Tuesday, August 20, 2024

अमित राज आणि प्रियांका बर्वे यांची नवी इनिंग सुपरस्टार सिंगर मध्ये दिसणार परिक्षकांच्याभूमिकेत

                  अमित राज आणि प्रियांका बर्वे यांची नवी इनिंग सुपरस्टार सिंगर मध्ये  दिसणार  परिक्षकांच्याभूमिकेत

छोट्या पडद्यावरील सुपरस्टार सिंगर हा सोनी मराठीवरील नवा कार्यक्रम  लवकरच सुरु होणार आहेया  कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून याचे परीक्षक कोण असणार याची  उत्सुकता लागून राहिली होतीआपल्या सुमधुर आवाजाने मंत्रमुग्ध करणारी  प्रियांका बर्वे आणि आपल्या संगीताच्या जादूने  रसिकांची मने जिंकणारे अमित राज  या  कार्यक्रमात परीक्षकाच्या  भूमिकेत दिसणार आहेतयाआधी चित्रपटातील गाण्यांच्या माध्यमातून आणि वेगवगेळ्या कार्यक्रमात या दोघांच्या गीतसंगीताची मेजवानी रसिकांनी अनुभवली आहेया कार्यक्रमासाठी ऑनलाईन ऑडिशन्स सुरू झाल्या असून सोनी लिव्ह या अॅपवर जाऊन इच्छुक स्पर्धकांनी आपले ऑडिशन व्हिडीओ पाठवायचे आहेत२४ ऑगस्ट  ही ऑडिशन पाठवण्याची शेवटची तारीख असणार आहेआता ऑडिशन प्रक्रिया सुरू झालेले असूनलवकरच निवडलेले स्पर्धक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. 


स्वरांच्या  दुनियातील  उद्याचा आवाज  सोनी मराठी वाहिनीच्या माध्यमातून रसिकांना  ऐकायला मिळणार आहे.  अमित राज  आणि प्रियांका बर्वे आता महाराष्ट्रासाठी हा आवाज शोधणार  रसिकांसाठी ही उत्सुकतेची बाब आहेया नव्या शो विषयी चाहत्यांच्या मनात उत्सुकता आहेसंपूर्ण महाराष्ट्रातील प्रतिभावान आणि होतकरू गायक  संगीतकारांसाठी  ‘सुपरस्टार सिंगर ने  एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहेआणि  यासाठी  परीक्षक म्हणून आमची झालेली निवड खूपच आंनददायी आहेइतक्या वर्षात संगीत क्षेत्रातील आमचे  अनुभव आणि आम्ही  जे काही शिकलोय ते मी या नव्या स्पर्धकांसोबत शेअर करण्यासाठी आम्ही आतुर  आहोत.

 

विशेष म्हणजे  तुमच्या गाण्याच्या प्रतिभेलाहवा असेल वाव तर आपल्या सुरेल आवाजातील ऑडिशन्स जरूर पाठवा. 'सुपरस्टार सिंगर हा हिंदी रिअॅलिटी कार्यक्रम विलक्षण लोकप्रिय झाल्यामुळे याच्यामराठी पर्वाची देखील तितकीच उत्सुकता निर्माणझाली आहे.  आपल्या घरात असेल असा उद्याचा आवाज तर त्यांना ही  लगेच सांगा ऑडिशन्स द्यायला२४ ऑगस्ट पर्यंत तुम्ही या ऑडिशन्स पाठवू शकता.

 

अधिक माहितीसाठी सोनीलिव्ह च्या https://www.sonyliv.com/dplnk?schema=sony://ems/4/141/0 या संकेतस्थळाला भेट द्या.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...