Monday, February 13, 2023

‘घर बंदूक बिरयानी' ७ एप्रिलला होणार प्रदर्शित

 ‘घर बंदूक बिरयानी' ७ एप्रिलला होणार प्रदर्शित 


झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे एकत्र येऊन मराठी सिनेसृष्टीला नेहमीच काहीतरी भन्नाट देतात. असाच एका जबरदस्त चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या मनोरंजनसाठी झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे सज्ज झाले आहेत. काही महिन्यांपूर्वीच हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित  'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटाचे टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.  पोलीस आणि डाकू यांच्यातील चकमक यात दिसत होती. हे नेमकं काय प्रकरण आहे, हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता लागलेली असतानाच आता या चित्रपटाचे एक नवीन पोस्टर झळकले आहे. यात चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. येत्या ७ एप्रिल रोजी ‘घर बंदुक बिरयानी’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि नागराज पोपटराव मंजुळे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट एकाच वेळी मराठी, हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे.

झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे यांनी यापूर्वी एकत्र येऊन फॅंड्री, सैराट, नाळ यांसारखे सुपरहिट चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिले आणि आता ‘घर बंदुक बिरयानी’ हा एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट ते आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...