Thursday, February 12, 2026

रहस्य–थरारपट ‘असंभव’ आता ॲमेझॉन प्राईमवर !ओटीटीवरही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद

 रहस्य–थरारपट ‘असंभव’ आता ॲमेझॉन प्राईमवर !ओटीटीवरही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद

रहस्य, थरार आणि भावनांनी भरलेला ‘असंभव’ या चित्रपटाने सिनेमागृहात यशस्वी वाटचाल केल्यानंतर आता हा चित्रपट ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झाला असून ओटीटीवरही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटगृहात प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणाऱ्या या गूढपटाने आता घरबसल्या पाहाणाऱ्या प्रेक्षकांच्याही मनातही वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांच्यात सतत फिरणारी ‘असंभव’ची कथा मानवी मन, स्मृती, नाती आणि दडलेली रहस्ये यांचा शोध घेते. एका गूढ घटनेभोवती गुंफलेली ही कथा जसजशी पुढे सरकते, तसतसं पात्रांच्या आयुष्यातील न सांगितलेली सत्ये आणि दडलेली भीती उलगडत जातात, ज्यामुळे चित्रपट शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.

थरारासोबतच नात्यांतील संघर्ष, विश्वास, अपराधभाव आणि स्वीकार यांसारख्या भावनिक पैलूंना चित्रपटात प्रभावीपणे हात घालण्यात आला आहे. सिनेमॅटोग्राफी, पार्श्वसंगीत आणि वातावरणनिर्मिती यामुळे चित्रपटाची गूढता अधिक ठळकपणे समोर येते.

चित्रपटाचे दिग्दर्शक सचित पाटील म्हणतात, ''थिएटरनंतर आता ॲमेझॉन प्राईममुळे ‘असंभव’ अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय, याचा आनंद आहे. घरबसल्या हा थरार अनुभवताना प्रेक्षक चित्रपटाशी भावनिकरित्या जोडले जातील, याची मला खात्री आहे.”

निर्माते नितीन वैद्य म्हणतात, '' 'असंभव' ही भावना आणि नात्यांची गोष्ट आहे. थिएटरनंतर ओटीटीवरही प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ॲमेझॉन प्राईमसारख्या व्यासपीठावर मराठी चित्रपट प्रदर्शित होणं, ही अभिमानाची बाब आहे.”

‘असंभव’चे दिग्दर्शन सचित पाटील यांनी केलं असून पुष्कर श्रोत्री यांनी सह-दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. सचित पाटील, मुक्ता बर्वे, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी हे चार गुणी कलाकार पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर झळकले आहेत. मुंबई - पुणे फिल्म्स एंटरटेनमेंट’चे सचित पाटील आणि नितीन प्रकाश वैद्य हे चित्रपटाचे निर्माते असून, एरिकॉन टेलिफिल्म्सच्या शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि पी अँड पी एंटरटेनमेंटचे मंगेश परुळेकर व संजय पोतदार हे सहनिर्माते आहेत.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Moneyview Limited: Initial public offering to open on Thursday, September 24, 2026

  Moneyview Limited: Initial public offering to open on Thursday, September 24, 2026 Price Band fixed at ₹32 per equity share of face value ...