Saturday, August 18, 2018

गोदरेज तर्फे ‘प्रोटेक्ट मि.मॅजिक’ पावडर टू लिक्विड हँडवॉश दाखल
भारतातील हँडवॉश उद्योगाची उलाढाल ७४० कोटी रुपये आहे

मुंबई, १७ ऑगस्ट २०१८: सामाजिक बदल घडवून आणतील, अशी नावीन्यपूर्ण उत्पादने तयार करण्यावर भर देत, गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडने 'प्रोटेक्ट मि. मॅजिक' हा पहिलावहिला पावडर टू लिक्विड हँडवॉश सादर केला आहे. भारतातील हँडवॉश उद्योगाची उलाढाल ७४० कोटी रुपये आहे व त्यामध्ये होणारी वाढ १५% आहे. हँडवॉशिंग सोप्सची उलाढाल ८००० कोटी रुपये आहे. परंतु, हँडवॉशच्या प्रमाणात होणारी वाढ अतिशय मंद आहे व शहरी भागात अंदाजे २०% असलेल्या उच्च एसईसीपुरती मर्यादित आहे. म्हणजे केवळ २ कोटी घरांमध्ये लिक्विड हँडवॉशचा वापर केला जातो.

गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे (जीपीसीएल) भारत व सार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कटारिया यांनी सांगितले, “लिक्विड हँडवॉश महाग असतात, या समजामुळे अनेक घरे त्याचा वापर करणे टाळतात. प्रत्येक घराला लिक्विड हँडवॉश खरेदी करणे परवडेल अशा भविष्याचे स्वप्न आम्ही नेहमी पाहिले आहे. प्रोटेक्ट मि. मॅजिक या पहिल्यावहिल्या पावडर टू लिक्विड हँडवॉशमध्ये नीम व अॅलो व्हेरा असे नैसर्गिक घटक समाविष्ट केलेले आहेत. नीममधील जर्मिसायडल गुणधर्म व अॅलो व्हेरामधील उपयुक्तता, यामुळे हे उत्पादन हातासाठी सौम्य व जर्मसाठी कठोर आहे. प्रोटेक्ट मि. मॅजिकची किंमत माफक असल्याने सर्व श्रेणीतील व विविध ठिकाणच्या भारतीय घरांना हायजेनिक जीवनशैलीसाठी या नावीन्यपूर्ण स्वरूपातील हे उत्पादन खरेदी करणे शक्य होईल.”

न्यू हॉरिझोन्स चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर अँड रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक–संचालक डॉ. समीर दलवाई यांनी सांगितल, “हाताच्या स्वच्छतेकडे विशेषता सार्वजनिक आरोग्याचा अतिशय किफायतशीर उपाय म्हटले जाते. त्यामध्ये जगभरात आजारांचे प्रमाण लक्षणीय कमी करण्याची क्षमता  आहे. पाच वर्षांखालील अंदाजे १.५ दशलक्ष बालके दरवर्षी डायरियामुळे दगावतात. आवश्यक त्या वेळी सोप किंवा लिक्विड हँडवॉशने हात धुतल्याने–खाण्यापूर्वी किंवा अन्न शिजवण्यापूर्वी व शौचालयाचा वापर केल्यावर–डायरियाचे प्रमाण ४०% पेक्षा कमी होऊ शकते.”

हँडवॉशिंग सोप्सच्या तुलनेत, लिक्विड हँडवॉश अधिक आरोग्यदायी आहे, अधिक स्वच्छ आहे व वापरण्यास सोयीचा आहे. एखाद्याने हात धुतले की हँडवॉशिंग सोप खराब दिसू लागतो, पण लिक्विड हँडवॉशचा थेंब अन् थेंब स्वच्छ, अस्पर्शी व किटाणूरहित असतो. प्रोटेक्ट मि. मॅजिकची किंमत किफायतशीर असल्याने, साबणापेक्षा हँडवॉश स्वस्त ठरतो. लोकांमध्ये लिक्विड हँडवॉशने हात धुण्याची सवय बाणण्यासाठी, ही सर्व वैशिष्ट्ये अतिशय उपयोगी ठरतात.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...