Tuesday, August 7, 2018


शेखर रवजिआनीचे पुनरागमन

झी टीव्हीवरील सा रे    मध्ये परीक्षकाच्या रूपात

गेल्या वर्षी सा रे    लिटल चॅम्प्सच्या यशानंतरझी टीव्हीवरील हा आयकॉनिकदीर्घकाळ सुरू असलेला आणि प्रतिष्ठित रिलिटी शो सा रे    देशातील महत्त्वाकांक्षी गायकांनासंगीताच्या जगातील असाधारण कारकिर्द निर्माण करण्याची संधी प्रदान करण्यासाठी पुन्हा येत आहेह्या शो ने मागच्या पर्वात श्रेया घोषालकुणाल गांजावालाकमाल खानअमानत अली,राजा हसनसंजीवनी आणि बेला शेंडे असे भारतातील काही उत्तमोत्तम गायक शोधून काढण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली आहे.

देशातील कलेतून उत्तमोत्तम स्पर्धक शोधून काढून त्यांना संगीत क्षेत्रात कारकिर्द घडवण्यासाठी मार्गदर्शन करताना खुद्द सा रे    मधूनच पुढे आलेल्या शेखर यांनी आपल्या करिअरमध्ये मोठीउंची गाठलीशेखर ह्या शोमध्ये परीक्षक म्हणून सुमारे दशकभरानंतर पुनरागमन करत आहेआपल्या कौशल्यासह शेखर ह्या स्पर्धकांसोबत अतिशय निकटतेने काम करतील आणि त्यांनामार्गदर्शन करतील.

सा रे    सोबत आपल्या सहकार्याबद्दल शेखर रावजिआनी म्हणाला, “ह्या शोमध्ये परत येताना मला खूप छान वाटत आहेसा रे    हा माझ्या हृदयाच्या अतिशय जवळ असून ह्याशोसोबत माझ्या खूप साऱ्या आठवणी जोडलेल्या आहेत  अगदी स्पर्धक असल्यापासून ह्या शो चा परीक्षक बनण्यापर्यंतदेशभरातील हे नवीन उत्तमोत्तम आवाज ऐकण्यासाठी मी अतिशयउत्साहात असून त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी उत्सुक आहेसा रे    हीच माझी संगीताची शाळा असून गायक म्हणून तुमचे भविष्यघडवण्यासाठी ह्यापेक्षा उत्तम व्यासपीठ असू शकत नाही.”

सा रे    सीनिअर्सच्या ऑडिशन्स सध्या सुरू असून लवकरच हा शो झी टीव्हीवर प्रसारित होईल.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

  India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026 IIJS Bharat – Signature 2026 to expected to ge...