Tuesday, August 2, 2022

 "Dard Ishq Hai" - Latest Pop-Love Song Presented by Tips Originals & Kumar Taurani


Song Link- https://www.youtube.com/watch?v=T8-KscATKCY

Love has taken a new twist! It is the twist of making a love song into a Pop number. Tips Originals' new song “Dard Ishq Hai” is high on its musical richness, subtlety and uncanny ability to reach deep within the hearts of the audience.

Produced by Tips Music, Dard Ishq hai is sung by Sonu Singh & Neha Karode. It stars Diljott & Eric Kalsi and it is directed by JCee Dhanoa. Priyanka R Bala has penned the lyrics with the beautiful composition by the notable composer Shameer Tandon.

Sonu Singh says, “Dard Ishq Hai is a testament to the fact that good songs will find their way into the hearts of the audience.”

Neha Karode says “Dard Ishq Hai warms the cockles of the hearts. We have tried to explore emotions of love in different ways and hope the audience likes it as much as we do. I am honoured to have worked with Tips Music. Kumar Ji is a visionary - a man of premium knowledge & foresight”

The music video transcends the audience into a state of bliss with aesthetic visuals that make one feel transported into the cute lanes of a European town.

Eric Kalsi who stars in the music video says, “Working on the song was an outstanding experience. Dard Ishq Hai is not just a song but an emotion that'll melt you down”

Lyricist Priyanka R Bala says “Dard Ishq Hai does not give momentary pleasure; it makes your soul happy. Simple words, but very layered melodies, and that's the best combination which describes the song”

Within a few days of its release, the song has garnered more than 7.5 lakh views on YouTube. The track is trending on all social media platforms, especially reels on Instagram.

               'तुमची मुलगी काय करते?' मालिकेचे 200 भाग पूर्ण!

 पाहा, 'तुमची मुलगी काय करते?' ही मालिका सोम.-शनिरात्री 10 वाजताफक्त सोनी मराठी वाहिनीवर.

 


सोनी मराठी वाहिनीवरील वेगळ्या धाटणीची अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे 'तुमची मुलगी काय करते?'. चित्तथरारक असणाऱ्या 'तुमची मुलगी काय करते?' या मालिकेने नुकताच 200 भागांचा टप्पा पूर्ण केला आहेमालिका सध्या रंजक वळणावर येऊन ठेपली आहेमालिकेमध्ये सध्या किलवरचा शोध सुरू आहे.

 


मागील 200 भागांमध्ये 'तुमची मुलगी काय करते?' या मालिकेत सावनी मिरजकर नावाची तरुणी बेपत्ता होतेत्यानंतर सुरू होते श्रद्धा मिरजकर म्हणजे तिच्या आईच्या शोधाची गोष्टश्रद्धा  जिवाचं रान करत सावनीला शोधून काढतेअनेक वेळा तिच्या आवाक्याबाहेर जाऊन ती गोष्टी करतेड्रग डील करतेबंदूक हातात घेते अशा अनेक गोष्टी सावनीला शोधण्यासाठी श्रद्धा करतेअखेर अथक प्रयत्नांनंतर सावनीला शोधून काढण्यात श्रद्धा यशस्वी होतेसावनी घरी अलीतरी तिच्या मनावर झालेले आघात अजूनही पुसलेले नाहीतअशातच इन्स्पेक्टर विजय भोसलेला किलवर जिवंत असल्याचे समजतेत्यामुळे आता सगळे  किलवरला शोधताहेतसावनीही या कामात पोलिसांना मदत करते आहेत्यामुळे येत्या भागांत अनेक रहस्यं उलगडली जातीलतसेच चारू किलवर असेल कासावनीला तिचा भूतकाळ आठवेल कामिरजकर कुटुंबाची या सगळ्यातून सुटका होईल काअशा अनेक प्रश्नांची उत्तरे येत्या भागांमध्ये मिळतील.

 

पाहायला विसरू नका,  'तुमची मुलगी काय करते?' सोम.-शनिरात्री 10 वाजता फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

Monday, August 1, 2022

                                           'आय हेट यू डॅडी'
        'दगडी चाळ २' मध्ये 'डॅडी आणि सूर्या' मध्ये नेमकं काय झालं?


मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित 'दगडी चाळ' हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एखाद्या वादळासारखा आला आणि त्यानंतर 'चुकीला माफी नाही' असे म्हणणाऱ्या अरुण गुलाब गवळी ऊर्फ ‘डॅडीं'ची पुन्हा सर्वत्र चर्चा सुरू झाली. 

'दगडी चाळ १' ला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिल्यानंतर आता या चित्रपटाचे दुसरे पर्व १८ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे. या चित्रपटाचे नवं पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून यात पुन्हा एकदा अंकुश चौधरी आपल्याला सूर्याच्या भूमिकेत दिसतोय. ‘डॅडी’ आणि सूर्याचे नाते आपण याआधीच पाहिले. 'डॅडीं'च्या गुंडांसोबत होणाऱ्या भांडणानंतर सूर्या-डॅडींची होणारी मांडवली, 'डोकॅलिटी' वापरून काम करणारा 'सूर्या' डॅडींचा उजवा हात बनला, त्यात सूर्याचा कौटुंबिक ताण, हे सगळं आपण यापूर्वी पाहिलं. 
 
मात्र यावेळी 'आय हेट यू डॅडी' असे म्हणत, सूर्याच्या चेहऱ्यावर प्रचंड राग दिसतोय, आता तो डॅडींचा तिरस्कार का करतोय?, याचे उत्तर 'दगडी चाळ २' पाहिल्यावरच मिळेल. 

या चित्रपटात मकरंद देशपांडे 'डॅडीं'ची भूमिका साकारत आहेत.

                            ' बॉईज ३' मधील 'ती' मुलगी कोण?

'बॉईज' व 'बॉईज २' या दोन्ही चित्रपटांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. आता तीच धमाल, मजामस्ती घेऊन हे तिन्ही बॉईज पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. येत्या १६ सप्टेंबरपासून धैऱ्या, ढुंग्या व कबीर 'बॉईज ३' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या वेळीही त्यांच्या आयुष्यात एका मुलीची एंट्री होणार असून 'ती' नक्की कोण आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. त्यातच आता ही उत्सुकता अधिक वाढवण्यासाठी या चित्रपटाचे एक मोशन पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. यात तिचा अर्धाच चेहरा समोर आला असून आता 'ती' नक्की कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे.

यापूर्वीही 'बॉईज' व 'बॉईज २' मध्ये धैऱ्या, ढुंग्या व कबीरच्या आयुष्यात मुली आल्या. मात्र प्रत्येक वेळी कबीरचा नंबर लागला आणि धैऱ्या, ढुंग्याने त्याला मदत केली. आता यावेळी 'ती' मुलगी नक्की कोणाच्या आयुष्यात येणार, 'ती'च्या येण्याने या तिघांच्या आयुष्यात काय गडबड घडणार, कोणाचे प्रेम यशस्वी होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या सगळ्या गोष्टी घडत असतानाच धैऱ्या, ढुंग्या व कबीरची धमाल 'बॉईज ३'मध्ये तिप्पट पटीने वाढणार आहे, हे नक्की! 

सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटच्या सहयोगाने अवधूत गुप्ते प्रस्तुत चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे व संजय छाब्रिया  'बॉईज ३'चे निर्माते आहेत. या चित्रपटातही पुन्हा प्रतीक लाड, पार्थ भालेराव, सुमंत शिंदे हेच त्रिकुट झळकणार असून पुन्हा एकदा ते दंगा घालायला तयार झाले आहेत.

                    ' प्लॅनेट मराठी'वर ' मी पुन्हा येईन' प्रदर्शित 



राजकारणातील साधारण परिस्थितीवर मार्मिक पद्घतीने भाष्य करणारी ‘मी पुन्हा येईन' वेबसीरिज 'प्लॅनेट मराठी’वर प्रदर्शित झाली असून अरविंद जगताप लिखित, दिग्दर्शित या वेबसीरिजमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, सिद्धार्थ जाधव, रुचिता जाधव, भारत गणेशपुरे असे दमदार कलाकार आहेत. 

 सध्या ‘मी पुन्हा येईन’चे तीन एपिसोड्स प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. यात सत्तेसाठी पक्ष वरिष्ठांना विनवण्या, सत्तानाट्य, मंत्रीपदासाठी राजकारण्यांची फसवणूक, आमदारांची पळवापळवी हे सर्व विनोदी शैलीत दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

दिग्दर्शक अरविंद जगताप म्हणतात, "सध्याच्या राजकारणाशी याचा काहीही संबंध नसून निव्वळ मनोरंजनाच्या हेतूने याची निर्मिती करण्यात आली आहे. राजकारणामागील गोष्टी या निमित्ताने प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील." 

प्लॅनेट मराठीचे प्रमुख संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, " विनोदीशैलीत निर्मित केलेली ही वेबसीरिज श्रोत्यांना खिळवून ठेवणारी आहे. राजकारणात कधीही काहीही घडू शकते, हे वेबसीरिज राहिल्यावर कळेलच."

 प्लॅनेट मराठी, गौतम कोळी व जेम क्रिएशन्सने ‘मी पुन्हा येईन’ची निर्मिती केली आहे.

                'टाइमपास ३’ टीमने धरला रिक्षाचालकांसोबत ठेका 

सध्या 'टाइमपास३' चा सर्वत्र बोलबाला आहे. चित्रपटातील गाणी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहेत. त्यापैकीच एक ट्रेंडिंग गाणे म्हणजे 'वाघाची डरकाळी'. नुकताच ठाण्यातील रिक्षा स्टँडवर हृता दुर्गुळे, प्रथमेश परब, मनमीत पेम यांनी या गाण्यावर ठेका धरला. या वेळी त्यांना रिक्षाचालकांनीही साथ दिली. विशेष म्हणजे यात काही महिला रिक्षाचालकही होत्या. या प्रसंगी दिग्दर्शक रवी जाधवही उपस्थित होते. 

क्षितीज पटवर्धन यांनी शब्दबध्द केलेल्या या गाण्याला अमितराज यांनी संगीत दिले आहे. तर हे गाण्याला वैशाली सामंतचा ठसकेबाज आवाज लाभला आहे. झी स्टुडिओज आणि अथांग कम्युनिकेशन्स निर्मित, रवी जाधव दिग्दर्शित 'टाइमपास ३’ येत्या २९ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

                         किंग जेडी’ने केली ‘गणराज स्टुडिओ’ची स्थापना 


मराठीतील पहिला रॅपर, निर्माता, दिग्दर्शक श्रेयश जाधव उर्फ ‘किंग जेडी’ याने अल्पावधितच सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. मराठी प्रेक्षकांना जबरदस्त रॅप साँग, बाबू बँड बाजा सारखा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट, मी पण सचिन, बघतोस काय मुजरा कर, बस स्टॅाप असे अनेक यशस्वी चित्रपट दिल्यानंतर आता श्रेयशचा प्रवास आणखी एक पाऊल पुढे गेला आहे. श्रेयशने ‘गणराज स्टुडिओ’ची स्थापना केली असून या अंतर्गत एडिटिंग, डबिंग, व्हीएफएक्स साउंड मिक्स अगदी फ़ाइनल आउट्पुट्सपर्यंत सर्व पोस्ट प्रॅाडक्शन सेवा उपलब्ध होणार आहे. 

      नुकताच या स्टुडिओचा लोकार्पण सोहळा चित्रपट दिग्दर्शक अनिस बाझमी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी अभिनेता स्वप्नील जोशीसह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

गणराज स्टुडिओच्या स्थापनेबाबत श्रेयश जाधव म्हणतो, ‘’गणराजचा प्रवास आता एक पाऊल आणखी पुढे गेला आहे. ‘गणराज स्टुडिओ’मुळे आता एकाच छताखाली चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत. बेसलाइट २, डोल्बीअटमोस, ९.१ मिक्सिंग इत्यादी अत्याधुनिक सुविधासह इतक्या वर्षांच्या अनुभवातून दर्जेदार कलाकृतींची निर्मिती करण्याच्या दृष्टीने या स्टुडिओची स्थापना करण्यात आली आहे.’’

GLOBAL PRIDE OF SINDHI AWARDS 2024: A GLORIOUS CELEBRATION OF SINDHI HERITAGE

  GLOBAL PRIDE OF SINDHI AWARDS 2024: A GLORIOUS CELEBRATION OF SINDHI HERITAGE Awardees and guests- Ramesh Taurani, Ghanshyam Vaswani,Lille...