Thursday, August 16, 2018



अजय भाळवणकर
कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख सोनी मराठी
सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया (एस्.पी.एन्)

           एस्.पी.एन् च्या  सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या सोनी एन्टरटेन्मेंट चॅनेलची  (एस्.ई.टीचे) प्रमुख निर्मिती संचालक म्हणून जबाबदारी पार पाडलेले अजय भाळवणकर हे आता एस्.पी.एन्तर्फे लवकरच सुरू होणार्‍या सोनी मराठीह्या मराठी वाहिनीचे व्यवसाय प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत.
सोनी पिक्चर्स नेटवर्क्सबरोबर २०१४ सालापासून कार्यरत असणाऱ्या अजय ह्यांनी यापूर्वी झी टीव्ही, म्युझिक एशिया अशा वाहिन्यांमध्ये विविध पदांवर काम केले असून मराठी आणि हिंदी वाहिन्यांच्या शुभारंभापासून ते चित्रपट निर्मिती आणि चित्रपट निर्मिती स्टुडिओ स्थापन करणे अशा अनेकविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. झी नेटवर्कमध्ये ते क्रीएटिव्ह हेड होते आणि तिथे त्यांनी दर्जेदार,आणि कमालीचे लोकप्रिय कार्यक्रमातून आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. याबरोबरच मुंबईचे प्रमुख मराठी वृत्तपत्र आपलं महानगरआणि क्रीडापाक्षिक एकच षटकारह्यांमध्ये पत्रकार म्हणूनही त्यांनी याआधी आपला ठसा उमटवला आहे.
          एक उत्साही अभ्यासू म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट बघण्याबरोबरच इतिहास आणि तत्त्वज्ञान ह्या विषयांमध्ये विशेष रुची असलेल्या अजय ह्यांनी मुंबई विद्यापीठातून फ्रेंच साहित्य ह्या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर MICA, अहमदाबाद येथून व्यवस्थापन विषयाची पदवी देखील प्राप्त केली. खेळांमध्ये विशेष आवड असलेले अजय हे बॅडमिंटनपटू असून, त्यांनी महाविद्यालयीन पातळीवर पाच वर्षे सातत्याने पदके मिळविली आहेत.


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...