Sunday, August 26, 2018

एका अस्सल प्रेम कथेतली
अटी आणि शर्तींची’ मनोज्ञ गुंतागुंत
सोनी मराठी इयर डाउन

       जाहिरातींमधील अटी आणि शर्ती लागू’ हे छोट्या आकारातले शब्द आपल्याला विचार करायला लावतात आणि एखादी शंकाही येते. हेच वाक्य जर एखाद्याच्या आयुष्याचाच भाग होत असेल तर...
जनमेजय हा संपन्न कुटुंबातला. पण वडिलांच्या मनाविरुद्ध म्हणजेच  अटी आणि शर्तीविरुद्ध त्याने वायनरी टाकलीय...त्यामुळे तेढ आहे...आईनं त्याला सगळ्या बाबतीत पंखाखाली घेतलाय...आज उद्योजक असला तरीही...
       इथे एक युवती जनमेजयच्या जीवनात येते...दोघेही प्रेमात पडतात....
इथपर्यंत सगळं ठीक...लग्नालाही मुलीकडून होकार आहे...पण..
आड येतात अटी आणि शर्ती...
मुलीच्या वडीलांची अट अशी की जनमेजयने अभियांत्रिकीची पदवी मिळवायला हवीच...सुरुवात महाविद्यालयातल्या प्रवेशापासून असली तरी पुढे आणखी किती अटी आणि शर्ती लागू होणार कुणास ठाऊक!
     जनमेजयच्या भूमिकेतील संतोष जुवेकर आणि अभिनेत्री प्रणाली घोगरे तसेच दिग्दर्शक समीर पाटील यांनी कालच्या उद्घाटन एपिसोडला षटकार ठोकला आहे.
आणि मुख्य म्हणजे सोनी वाहिनीची ही आग्रही मालिका बघायला कोणत्याही अटी आणि शर्ती लागू नाहीत.









No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...