लवकरच येतोय ‘मिस यू मिस्टर’ !
मंत्रा व्हिजनच्या सहकार्याने थर्ड आय क्रिएटिव्ह फिल्म्स प्रस्तुत ‘मिस यू मिस्टर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आकर्षक पोस्टरने चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे.
पोस्टरकडे पाहाताच दोन वेगवेगळ्या देशात राहाणाऱ्या प्रेमिकांची छायाचित्रे नजरेत भरणारी आहेत. सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे हे फोनच्या हावभावातून संवाद साधताना दिसत असून त्या संवादांमागे काय दडलेलं आहे? लाँग डिस्टन्सचं नातं... कधी मनं जुळवणारं तर कधी मन पोखरणारं ? हा प्रश्न पोस्टर पाहाताच मनात घर करतो.
दिग्दर्शक समीर हेमंत जोशी सांगतात, “‘मिस यू मिस्टर’ ही फक्त दोन शहरांची गोष्ट नाही, ती दोन मनांची आहे. वेळेत आणि राहाण्याच्या ठिकाणांमध्ये अंतर पडलं तर नातं दुरावतं की अधिक स्थिरावतं ? 'मिस यू मिस्टर' याच चढउतारांची गोष्ट आहे.''
चित्रपटात मृण्मयी देशपांडे आणि सिद्धार्थ चांदेकर प्रमुख भूमिका साकारत असून त्यांच्या केमिस्ट्रीमुळे ही कथा प्रेक्षकांना अधिकच रिलेट होईल. या चित्रपटात राजन भिसे, सविता प्रभुणे, अविनाश नारकर, राधिका विद्यासागर, दीप्ती लेले यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचे दीपा ट्रेसी आणि सुरेश म्हात्रे निर्माते आहेत.

No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST