Thursday, February 18, 2021

First Marathi Zombie horror comedy Zombivli releases its teaser. Announces theatrical release date

First Marathi Zombie horror comedy Zombivli releases its teaser. Announces  theatrical release date



    Acclaimed director Aditya Sarpotdar is getting ready for the release of his next Marathi film – the quirkily titled horror-comedy revolving around zombies -  'Zombivli – a first of its kind for Marathi cinema. '. After the initial poster launch which caused a fair amount of excitement amongst audiences, the makers today dropped the teaser of the film, which stars Amey Wagh, Lalit Prabhakar, and Vaidehi Parashurami in lead roles. The film will be releasing in theatres on 30th April 2021.

While 2020 saw a practical standstill of shooting for new and existing projects in the film industry, Zombivli was the first Marathi film that went on floors when the first set of Unlock rules came into play. Produced by Yoodlee Films, the film was extensively shot in and around Mumbai and Latur, with the cast and crew adapting and following the strict hygiene protocols that were mandated by the government. Now with a teaser release, Zombivli also becomes the first Marathi film to announce its theatrical release date, as the movie theatres slowly reopen to full occupancy.

Based on a unique premise of zombies taking over a popular and busy Mumbai suburb due to certain circumstances, the teaser is a mix of humor combined with elements of horror, that is guaranteed to get audiences hooked. The ensemble cast of Amey, Lalit, and Vaidehi work together to create an atmosphere of intrigue and comedy, that sets audiences up well for the subsequent trailer launch in the coming weeks.

 

         Aditya Sarpotdar, commenting on the teaser launch of the film said: It's an absolutely unique story. Horror comedy is rare in Marathi cinema, and to add zombies to the genre, is a first of its kind. The poster of the film had created massive interest and engagement among movie lovers when we had launched it last year, and the teaser now offers fans a glimpse of the world of Zombie. We shot the film with unprecedented circumstances, and the fact that it will get a theatrical release soon is both a matter of excitement and pride. Look forward to the trailer soon – I promise you a good time at the movies.


झोंबिंवर आधारित पहिला मराठी चित्रपट ' झोंबिवलीचा ' टिझर लाँच!


or


आदित्य सरपोतदार दिग्दर्शित "झोंबिवलीचा " टिझर लाँच! रिलीजची तारीख जाहीर.


or


झोंबिवलीचा टिझर लाँच - अमेय, ललित आणि वैदेही लढणार झोंबीसोबत.


or


' झोंबिवलीचा ' टिझर लाँच ! पहिलाच झोंबिंवर आधारित हॉरर - कॉमेडी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला.


फास्टर फेणे, क्लासमेट्स,  माऊली ह्यासारख्या अप्रतिम चित्रपटांचे  दिग्दर्शक आदित्य सरपोतदार लवकरच त्यांचा

बहूचर्चित ' झोंबिवली ' हा  सिनेमा प्रेक्षकांसमोर सादर करणार आहेत. चित्रपटाच्या पोस्टर लाँचनंतर प्रेक्षकांची उत्सुकता वाढली 

होती. नुकताच ह्या चित्रपटाचा टिझर लाँच करण्यात आला आहे . अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी ह्यांची

प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ३० एप्रिल पासून प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहता येईल. 


२०२० मध्ये सिनेसृष्टीतल्या सर्वच कामांना ब्रेक लागला होता, पण झोंबिवली हा पहिला मराठी चित्रपट आहे ज्याचे चित्रीकरण

अनलॉक फेजमध्ये करण्यात आले होते. यौडली फिल्म्सची निर्मिती असलेल्या झोंबिवलीचे चित्रीकरण मुंबईसह लातूरमध्ये

करण्यात आले आहे. चित्रीकरण दरम्यान सर्व कलाकार व टीमने सरकारने  आखून दिलेल्या नियमांचे पालन करूनच चित्रीकरण

केले. त्याचबरोबर झोंबिवली हा असा पहिला मराठी चित्रपट असेल ज्याची चित्रपटगृहात रिलीज होण्याची घोषणा झाली आहे. 


मुंबईच्या एका लोकप्रिय आणि गजबजलेल्या उपनगराचा ताबा घेणाऱ्या झोंबीवर हा चित्रपट आधारित आहे. टिझरमध्ये

प्रेक्षकांना हॉरर आणि कॉमेडीचे मिश्रण बघायला मिळेल. अमेय, ललित आणि वैदेही हे तिन्ही कलाकार प्रेक्षकांच्या मनात

कुतूहल आणि हास्याचे वातावरण निर्माण करतात. 


ह्या सिनेमाविषयी बोलताना दिग्दर्शक आदित्य सरपोतदार म्हणतात, " मराठी मध्ये हॉरर- कॉमेडी सिनेमे तसे खूप

कमी बनवले जातात आणि झोंबीवर आधारित हा पहिलाच सिनेमा असेल. चित्रपटाची गोष्टसुद्धा खूप हटके आहे. गेल्या वर्षी

आम्ही चित्रपटाचे पोस्टर लाँच केले,  तेव्हा प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती आणि आता ह्या टीझरमुळे 

चाहत्यांना झोंबिवलीच्या जगाची झलक पाहायला मिळेल.आम्ही खूप आव्हानात्मक परिस्थितीत ह्या 

सिनेमाचे शूटिंग केले. लवकरच हा सिनेमा चित्रपटगृहात रिलीज होणार आहे, त्यामुळे अभिमान आणि उत्साह वाटतो. लवकरच

चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा रिलीझ होईल व प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडेल याची मला खात्री आहे."


असा हा भव्य चित्रपट अनेक अर्थांनी अनोखा आहे. प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा आवर्जून पाहावा.




No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...