Monday, September 4, 2023

अभिनेत्री 'अंकिता राऊत' आणि अभिनेता 'हरिश वांगीकर' 'छम छम पाऊस' गाण्यासाठी पहिल्यांदाच एकत्र!

अभिनेत्री 'अंकिता राऊत' आणि अभिनेता 'हरिश वांगीकर' 'छम छम पाऊस' गाण्यासाठी पहिल्यांदाच एकत्र!



कोळी गाण्यांची लोकप्रियता पुढ नेत अभिनेत्री 'अंकिता राऊत' आणि टक्सीडो फेम अभिनेता 'हरिश वांगीकर' यांचे बहुप्रतिक्षित 'छम छम पाऊस' हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. विशेष म्हणजे या गाण्याचे संगीतकार, गीतकार आणि गायक हरिश वांगीकर असून या गाण्याचे संगीत संयोजक मॅक्सवेल फर्नांडीस आहे. तर गाण्याचे दिग्दर्शक कैलास पवार आहेत. हे गाणं अविनाश पायाळ याने कोरिओग्राफ केलं आहे. शिवाय प्रसन्नाचं रॅप सॉंग देखील यात आहे. यंदा पावसाचे दिवस असूनही हवा तितका पाऊस पडत नाही आहे. म्हणून प्रथमच आर्टिफिशियल पावसात 'छम छम पाऊस' हे गाणं‌ शुट करण्यात आलं.

या गाण्याच्या प्रोसेसविषयी संगीतकार, अभिनेता हरिश वांगीकर सांगतो, "मी एकदा पाऊस बघत बघत गाणी ऐकत होतो. तेवढ्यात माझ्या प्लेलिस्टमध्ये एक गरब्याचं गाणं सुरू झालं आणि मला हे गाणं सुचलं. 'छम छम पाऊस' हे पावसावरील रोमँटिक गाणं आहे. आणि स्पेशली या गाण्याचं म्युझिक ट्रेडिशनली गरबा फॉर्ममध्ये आहे. तर या गाण्याचे बोल मराठी आहेत."


पुढे तो सांगतो, "माझा मित्र अविनाश पायाळ याने या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे. अविनाश आणि अंकिता सोबत रिअर्सल करताना खूप धमाल आली. पण ॲक्च्युल शुट करताना पावसात भिजून भिजून फार थंडी वाजत होती. या गाण्याला सोशल मीडियावर खूप प्रेम मिळतं आहे. ते पाहून खूप आनंद होत आहे. तसेच मायबाप प्रेक्षकांचे मनापासून आभार!"

अभिनेत्री अंकिता राऊत शुटिंगचा किस्सा शेअर करताना सांगते, "गाण्याची शुटिंग पुण्यातील एका सुंदर रिसॉर्टमध्ये होती. पहाटेचं शुटं होतं. थोडा फार पाऊस पडला. आणि नंतर पाऊसच नव्हता. मग आम्ही आर्टिफिशियल पावसात संपूर्ण गाणं शुटं केलं. खरंतर आर्टिफिशियल पाऊस पडताना दाखवणं सोप्पं नाहीयं‌ पण या गाण्याच्या टिमने फार मेहनत केली. रेन डान्स चालू केलेला म्हणून मी स्वताहूनच तिथे जाऊन नाचत होते. आणि मी काही व्हिडिओ शूट केले. आणि नंतर मला असं सांगण्यात आलं की आता इथे गाण्यासाठीचे टेक घ्यायचेत. मग ते टेकस घेताना माझ्या नाकातोंडात पाणी गेलं आणि भयानक थंडी वाजत होती. त्यामुळे थोडा ब्रेक घ्यावा लागला. मी आधीच मस्ती म्हणून स्वतःच जाऊन भिजलेले. अचानक लाईट सुद्धा गेली त्यामुळे नेक्स्ट डे शूट केलं. परंतु शूट करताना मला खूप मजा आली."


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...