Saturday, May 26, 2018


~ शिवानी तोमर आणि राहूल शर्मा यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा शो २८ मेपासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता प्रसारित होणार आहे, केवळ & TVवर~
मुंबई, २३ मे २०१८रावणाने सितेला पळवून नेले, कारण तिने लक्ष्मणरेषेच्या मर्यादा ओलांडल्या, हे पिढ्यानपिढ्या आपण ऐकतो आहोत. आजच्या काळात लिंगसमानता, महिलांचे स्वातंत्र्य, त्यांचे आर्थिक सक्षमीकरण या बद्दल जगभरात तावातावाने बोलत असताना, सितेसाठी आखलेली ही लक्ष्मणरेषा आजच्या काळातही सुसंगत ठरते का? आजही बऱ्याचदा महिलांनाच लक्ष्य केले जाते आणि काहीही झाले तरी त्याबाबत महिलांनाच प्रश्न विचारले जातात. महिलांभोवती आखलेल्या सीमारेषा आणि सामाजिक नियम योग्य आहेत का? कांचन आणि विशेष यांच्या नजरेतून या विचारांच्या मूळापर्यंत जात & TV या वाहिनीने मिटेगी लक्ष्मण रेखा ही नवी मालिका निर्माण केली आहे. २८ मे २०१८ पासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता ही मालिका प्रसारित होणार आहे. कांचन... एक आधुनिक मुलगी. बाहेरच्या सीमारेषा तिला तिच्या स्वप्नांपासून कधीही रोखू शकल्या नाहीत. पण, ती तिच्या मनातल्या गोंधळाशीच सामना करते आहे. ती विशेषला भेटते, त्यानंतर तिच्या आयुष्याला खरे वळण मिळते. विशेष हा कांचनसारखाच विचार करणारा आधुनिक मुलगा आहे. त्याला समाजातली पुरूषसत्ताक मानसिकता अजिबात मान्य नाही.
शशी सुमीत प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड या निर्मितीसंस्थेने निर्माण केलेल्या मिटेगी लक्ष्मणरेखा या मालिकेत शिवानी तोमर आणि राहूल शर्मा यांनी प्रमुख भूमिकेत कांचन आणि विशेष ही पात्रे रंगवली आहेत. मथूरेच्या पार्श्वभूमीवर असलेल्या या मालिकेत कांचन आणि विशेष या दोन भिन्न वातावरणात वाढलेल्या पात्रांची कथा रंगवण्यात आली असून हे दोघेही प्रगत विचारांचे आणि सारख्याच तत्वांना मानणारे आहेत. कांचन अत्यंत सामान्य कुटुंबातून आली असून तिचे स्वतःचे ब्युटी पार्लर आहे. विशेष हा मात्र राजेशाही घराण्यात जन्माला आलेला तरुण. तो आदर्शवादी, प्रगत विचारांचा आणि आपल्या शब्दाला जागणारा तरुण पुरूष आहे.
कांचनचे पात्र रंगवताना आलेल्या अनुभवांबाबत बोलताना टिव्ही अभिनेत्री शिवानी तोमर म्हणाली, “मला तुम्ही यापूर्वी ज्या भूमिकांमध्ये पाहिले आहे, त्यापेक्षा कांचनचे पात्र अतिशय वेगळे आहे. तिच्या नावाप्रमाणेच, तिचे मन सोन्याचे आहे. ती कुटुंबवत्सल आणि प्रत्येक बाबतीत स्वतंत्र आहे. आपले आयुष्य कायमचे बदलू शकेल अशी एकही अनियोजित आणि अप्रिय घटना आपल्या आयुष्यात घडूच शकत नाही, असा तिचा ठाम विश्वास असतो. आपले व्यक्तिमत्व आणि आयुष्य घडवण्याचा, त्याला आकार देण्याचा निर्णय, निवड संपूर्णतः आपली असते. इतके सुंदर आणि शक्तीशाली आणि अनेकांना प्रेरणा देणारे पात्र वठवण्याची मला संधी मिळाली, त्याबद्दल मला खूप आनंद होतो आहे."
त्यानंतर, विशेषची भूमिका पार पाडणारा राहूल शर्मा म्हणाला, “परिस्थितीचे स्वतःच्या पद्धतीने विश्लेषण करून मगच योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरवणारा विशेष हा स्वतंत्र विचारांचा प्रगत तरुण आहे. समाजाने आखून दिलेल्या व्याख्या तो मानत नाही. विशेषचे पात्र रंगवताना मला फार आनंद होतो. हे पात्र कांचनच्या आयुष्यात ज्या प्रकारे एकरूप होते, ते फारच सुंदररित्या यात दाखवण्यात आले आहे. महिलांच्या पाठीशी उभे राहणारे विशेषसारखे आणखी बरेच पुरूष आपल्या समाजात असायला हवेत. मिटेगी लक्ष्मणरेषा या मालिकेच्या अद्वितीय प्रवासात प्रेक्षकही आमची साथ देतील, अशी मला आशा आहे."
शिवानी तोमर आणि राहूल शर्मा यांच्यासह मिटेगी लक्ष्मणरेषा या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री जयश्री टी, वैष्णवी मॅकडोनाल्ड, अमित ठाकूर, राहूल लोहानी आणि रवी गोसेन यांसारखे उत्तम कलाकार आहेत.
कांचन आणि विशेष यांनी आपापल्या लक्ष्मणरेषा ओलांडल्या, ते प्रेमात पडले आणि भविष्याची स्वप्न एकत्र पाहू लागले. त्यांची कथा पाहण्यासाठी पहात रहा, मिटेगी लक्ष्मणरेषा.. २८ मे २०१८ पासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता.. फक्त & TVवर.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...