Monday, September 4, 2023

सोनी मराठी वाहिनीवरील मालिकांमध्ये साजरे होणार आगळीवेगळे रक्षाबंधन.

 सोनी मराठी वाहिनीवरील मालिकांमध्ये साजरे होणार आगळीवेगळे रक्षाबंधन.


सोनी मराठी वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी आपल्या मालिकांमधून नेहमी काहीतरी नवनवीन करण्याचा प्रयत्न करतेमालिकांचे विविध विषय असोत वा  व्यक्तिरेखेची नवी एन्ट्रीहे नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेआत्ता ज्या मालिका सुरू आहेत त्यांत नेहमीच्याच उत्कंठावर्धक गोष्टी पाहायला मिळणार आहेतआता मालिकांत वेगवेगळ्या प्रकारे रक्षाबंधन प्रसंग साजरे केले जाणार आहेत.


 'तुजं माज सपानमालिकेत पैलवान प्राजक्ता आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी पुन्हा आपल्या घरी  जाणार आहेतर 'अबोल प्रीतीची अजब कहाणीया मालिकेत मयूरीचा भाऊ भाऊसाहेब चक्क मयूरीलाच राखी बांधताना पाहायला मिळणार आहेमयूरी ज्या प्रकारे आपल्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी मेहनत करते आहेआपल्या कुटुंबाची काळजी घेते आहेत्यासाठी चक्क भाऊसाहेबच मयूरीला राखी बांधून एक आगळेवेगळे रक्षाबंधन साजरे करणार आहेत.



'राणी मी होणारया मालिकेतही वेगळ्या प्रकारे रक्षाबंधन साजरे केले जाणार आहेआपल्या कुटुंबाचे रक्षण करणाऱ्या मीरासाठी तिची बहीण मेघ थेट सलूनमध्ये राखी घेऊन पोहोचतेआपल्या संपूर्ण कुटुंबासाठी झटणाऱ्या मीराला ती राखी बांधणार आहे आणि या बहिणींमधले प्रेम यातून दिसून येणार आहे.


 'छोट्या बयोची मोठी स्वप्नंया मालिकेतही रक्षाबंधन पाहायला मिळणार आहेएवढ्या वर्षांनी आपला भाऊ आरव आणि बहीण इरा यांना भेटल्यावर बयोला आनंद झाला आहेरक्षाबंधन असल्यामुळे बयो आरवसाठी राखी घेऊन जातेआता त्यांचे रक्षाबंधन कशा प्रकारे साजरे होईलहे मालिकेत पाहायला मिळेलतर अशा प्रकारे रक्षाबंधनाचे  आगळेवेगळे प्रसंग या मालिकांतून पाहायला मिळणार आहेतबुधवार ३० ऑगस्ट रोजी आपल्या लाडक्या सोनी मराठी वाहिनीवर संध्याकाळी  वाजल्यापासून...

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...