झी टीव्हीवरील तुझसे है राबताचा हिस्सा बनणार रीम शेख
रक्ताने एकमेकांशी काहीही संबंध नसलेल्या आणि खरंतर एकमेकांपासून अनभिज्ञ असलेल्या दोन स्त्रियांचे खास आणि आंबटगोड असे मायलेकीचे नाते झी टीव्ही आपल्या प्रेक्षकांसाठी 'तुझसे हैराबता’ ह्या मालिकेतून घेऊन येत आहे. निर्मात्यांनी ह्या मालिकेत कल्याणी देशमुख ह्या महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी लोकप्रिय अभिनेत्री रीम शेखला घेतले आहे. कल्याणी ही एक १७ वर्षीय मुलगीअसून तिला फॅशन डिजाईनर बनायचे आहे आणि आयुष्यात तिची मोठी स्वप्ने आहेत. ती स्मार्ट, विचारांनी परिपक्व आहे आणि आपल्या आईवडिलांना आदर्श मानते आणि त्यांच्यावर तिचेमनापासून प्रेम आहे.
आपल्या व्यक्तिरेखेबद्दल रीम शेख म्हणाली, “मी ह्या मालिकेत कल्याणीची भूमिका साकारत असून ती एक आनंदी स्वभावाची मुलगी आहे आणि तिचा तिच्या स्वतःच्या नियमांवर विश्वास आहे.ती आनंदाने आयुष्य जगत आहे. तिच्या आयुष्यातील काही घटनांमुळे ती क्लिष्ट अशा परिस्थितीत सापडते. ह्या व्यक्तिरेखेसाठी अनेक भावनांचे प्रदर्शन मला करावे लागले आणि त्यामुळे हीव्यक्तिरेखा रोचक आणि आव्हानात्मक बनते. प्रेक्षकांचे मनोरंजन करताना मला खूप छान वाटत आहे आणि मला आशा आहे की माझ्या ह्या प्रयत्नांमध्ये ते माझी साथ देतील.”
तुझसे है राबता लवकरच फक्त झी टीव्हीवर
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST