Saturday, July 28, 2018

गुरूपौर्णिमेच्या दिवशी स्वामीच्या चरणी स्वप्नील नतमस्तक


आज सकाळीच स्वप्नील जोशी याने आपल्या सोशल मिडियावर आपल्या चाहत्यांना गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा देत आपण गुरूभेटीला चालल्याचं म्हटलं होतं. हे गुरू नक्की कोणहे जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक झाले होते. तर आजच्या या दिवशी स्वप्नील अक्कटलकोट स्वामींच्या दर्शनाला पोहोचला आहे. दरवर्षी गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे आयोजन केले जाते. या वर्षीही मोठ्या थाटामाटात हा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे आणि यंदा हा पालखीचा मान स्वप्नील जोशी याला मिळालेला आहे. वर्षभर आपल्या गुरूंची आठवण असू द्याच पण आजच्या दिवशी नक्कीच आपल्या गुरूंचरणी नतमस्तक व्हाअसं म्हणणाऱ्या स्वप्नीलने आज आपल्या गुरूंचरणी नतमस्तक होण्यासाठी थेट अक्कलकोट गाठलं आहे. गुरूंच्या स्मरणार्थ घडलेली अक्कलकोटवारी स्वप्नीलला मुंबई-पुणे-मुंबई च्या प्रवासात कामी येईलयात शंकाच नाही.







No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...