Saturday, August 24, 2024

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गायिका सावनी रविंद्रने सुरू केला संगीत पोडकास्ट शो

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गायिका सावनी रविंद्रने सुरू केला संगीत पोडकास्ट शो

संगीतविश्वातील मनोरंजक गोष्टी प्रथमच पोडकास्टद्वारे उलगडणार

सावनीचा म्युझिक पोडकास्ट शो ठरला संगीतविश्वातील पहिलाच मराठी म्युझिक पोडकास्ट शो

आपल्या मधाळ आवाजानं रसिकांना मंत्रमुग्ध करणारी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गायिका सावनी रविंद्र ही नेहमीच काहीतरी नवनवीन गोष्टी तिच्या प्रेक्षकांसाठी करत असते.  तिने नुकतच सावनी म्युझिक पोडकास्ट शो सुरु केला आहे. हा शो संगीतविश्वातील पहिलाच ‘मराठी म्युझिक पोडकास्ट’ आहे. ज्यात स्वतः गायिका लोकप्रिय गायक, संगीतकार, वादक यांच्यासोबत मनसोक्त संगीतविषयक गप्पा मारणार आहे. या पोडकास्टच्या पहिल्याच भागात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गायक राहुल देशपांडे हे उपस्थित होते. सावनी म्युझिक या पोडकास्ट वर हा पहिलाच भाग आपण पाहू शकतो. यापूर्वी सावनीने मराठी, हिंदी,  गुजराती, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नडा, कोंकणी अशा प्रादेशिक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. तसेच गेल्यावर्षीच्या बहुचर्चित बाईपण भारी देवा या चित्रपटातील सावनीने गायलेली मंगळागौर सगळ्यांच्याच पसंतीस पडली.

सावनी तिच्या म्युझिक पोडकास्टविषयी सांगते, “मी एक संगीताची विद्यार्थी म्हणून गेली अनेक वर्ष या संगीतसृष्टीत काम करत आहे. काही चढउतार देखील मी पाहिले. तर या प्रवासात अनेक माणस प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मला भेटली. त्यांच्याकडून अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या. म्युझिक पोडकास्टच्या निमित्ताने संगीतात नवनवीन प्रयोग करू इच्छिणाऱ्या गायकांसाठी तसेच या क्षेत्रात असणाऱ्या सर्व कलाकारांसाठी, जाणकार प्रेक्षकांसाठी मी हा पोडकास्ट सुरू केला आहे. सर्वांनी नक्कीच हा पोडकास्ट पाहा. आणि मला कमेंट्सद्वारे आपल्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचवा.”

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

RRP Electronics Ltd Launched Maharashtra’s First OSAT/ATMP Semiconductor Manufacturing Facility

RRP Electronics Ltd Launched Maharashtra’s First OSAT/ATMP Semiconductor Manufacturing Facility RRP Electronics Ltd was pleased to announce...