Monday, July 30, 2018

ओलाने प्रवास करा व एसओटीसीतर्फे मॉरिशसला जायची संधी जिंका
एसओटीसी ट्रॅव्हलने 20 जुलै ते 4 ऑगस्ट 2018 या कालावधीतील दोन आठवड्यांच्या स्पर्धेसाठी ओला या भारतातील आघाडीच्या व जगातील एका सर्वात मोठ्या राइड-शेअरिंग कंपनीशी सहयोग केला आहे. ही स्पर्धा ओला अॅपवर घेतली जाणार असून ती केवळ मुंबई व पुणे येथील युजर्ससाठी असणार आहे. जे ओला युजर दोन आठवड्यांमध्ये जास्तीत जास्त वेळा प्रवास करतील व कोड एसओटीसी वापरतील, त्यांना 6 रात्री/7 दिवस मॉरिशसला विनामूल्य ट्रिप जिंकण्याची संधी मिळू शकतेहा कोड ओला मायक्रो, मिनी व प्राइम राइडसाठी लागू असेल.
या सहयोगाविषयी बोलताना, एसओटीसी ट्रॅव्हलचे भारत, एनआरआय मार्केट्स व ई-कॉमर्सचे सेल्स हेड डॅनिएल डिसोझा म्हणालेओला ही देशातील आघाडीची राइड-शेअरिंग कंपनी आहे आणि कंपनीच्या युजरची संख्या प्रचंड आहे. प्रामुख्याने मेट्रोमध्ये ही संख्या अधिक आहे. ओलाशी सहयोग करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. प्रायोगिक हॉलिडेबद्दलच्या ट्रेंडबद्दल आम्ही आशादायी आहोत. मॉरिशसला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत आहे. प्रवाशांना विविध प्रकारच्या संस्कृतींचा अनुभव घेता येऊ शकतो, तसेच त्यांना मॉरिशसमध्ये मासेमारी, स्कुबा-डायव्हिंग व खरेदी यांचा आनंद घेता येईल. दोन ग्राहक-केंद्री ब्रँडदरम्यानची ही विशेष भागीदारी आमच्या ग्राहकांसाठी फायद्याची ठरणार आहे आणि आम्हाला मुंबई व पुणे येथील ओला युजर्सप्यंत पोहोचण्यासाठीही उपयोगी ठरणार आहे.”
ओलाचे मुंबई सिटी हेड शेखर दत्ता म्हणाले, आम्ही ग्राहकांसाठी नेहमीच विशेष वाहतूक सुविधा देण्याचा प्रयत्न करतोहा उपक्रम मुंबई व पुणे येथे दाखल करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. देशातील आघाडीची स्मार्ट मोबिलिटी सुविधा म्हणून, आम्ही ग्राहकांच्या रोजच्या पॉइंट-टू-पॉइंट प्रवासाच्या पलीकडच्या वाहतुकीच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यावर नेहमी भर देतोआणि एसओटीसीबरोबरची ही भागीदारी या दिशेने योग्य पाऊल आहे.  

एसओटीसी ट्रॅव्हल लिमिटेडविषयी
एसओटीसी ट्रॅव्हल लिमिटेड (अगोदरचे नाव एसओटीसी ट्रॅव्हल प्रालि.) ही फेअरफॅक्स फिनान्शिअल होल्डिंग्स ग्रुपच्या थॉमस कुक (इंडिया) लिमिटेड (टीसीआयएल) या भारतीय नोंदणीकृत उपकंपनीकडे असलेली स्टेप-डाउन उपकंपनी आहेएसओटीसी इंडिया ही लिजर ट्रॅव्हल, इन्सेन्टिव्ह ट्रॅव्हल व बिझनेस ट्रॅव्हल अशा विविध श्रेणींमध्ये कार्यरत असलेली आघाडीची ट्रॅव्हल व टुरिझम कंपनी आहे. एसओटीसीची स्थापना सन1949 मध्ये करण्यात आलीतेव्हापासूनकंपनीने 68 हून अधिक वर्षे जगातील लाखो प्रवाशांना जगभरातील विविध ठिकाणी जाण्यासाठी सेवा दिली आहे. कंपनी एस्कॉर्टेड ग्रुप टूर्स, कस्टमाइज्ड हॉलिडेज, हॉलिडेज ऑफ इंडिया व इन्सेन्टिव्ह ट्रॅव्हल अशा श्रेणींमध्ये आघाडीवर आहे. अत्याधुनिक, नावीन्यपूर्ण हॉलिडे कंपनी असलेली एसओटीसी प्रत्येक भारतीयाला हॉलिडेंना प्राधान्य देण्यासाठी उत्तेजन देते. आम्ही हॉलिडेंसाठी आहोत आणि भारतीयांनी त्यांच्या हॉलिडेंना प्राधान्य द्यावे, असे आम्हाला वाटते.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...