Thursday, February 2, 2023

'जिवाची होतिया काहिली'

 'जिवाची होतिया काहिलीया मालिकेत प्रदीप वेलणकर तात्यांच्या भूमिकेत.

  'जिवाची होतिया काहिलीसोमते शनिसंध्या. 7.30 वासोनी मराठी वाहिनीवर.

 


सोनी मराठी वाहिनीवरील 'जिवाची होतीया काहिलीही मालिका महाराष्ट्र आणि कानडी यांच्या प्रेमावर भाष्य करते आहेप्रमुख नायकाच्या भूमिकेत कोल्हापूरचा रांगडा गडीअभिनेता राज हंचनाळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतोयतसेच प्रतीक्षा शिवलकर हिचा कानडी अंदाजसुद्धा प्रेक्षकांना आवडतो आहेमराठी रांगडा गडी अर्जुन आणि कानडी भाषिक रेवथी यांची ही प्रेमकहाणी सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळते आहेसोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात व्यग्र आहेसोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या 'जिवाची होतिया काहिलीया प्रेमकहाणीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते आहेसध्या मालिका रंगतदार वळणावर येऊन पोचली आहेअर्जुन आणि रेवथी यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते आहे.

सध्या गावात मराठी शाळा बंद करण्यावर अप्पा भर देत आहेतत्याविरुद्ध अर्जुनचा लढा सुरू आहेचपण तात्यांचे गावात पुनरागमन झाले आहेते आता अर्जुनला कशा प्रकारे मदत करतीलहे पाहायला मिळेलपण मालिकेत आता तात्यांचा भूमिकेत प्रदीप वेलणकर पाहायला मिळणार आहेतनिरनिराळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर येणारे दिग्गज अभिनेते प्रदीप वेलणकर आता तात्यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेततात्यांचे महाराष्ट्रावरील प्रेम आणि मराठी भाषेवरील प्रभाव प्रदीप वेलणकर कशा प्रकारे निभावतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहेअर्जुन आणि रेवथी यांचे प्रेम यापुढे कसे फुलत जाणार आहेहे पाहायला मिळेल.

 मराठी रांगडा गडी अर्जुन आणि कानडी भाषिक रेवथी यांची ही प्रेमकहाणी पाहायला विसरू नका,                     'जिवाची होतिया काहिली' सोमते शनिसंध्या. 7.30 वासोनी मराठी वाहिनीवर.


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...