Sunday, June 21, 2026

द चेंबर ऑफ टॅक्स कन्सलटंट्स'च्या शताब्दी महोत्सवात दिग्गज कायदेतज्ज्ञांचा विशेष सन्मान*

 'द चेंबर ऑफ टॅक्स कन्सलटंट्स'च्या शताब्दी महोत्सवात दिग्गज कायदेतज्ज्ञांचा विशेष सन्मान

मुंबई* : कर , लेखा , कायदेशीर आणि संलग्न क्षेत्रांच्या प्रगतीसाठी समर्पित असणाऱ्या 'द चेंबर ऑफ टॅक्स कन्सलटंट्स' (सीटीसी) या अग्रगण्य संस्थेने आपल्या शताब्दी महोत्सवाचे औचित्य साधून 'शताब्दी मंथन' या उपक्रमांतर्गत 'मानद सदस्यत्व प्रदान सोहळा' आयोजित केला होता.

'सीटीसी'च्या यशस्वी १०० वर्षांचा प्रवास साजरा करणाऱ्या या सांगता समारंभात कायदे आणि व्यावसायिक क्षेत्रातील निवडक नामवंत तज्ज्ञांच्या अनुकरणीय कार्याचा गौरव करण्यात आला. तसेच त्यांचे उत्कृष्ट नेतृत्व, तांत्रिक नैपुण्य आणि कायदेशीर व व्यावसायिक समुदायातील महत्त्वपूर्ण योगदानाचा विशेष उल्लेख करण्यात आला.

*या सोहळ्यात प्रत्यक्ष उपस्थित राहून सन्मान स्वीकारणाऱ्या दिग्गजांमध्ये प्रख्यात कायदेतज्ज्ञ आणि माजी न्यायमूर्ती आर. व्ही. ईश्वर (निवृत्त), ज्येष्ठ विधिज्ञ सौरभ सोपारकर आणि ज्येष्ठ विधिज्ञ पर्सी पार्डीवाला यांचा समावेश होता. तसेच प्रवासात असल्यामुळे ज्येष्ठ विधिज्ञ अरविंद दातार यांनी या सोहळ्यात ऑनलाईन उपस्थित राहून हा सन्मान स्वीकारला.* या सर्व दिग्गजांनी न्यायशास्त्र, घटनात्मक कायदा, करप्रणाली आणि कायदेशीर अभ्यास या क्षेत्रांत केलेल्या मोलाच्या कार्याचा भारतीय व्यावसायिक आणि न्यायिक क्षेत्रावर मोठा प्रभाव पडला आहे.'नवीन कर संहिता' या सत्राचे सूत्रसंचालन करणारे सीए अनिश ठाकर म्हणाले,* "'शताब्दी मंथन' हा केवळ एक उत्सव नाही, तर गेल्या अनेक वर्षांत या क्षेत्राला आकार देणाऱ्या शाश्वत मूल्यांचे पुनरावलोकन करण्याची ही एक उत्तम संधी आहे. प्रतिष्ठित कायदेतज्ज्ञ आणि व्यावसायिक नेत्यांना एकाच मंचावर आणल्यामुळे पुढील पिढीसाठी एक वैचारिक आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले आहे." या सत्रातील आघाडीच्या पॅनेलिस्टमध्ये ज्येष्ठ विधिज्ञ रफिक दादा आणि माजी पीसीसीआयटी मालती श्रीधरन यांचा समावेश होता. त्यांनी या सुधारणांच्या अंमलबजावणीतील व्यावहारिक उपायांवर प्रकाश टाकला.

'कोटक महिंद्रा ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड'चे व्यवस्थापकीय संचालक सीए निलेश शहा म्हणाले,* "भारताची आर्थिक प्रगती ही विश्वासार्हता, जबाबदारी आणि दीर्घकालीन विचारांना प्राधान्य देणाऱ्या संस्था आणि व्यावसायिकांवर अधिकाधिक अवलंबून असेल. 'सीटीसी'सारखी व्यासपीठे, ज्यांनी सलग एक शतक ज्ञान आणि व्यावसायिक उत्कृष्टतेसाठी योगदान दिले आहे, ती भविष्यासाठी सज्ज असणारे नेतृत्व आणि जबाबदार आर्थिक विकासाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात."

हा सोहळा 'सीटीसी'च्या 'शताब्दी मंथन' या विशेष उपक्रमाचा एक मुख्य भाग आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश गेल्या १०० वर्षांतील ज्ञान आणि अनुभव जतन करणे आणि भविष्यासाठी नवीन दृष्टिकोन तयार करणे हा आहे. यावरून कर आणि कायदे क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी, विचारशील नेतृत्वासाठी आणि या क्षेत्राच्या विकासासाठी संस्थेची असलेली सातत्यपूर्ण कटिबद्धता दिसून येते.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

SRIT India Limited IPO Opens on September 28, 2026

SRIT India Limited IPO Opens on September 28, 2026  Left To Right  Mr. Anuj Killa Choice Capital Advisors Pvt Ltd Dr. Nambiar Raghavan Madhu...