Tuesday, April 17, 2018





Director Rajesh Mapuskar awarded with Raja Paranjape honour
Or
National award winning director Rajesh Mapuskar receives prestigious Raja Paranjape Award


     On the occasion of Raja Paranjape's Birth Anniversary on 20th April, every year this festival is organized in the name of Raja Paranjape festival.  During the same time period from April 14th – April 20th of every year.
     This festival showcases screening of films, several plays and musical based programs .
The 9th edition of Raja Paranjape festival was conducted by Raja Paranjape foundation which was inaugurated by MP Sambhaji Raje at Keshavrao Bhosale auditorium. This festival recognizes artists from various fields of acting, direction, music and drama.
     Director Rajesh Mapuskar received Raja Paranjape honour for his notable work in the field of direction for ‘Ferrari ki Sawaari’ and ‘Ventilator’ which has also won national awards in 2016.
     The legacy of Raja Paranjape continues to reside in hearts its audience, the main motive behind organizing this festival is to reach out, to the next generation.
     On winning the award Rajesh Mapuskar beams that “We had theatre in Shrivardhan where along with my cousins I used to work, this grew my interest in cinema. Raja Paranjape’s movies were great part of my childhood memories. When I recall my journey from Shrivardhan to Mumbai and my struggle to make a mark in the industry from then, to now directing films like Ferrari ki Sawaari and Ventilator. This day is also special as it brings out fond memories of working with Nirmiti Sawant on a play”
     Actor Sanjay Narvekar, Music director and Singer Avdhoot Gupte, Actress Nirmitte Sawant also received Raja Paranjape Award.
 
दिग्दर्शन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी राजेश मापुसकर यांचा राजा परांजपे पुरस्काराने सन्मान
Or
राजा परांजपे पुरस्काराने राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजेश मापुसकर यांचा गौरव

     अभिनय, चित्रपट निर्मिती, दिग्दर्शन, नाटक अशा सगळ्याच विभागांत राजा समजल्या जाणाऱ्या राजा परांजपे यांच्या प्रतिष्ठानातर्फे आयोजित होणाऱ्या राजा परांजपे महोत्सवाच्या नवव्या पर्वाची सुरूवात नुकतीच कोल्हापूरात झाली. दरवर्षीप्रमाणे यंदाही या सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी राजा परांजपे पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी सिनेसृष्टीतील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यात दिग्दर्शन विभागासाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजेश मापुसकर यांच्याफेरारी की सवारीआणिव्हेंटिलेटरया सिनेमांची दखल घेत त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी राजेश मापुसकर यांचा सन्मान करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहात पार पडलेल्या या सोहळ्यात बोलताना, “श्रीवर्धन ला आमचं थिएटर होतं जिथे आम्ही सगळी भावंडं मजा-मस्तीबरोबरच या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत होतो, असं राजेश मापुसकर म्हणाले. त्यानंतर घडलेला श्रीवर्धन ते मुंबई हा प्रवास आणि अॅड फिल्म्सनंतर 'फेरारी की सवारी', 'व्हेंटिलेटर' सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन... ही सगळी वर्ष कोल्हापूर ला येताना नजरेसमोरून ओझरती जात असल्याचं म्हणत... सिनेसृष्टीतील या राजाच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचा मानकरी ठरल्याबद्दल सगळ्यांचेच मनापासून आभार मानले. तर यावेळी निर्मितीताईंबरोबर केलेल्या नाटकाच्या आठवणींनाही उजाळा मिळाल्याचं दिग्दर्शक राजेश मापुसकर यांनी म्हटलं.”
     दरम्यान राजा परांजपे प्रतिष्ठानाच्या वतीने आयोजित नवव्या राजा परांजपे महोत्सवाचे उद्घाटन आणि राजा परांजपे सन्मान पुरस्कार वितरण खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिग्दर्शक राजेश मापुसकर यांच्याबरोबरच अभिनेते संजय नार्वेकर, संगीतकार-गायक अवधूत गुप्ते, अभिनेत्री निर्मिती सावंत यांचाही सन्मान करण्यात आला. तर जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ कलाकार अशोक सराफ यांची निवड झाली असून 20 एप्रिलला साजऱ्या होणाऱ्या राजा परांजपे जयंतीनिमित्त त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
     14 एप्रिल ते 20 एप्रिल चालणाऱ्या या महोत्सवात राजा परांजपे यांचे 10 चित्रपट आणि 7 सांस्कृतिक कार्यक्रम प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

“Saaffrons Miss India International & Saaffrons Mrs. India International 2025”

    “Saaffrons Miss India International & Saaffrons Mrs. India International 2025”   Saaffrons World announces the Beauty & Talent...