एसओटीसी ने ग्राहकांसाठी ओम्नी-चॅनल्स उपलब्ध केला
· एसओटीसी ऑनलाइन सुविधेमुळे चालू व्यवसायात १० ते १२ टक्क्यांची भर
· भविष्यात ट्रॅव्हल ई-कॉमर्सला भरपूर प्रतिसाद मिळण्याची चिन्हे
मुंबई, 20 जून 2018 : डिजिटायझेशन आणि ग्राहकांच्या बदलत्या खरेदीशैली मुळे किरकोळ व्यवसायात आमूलाग्र बदल झाला आहे. प्रत्यक्ष दुकान आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा एकत्रित असा व्यापक अनुभव मिळतअसल्याने या व्यावसायिकांना बाजारात अग्रेसर राहता येते. एसओटीसीने गेल्या वर्षी ई-कॉमर्स सेवांद्वारे डिजिटल व्यवसायाचा शुभारंभ केला. एसओटीसीने अत्यंत सुलभ अॅक्सेस असलेली, सोयीची आणि आकर्षक अशीवेबसाइट सुरू केली. नवी बाजारपेठ आणि ग्राहकांपर्यंत पोहोचून विकास साध्य करण्याचा तो एक महत्त्वाचा घटक ठरला आहे.
पर्यटनविषयक माहिती घेण्याच्या दृष्टीने अतिशय सुलभ अॅक्सेस, मिळणारी विस्तृत माहिती आणि त्या अनुषंगाने तिचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा मानस अशा विविध घटकांमुळे ग्राहक याकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होतआहे. गेल्यावर्षीपासून ऑनलाइन सुविधा उपलब्ध केल्यामुळे नव्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा नवा मार्गच उपलब्ध झाला आहे. परिणामी ऑनलाइन सुविधेमुळे सध्याच्या व्यवसायात १० ते १२ टक्क्यांची वृद्धी झाली आहे. हेऑम्नी सुविधांचे यशाचे हे द्योतक आहे.
बॅक-एण्ड तंत्रज्ञानाच्या साह्याने एसओसीटीच्या प्रवाशांना प्रवासाचा सुखद अनुभव मिळावा, या उद्देशाने एसओटीसीने ऑनलाइन सुविधा सुरू केली. तसेच त्याची सक्षमता वाढविण्यात आल्याने एसओसीटीला ग्राहकांशी कायमजोडून राहता आले.
व्हिसा ऑन ट्रॅव्हल, कमी अंतरावरील पर्यटनस्थळे आणि लाँग वीकेण्ड प्रवासाकडे वाढत असलेला कल ध्यानी घेऊन एसओटीसीने `ईझी सिरीज्`च्या अंतर्गत ऑनलाइन पूर्वनियोजित कस्टमाइझ पॅकेजेस उपलब्ध केली. ग्रुपटुर्ससाठी किफायतशीर एफआयटी पॅकेजेसचा यात समावेश आहे. `ईझी` उत्पादन श्रेणीअंतर्गत १२५ पॅकेजेस उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यात थायलंड, सिंगापूर, मॉरिशस, दुबई, हाँगकाँग, बाली, स्पेन, दक्षिणआफ्रिका, श्रीलंका, केरळ, अंदमान, भूतान, काश्मीर आणि लडाख यांचा समावेश आहे.
एसओटीसी ट्रॅव्हलच्या ऑनलाइन सुविधेचा वापर करणाऱ्या ग्राहकांमध्ये तरुण नोकरदार, उद्योजकांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. तरुणांच्या सिंगापूर, थायलंड, दुबई आणि मॉरिशस पर्यटनासाठी एफआयटीपॅकेजेस् आहेत. तर, ज्येष्ठ नागरिकांसाठी आध्यात्मिक अनुभवाच्या दृष्टीने एसोटीसी ऑनलाइनने `दर्शन` या नावाअंतर्गत विविध धार्मिक पर्यटनांची पॅकेजेस उपलब्ध केली असून युरोप तसेच अमेरिका पर्यटनासाठी ज्येष्ठनागरिकांसाठी विशेष पॅकेजेस् देखील आहेत.
नेहमीच्या चौकशींव्यतिरिक्त देशांतर्गत आणि कमी अंतराच्या पर्यटनासंदर्भात ग्राहकांकडून केल्या जाणाऱ्या चौकशीमध्ये १८ टक्क्यांची वाढ झाल्याचे एसओटीसीच्या निदर्शनास आले आहे. या ऑनलाइन सुविधेमुळेदेशांतर्गत ग्रुप टुर्स, कमी अंतरावरील आंतरराष्ट्रीय जीआयटी तसेच युरोप आणि अमेरिकेसाठी १.२५ लाख ते ३ लाख रुपयांत बुकिंग करण्याची सुविधा असलेल्या बजेट श्रेणीतील पॅकजेसना हे ग्राहक पसंती देत आहेत.२०१७मध्ये एसओसीटीच्या ऑनलाइन सुविधेच्या माध्यमातून अशी ७००० बुकिंग प्राप्त झाली.
ऑनलाइन सुविधेच्या माध्यमातून सिंगापूर, दुबई यांना सर्वाधिक पंसती दिली जाते. त्याखालोखाल इजिप्त, युरोप आणि बालीला जाण्याकडे पर्यटकांचा कल आहे. मुंबई, बंगळुरू, नवी दिल्ली, पुणे, चेन्नई, अहमदाबाद,कोलकाता, हैदराबाद, चंदिगढ, लखनौ आणि जयपूर या प्रमुख शहरांमधून ऑनलाइन सुविधेद्वारे सर्वाधिक बुकिंग होते.
एसओटीसी ट्रॅव्हलच्या सेल्स, इंडिया अॅण्ड एनआरआय मार्केट्स तसेच ई-कॉमर्सचे प्रमुख डॅनिअल डिसोझा यांनी वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनाबद्दल माहिती देताना सांगितले की, `भारतीय पर्यटकांची संख्या वाढत असून त्यांना