Wednesday, February 3, 2021

धर्मेश सरांच्या वडिलांची डान्सच्या महामंचावर हजेरी! OR 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' या मंचावर आले धर्मेश सरांचे वडील!

 धर्मेश सरांच्या वडिलांची डान्सच्या महामंचावर हजेरी!  or 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सरया मंचावर आले धर्मेश सरांचे वडील

डान्सचा टॉप गियर धर्मेश सर म्हणजे सर्व नृत्यप्रेमींच्या गळ्यातला ताईत आहेतखूप मेहनत करून आणि आपल्या टॅलेंटच्या जोरावर धर्मेश  सरांनी यशाची शिखरं गाठलीत्यांच्या या यशात त्यांना पहिल्या पावलापासून साथ दिली ती त्यांच्या वडिलांनीत्याचे वडील हे त्यांचे खरे आदर्श आहेत

या आठवड्यातल्या 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर'च्या भागाची थीम आहे पहिला अनुभव

 

स्पर्धक प्रथमेश आणि त्याचा गुरू आकाश यांनी धर्मेश सरांचा पहिला इंटरव्ह्यू आणि त्यांचा एकंदरीत प्रवास दाखवला आहेत्यात त्यांना त्यांच्या वडिलांनी पहिल्यांदा पाठिंबा कशा प्रकारे दिला आणि त्यांचा पुढचा प्रवास कसा घडत गेलाहे नृत्यातून दाखवलं आहेया सादरीकरणाच्या शेवटी धर्मेश सरांचे वडील मंचावर आले आणि त्यांना पाहून धर्मेश सर भावुक झालेधर्मेश सरांसाठी हे एक सरप्राईज होतंआपल्या मुलाची प्रगती बघून आणि त्याला परीक्षकाच्या खुर्चीत बसलेला पाहून त्याचे वडील खूप खूश होते

 

त्यांच्या वडिलांनी हेही सांगितलं कीत्यांची फार इच्छा होती की धर्मेश सरांनी एखाद्या मराठी कार्यक्रमाचं परीक्षण करावं. 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सरआणि सोनी मराठी वाहिनी यांच्यामुळे त्यांची ही इच्छा पूर्ण झाली आहे आणि यासाठी त्यांनी सोनी मराठी वाहिनीचे आभार मानले

 

पाहा, 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर', सोम.-मंगळ., रात्री  वाफक्त सोनी मराठी वाहिनीवर.














No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...