माननीय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यातर्फे जीटीडीसीचे टॅक्सी अप ‘गोवामाइल्स’ लाँच
पणजी, ६ ऑगस्ट २०१८ – गोव्याची पहिले आणि एक्सक्लुसिव्ह मोबाइल अपवर आधारित टॅक्सी सेवा गोवामाइल्सचे गोव्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. मनोहर पर्रीकर यांच्याहस्ते सेक्रेटेरियल कॉम्प्लेक्स, पोर्वोरी येथे लाँच करण्यात आले.
लाँचप्रसंगी माननीय पर्यटन मंत्री श्री. मनोहर आजगांवकर, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे (जीटीडीसी) माननीय अध्यक्ष, श्री. निलेश काब्राल, गोव्याचे मुख्य सचिव श्री. धर्मेदंद्र शर्मा, पर्यटन सचिव, श्री. शेओ प्रताप सिंग, श्री. मेनिनो डिसूझा, संचालक, पर्यटन विभाग आणि इतर मान्यवर उपस्थित होते. गोवामाइल्सचे लाँच स्थानिक नागरिक तसेच पर्यटकांसाठी गोवा व आजूबाजूच्या परिसरातील पर्यटन- प्रवासात क्रांतीकारी बदल आणेल तसेच या नव्या उपक्रमांतर्गत सेवा देणाऱ्या टॅक्सी चालकांचा फायदा करून देईल. राज्यात प्रवेश केल्यानंतर लगेचच गोवामाइल्सद्वारे परवडणाऱ्या आणि सरकारने मंजूर केलेल्या दरांत टॅक्सी आरक्षित करता येईल. गुगल प्ले स्टोअर तसेच अपल स्टोअरद्वारे गोवामाइल्स अप डाउनलोड करता येईल.
लाँचप्रसंगी श्री. पर्रीकर म्हणाले, ‘या नव्या अप आधारित टॅक्सी सेवेमुळे गोव्याला पर्यटकांना परवडणाऱ्या दरात भरपूर प्रवास करण्याची संधी देता येईल. विशेष म्हणजे, त्यांना गोव्यात आल्यापासून परत जाईपर्यंत परवडणाऱ्या दरांत ही सेवा वापरता येईल. हा उपक्रम लाँच केल्याबद्दल मी गोवा टुरिझमचे अभिनंदन करतो आणि या उपक्रमाला भरपूर यश मिळेल अशी सदिच्छा देतो.’
त्यापुढे श्री. आजगांवकर म्हणाले, ‘गोव्यातील अपआधारित टॅक्सी सेवा वाहतूक व्यवस्थेमध्ये क्रांतीकारी बदल घडवून आणेल, ज्याचा या क्षेत्रातील सर्व घटकांना म्हणजेच टॅक्सी चालक, पर्यटक आणि स्थानिकांना फायदा होईल. मला खात्री आहे, की गोव्यातील पर्यटक टॅक्सी चालक आता या डिजिटल यंत्रणेत सहभागी होतील आणि पर्यायाने अशा प्रकारची यंत्रणा यशस्वीपणे राबवणाऱ्या राज्यांच्या यादीत गोवा मागे राहाणार नाही.’
या उपक्रमाच्या फायद्यांवियी श्री. काब्राल म्हणाले, ‘आम्ही सार्वजनिक माहिती अभियान लाँच केले आहे, ज्याद्वारे गोव्यातील एक दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचून त्यांना गोवामाइल्सची माहिती दिली जाईल. सर्वसामान्य जनतेकडून आम्हाला भरघोस प्रतिसादाची अपेक्षा असून ते हे अप डाउनलोड करून त्याचा पर्यटन तसेच दैनंदिन प्रवासासाठी वापर करतील. ही अप आधारित टॅक्सी सेवा डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देईल, पर्यटकांसाठी प्रवास सोपा करेल व टॅक्सी चालकांना चांगले उत्पन्न देईल. या उपक्रमामुळे ग्राहकांना नवा अनुभव मिळेलच, शिवाय टॅक्सी भाडे भरण्यासाठी सोपा व सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देईल.’ ते पुढे म्हणाले, ‘हे अप डिजिटल यंत्रणेमध्ये गोवन टॅक्सी चालकांना भागीदार बनवणाऱ्या आणि सर्वात जलद व सोयीस्कर यंत्रणा देणाऱ्या तसेच पर्यटकांना सेवेचा चांगला अनुभव देणारे पहिल्या काही अप्सपैकी एक एक आहे.’
गोवामाइल्सचे व्यवस्थापन फ्रंटमाइल्स प्रा. लि. या स्थानिक गोवन कंपनीद्वारे हाताळले जाणार असून टेंडरिंग प्रक्रियेच्या गरजांनुसार एसपीव्ही म्हणून याची निर्मिती करण्यात आली आहे. ही एसपीव्ही ही पिटासिस सॉफ्टवेअर प्रा. लि. या पालक कंपनीची उपकंपनी आहे, जे जीटीडीसीच्या अप आधारित टॅक्सी सेवेचे यशस्वी बिडर होते. पिटासिस सॉफ्टवेअर प्रा. लि. ही गेली सात वर्ष वाहतूक ऑटोमेशन क्षेत्रात कार्यरत असून मास ट्रान्सपोर्टेशन, फ्लीट/क्सी अग्रीगेशन आणि कर्मचारी वाहतूक या क्षेत्रांत कार्यरत आहे. सध्या कंपनीच्या नोंदणीकृत प्रवाशांची संख्या ६० हजारांपेक्षा जास्त आहे.
अपवर आधारित टॅक्सी सेवेच्या लाँचमुळे पर्यटकांना गोवामाइल्स सोयीस्कर आणि वेळेची बचत करणारे आहे हे सहज लक्षात येईल, कारण त्यांना केवळ एका मोबाइल अपद्वारे आरक्षण, देखरेख आणि पैसे भरणे अशा सर्व क्रिया करत येणार आहेत. ट्रॅकिंगसुद्धा अतिशय सोपे ठेवण्यात आले आहे, ज्यामुळे प्रवाशांना त्यांची राइड त्यांच्या सद्य आणि त्यापूर्वी आरक्षित केलेल्या राइडचे ट्रॅकिंग पाहाता येणार आहे. त्याचबरोबर प्रवाशांच्या सुरक्षिततेस काही धोका असल्यास त्यात पॅनिक बटनाची सोयही दिलेली आहे.
या सेवेचा टॅक्सी चालकांनाही फायदा होईल याची खबरदारी गोवामाइल्सने घेतली असून त्यानुसार भारतात इतरत्र व जगभरातील ट्रेंडनुसार त्यांच्या उत्पन्नावर शुल्क आकारले जाणार नाही. टॅक्सी चालकांना दैनंदिन पातळीवर पैसे मिळतील. हेच मोबाइल अप कर आणि विमा कारणांसाठी तसेच जवळच व्यवसाय शोधण्यासाठी वापरता येणार असून त्यामुळे प्रत्येक चालकाला उत्पन्न मिळवण्याची खात्री असेल. उत्पन्नाचा सारांश अपमध्येच पाहाता येईल. स्थानिक गोवन चालकांमध्ये व्यवसायाचे समान विभाजन केले जाईल आणि त्यांना काम करून जास्त पैसे मिळवता येतील व हीच गोष्ट त्यांना अधिक काम करण्यासाठी प्रेरणा देईल.
चालकांसाठी पाळावयाच्या काही सूचना जीटीडीसीने तयार केल्याअसून अधेमधे त्यासंदर्भात प्रत्यक्ष आणि डिजिटल पातळीवर तपासणी करण्याचे काम जीटीडीसी करेल. पालन करणाऱ्यांना ताकीद दिली जाणार असून त्यामुळे ग्राहक समाधानाचा चांगला दर्जा राखला जाईल.
काही टॅप्समध्ये कॅब आरक्षित करा. पुढीलप्रमाणे
• पिकअप लोकेशन सेट करा (उदा – घर, ऑफिस, रेल्वे स्थानक, सध्याचे लोकेशन इत्यादी)
• ड्रॉप लोकेशन सेट करा (उदा – घर, ऑफिस, रेल्वे स्थानक, सध्याचे लोकेशन इत्यादी)
• नकाशावर दिसत असलेल्या तुमच्या लोकेशनजवळच्या कॅब्ज/टॅक्सी पाहा
• पैसे भरण्याचे विविध मार्ग – रोख पैसे भरा किंवा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, भीम, यूपीआय असे विविध कॅशलेस पर्याय वापरा.
• वाहनाचा प्रकार निवडा आणि ‘कन्फर्म’ वर टॅप करा.
• सोप्या पद्धतीने निवड करण्यासाठी तुम्हाला वाहनाचा प्रकार आणि दर दिसतील व त्यात तुम्हाला योग्य वाटेल तो पर्याय निवडा.
• त्यानंतर तातडीने इतर तपशील जसे, की चालकाचे नाव, गाडीचा नंबर, गाडीचा प्रकार इत्यादी. चालकाला दिला जाणारा ओटीपी अपमध्येच असेल.
• चालकाला ओटीपी दिल्यानंतर रिअल टाइममध्येच कॅब येण्याची व ड्रॉप केले जाण्याची वेळ पाहा.
• तुमची ट्रिप संपल्यानंतर इन्व्हॉइसचा इतिहास लगेचच ‘माय राइड्स’मध्ये पाहाता येईल आणि आधीच्या ट्रिप्सची माहिती सध्याच्या ट्रिपच्या माहितीखाली दिलेली असेल.
• भाडेशुल्क आणि राइडची वैशिष्ट्ये जाणून घ्या – आरक्षित करण्यासाठी भाडे आणि विविध वैशिष्ट्ये तपासता येतील.
• शेअर – राइडचे तपशील तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करता येतील.