Wednesday, April 11, 2018

                प्रदर्शन                       
   मुंबईत डाय अँड मोल्ड २०१८  

 टूल्स उद्योगाची आर्थिक उलाढाल २०२० सालापर्यंत २० हजार कोटी रु. होणार

मुंबई, ११ एप्रिल २०१८: एका अहवालाप्रमाणे टूल्स उद्योगाची आर्थिक उलाढाल ही २०१६-१७ सालामध्ये १४ हजार ६०० ते १४ हजार ७०० कोटी रुपये होती ती २०२० सालापर्यंत २० हजार कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. येत्या काळात या क्षेत्रात ११ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर ११ ते १४ एप्रिल या कालावधीत मुंबईत गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे टूल अॅण्ड गेज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन - भारत (TAGMA- इंडिया) या ११ व्या डाय आणि मोल्ड इंडिया इंटरनॅशनल (डीएमआय) एक्झिबिशनचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबईत पार पडणाऱ्या ११ व्या "डाय मोल्ड इंडिया’'हे  टूलींग उद्योगाशी संबंधित सर्व व्यवसायासाठी एक उत्तम व्यासपीठ असून या प्रदर्शनात सहभागी होणे ही उत्तम संधी आहे. टूल्स व्यवसायाशी संबंधित बाजारपेठ, उत्पादने, आणि सेवा हे या प्रदर्शनात मुख्य आकर्षण आहे. अत्यंत सोयीस्कर ठिकाणी हे प्रदर्शन असून मुंबई सारखे शहर हे दळणवळणाच्या दृष्टीनेही सोयीस्कर आहे. हवाईमार्ग, रेल्वे, समुद्र, रस्ते हे सर्व मार्ग मुंबईत येण्यासाठी सहज उपलब्ध असल्यामुळे TAGMAने या प्रदर्शनाचा अनुभव घेण्यासाठी उद्योगांना मुंबई येथे निमंत्रित केले आहे. या प्रदर्शनात व्यवसाय वाढविण्याची संधी उपलब्ध होणार असून हे प्रदर्शन मोठ्या प्रमाणात यशस्वी होणार अशी आशा  TAGMA चे अध्यक्ष श्री डी के शर्मा यांनी व्यक्त केली.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री माननीय श्री सुरेश प्रभू यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंग दिलेल्या संदेशात सांगितले की, 'भारताच्या आयात-निर्यातीचा दर्जा वाढवण्याकरिता देशाच्या धोरणात्मक पुढाकाराचा एक भाग म्हणून, जीडीपीमध्ये विदेशी व्यापाराचे योगदान वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे. डीएमआय २०१८ सारख्या प्रदर्शनाच्या’माध्यमातून निश्चितपणे हे उद्दिष्ट साध्य होण्यास सहकार्य मिळेल.

गोदरेज अँड बॉयस मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष, पदमभूषण पुरस्काराने सन्मानित श्री जमशेद एन. गोदरेज हे डीएमआय २०१८चे मुख्य अतिथी होते. यावेळी त्यांनी सांगितले की, 'इंजेक्शन मोल्डिंग आणि डाय कास्टिंग हा ऑटोमोटिव्ह उद्योग आणि रेफ्रर्जरेटर्स, ओव्हन,हीटर्स यांसारख्या मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येणा-या इलेक्ट्रिकल उपकरणांशी संबंधित जवळजवळ प्रत्येक उत्पादनाचा अविभाज्य भाग आहे. परंतु प्रत्येक उत्पादनात वापरल्या जाणा-या या महत्वपूर्ण घटकांबद्दल अनेकांना माहिती नाही. याचा वापर प्रतिष्ठेच्या चंद्रयान आणि मंगलयान मिशनच्या निर्मितीमध्ये केला गेला होता जेथे गोदरेजने या क्षेत्रातील तज्ज्ञांचे योगदान दिले होते.'

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

“Saaffrons Miss India International & Saaffrons Mrs. India International 2025”

    “Saaffrons Miss India International & Saaffrons Mrs. India International 2025”   Saaffrons World announces the Beauty & Talent...