Saturday, April 7, 2018


अवधूत म्हणतोय, नाद करायचा नाय
-    अवधूतच्या आवाजातलं रणांगण चित्रपटाचं नवं गाणं लाँच

देशमुखांच्या बुध्दीला किमान पुण्यात तरी Option नाही, या वाक्याने सुरू होणारा नुकताच लाँच झालेला नाद करायचा नाय या गाण्याचा विडिओ सध्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर चांगलाच गाजतोय. दम लय नावात, वट हाय गावात, आपल्याला भिडायचा नाय, नाद करायचा नाय... अशा दमदार ओळींनी सोशल मिडियावर धुमाकूळ घातलाय.

या गाण्यात वैभव तत्त्ववादी आणि संतोष जुवेकर यांची जुगलबंदी पाहायला मिळते आहे. तर सचिन पिळगांवकरांचे एकापेक्षा एक डॉयलॉग्स या विडिओची जमेची बाजू ठरते आहे. या दमदार गाण्याचे बोल गुरू ठाकूर यांनी लिहिले आहेत. तर संगीत अवधूत गुप्ते यांनी दिलं आहे. सगळ्यांच्या ओठी असलेल्या या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे या गाण्यात ऐकू येणारे दोन्ही आवाज अवधूत गुप्ते यांचे आहेत.

सचिन पिळगांवकरांच्या भूमिकेला साजेसं हे गाणं 52 विक्स एंटरटेनमेंट, ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेनमेंट मिडिया सॉल्यूशन्स (जीसिम्स) आणि हार्वे फिल्म्स निर्मित रणांगण या चित्रपटातून आपल्याला मिळणार आहे. ज्याची निर्मिती करिष्मा जैन आणि जो राजन यांनी केली आहे. तर अर्जुन सिंह बर्रन, स्वप्नील जोशी आणि कार्तिक निशानदार यांनी या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. तर राकेश सारंग यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

या गाण्याच्यानिमित्ताने मराठीत एका दमदार गाण्याची एंट्री झाल्याचं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.


AvdhootGupte heats up this summer with his new song
‘NaadKaraychaNaay’ from Ranangan



Swwapnil Joshi and Sachin Pilgaonkar starrer ‘Ranangan’ movie launched its new power pack song ‘NaadKaraycha Nay’ by AvdhootGupte. He is always known for his quirky style of music but what draws more attention is that he has sung the song in two different voices.
     This grand song is performed by Santosh Juvekar and VaibhavTatwawaadi backed by the powerful dialogues of Sachin Pilgaonkar in background making it more gripping. ‘NaadKaraycha Nay' music is given by singer himself AvdhootGupte and penned by Guru Thakur.
    Ranangan is presented by 52 Weeks Entertainment, in association with Global Sports Entertainment and Media Solutions (GSEAMS) and Harvey Films being produced by Karishma N. Jain and Joe Rajan and co-produced by Arjun SingghBaran, Swwapnil Joshi and Kartik Nishandar and directed by Rakesh Sarang.
Seeing the upbeats of ‘NaadKaraycha Nay’ we believe its surely going to be a new dancing number of this year.



No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...