कार्यक्रमाचे निवेदन मयुरेश साने करणार असून, कार्यक्रमाचे समन्वयन मिती ग्रुप यांनी केले असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तरा मोने करणार आहेत.

नाट्यरसिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य असून पहिल्या पाच रांगा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. विनामूल्य प्रवेशिका ८ जूनपासून यशवंत नाट्य मंदिर येथे उपलब्ध होणार आहेत.

मराठी नाट्यसंगीताचा सुवर्णकाळ अनुभवण्याची आणि रंगभूमीतील मान्यवरांच्या उपस्थितीत एका संस्मरणीय सोहळ्याचा भाग होण्याची ही अनोखी संधी रसिकांनी आवर्जून साधावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघ हे या सोहळ्याचे प्रायोजक आहेत.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Sotefin Bharat Limited IPO Opens on Thursday, July 16, 2026

    Sotefin Bharat Limited IPO Opens on Thursday, July 16, 2026 Total Issue Size - Up To 48,00,000 Equity Shares of ₹ 10 each IPO Size - ₹...