'गार्टेक्स टेक्सप्रोसेस इंडिया कडून दमदार उद्योग प्रदर्शन
महाराष्ट्रा सरकारने आपले वस्त्रोद्योग धोरण राबविण्यास सुरुवात केली आहे, जे क्षेत्रीय स्वरूपात कार्य करते. टप्पा- १ मध्ये ४५ टक्के अनुदान मिळण्यास मदत होऊ शकते, टप्पा-२ ४० टक्के तर टप्पा- ३ ३५ टक्के अनुदान मिळते. आम्ही शून्य-कचरा पद्धतीची घोषणा केली आहे, ज्याचा उद्देश कापड कचऱ्याचा पुनर्वापर करून आणि त्याचे कार्पेटसारख्या वापरण्यायोग्य साहित्यात रूपांतर करून त्यावर नियंत्रण ठेवणे आहे. यासाठी खासगी क्षेत्राला पूर्वी नमूद केलेल्या अनुदानांव्यतिरिक्त प्रतियुनिट २ रुपये आणि सहकारी संस्थांना प्रतियुनिट ३ रुपये वीज अनुदानाचा लाभ होऊ शकतो. अमरावती येथे 'पीएम मित्र पार्क' लवकरच सुरू होईल, त्याचे बहुतेक काम पूर्ण झाले आहे व ते अंतिम टप्प्यात आहे. मला या भव्य कार्यक्रमात उपस्थित राहणाची संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो आणि तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो.'
'इन्व्हेस्ट यूपी'चे अतिरिक्त सीईओ श्री. शशांक चौधरी (आयएएस) यांनी माहिती दिली, की 'पीएम मित्र योजनेअंतर्गत, आम्ही लखनौजवळ एक मेगा-इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क विकसित करत आहोत, ज्यामध्ये १,००० एकर जमीन व्यापली जाणार आहे. हे पार्क 'सार्वजनिक खासगी भागीदारी' (पीपीपी मॉडेल) तत्त्वाअंतर्गत स्थापित केले जाईल, ज्यामध्ये गुंतवणूकदारांसाठी उत्तम संधी मिळणार आहेत. विविध प्रकारच्या परवानग्यांसाठी उत्तर प्रदेश सरकार ' सिंगल विंडो क्लिअरन्स योजना’ आणि मंजुरीसाठी नवीन संकेतस्थळ विकसित करत आहे. तसेच आम्ही चांगले गुंतवणूकदार आकर्षित करण्यात यशस्वी झालो आहोत.
एमईएक्स एक्झिबिशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक श्री. गौरव जुनेजा म्हणाले, की 'एक प्रदर्शन म्हणून 'गार्टेक्स टेक्सप्रोसेस इंडिया' सातत्याने विकसित होत आहे. आणि हा बदल दरवर्षी आमच्या मुंबई आणि नवी दिल्लीतील आवृत्त्यांमध्ये प्रतिबिंबित होत आहे. मेस्से फ्रँकफर्ट एशिया होल्डिंग्ज लिमिटेडचे कार्यकारी संचालक आणि बोर्ड सदस्य श्री. राज मानेक यांनीही अशाच भावना व्यक्त केल्या. ' हा कार्यक्रम प्रदर्शनाच्याही पलीकडे जातो; हा कार्यक्रन उद्योगातील परिवर्तन सक्षम करण्याबद्दल आहे. जागतिक पुरवठा साखळी पुन्हा नव्याने जुळत असताना, 'गार्टेक्स टेक्सप्रोसेस इंडिया'सारखे व्यासपीठ या उद्योगातील भागधारकांना जोडण्यासाठी महत्त्वाचे ठरतात हे प्रदर्शन एमईएक्स एक्झिबिशन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मेस्से फ्रँकफर्ट ट्रेड फेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी संयुक्तपणे आयोजित करण्यात आले आहे.








