LG इलेक्ट्रॉनिक्स इंडिया लिमिटेडने भारतात आपल्या तिसऱ्या उत्पादन संयंत्राचे बांधकाम सुरू केले
श्री सिटी येथील नवीन उत्पादन संयंत्र 2026 च्या अखेरपर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा
श्री सिटी, आंध्र प्रदेश, 8 मे 2025 – LG इलेक्ट्रॉनिक्स इंडिया लि. (LGEIL) ने आंध्र प्रदेशातील श्री सिटी येथे आपल्या नवीन उत्पादन संयंत्राचे बांधकाम सुरू झाल्याची घोषणा केली आहे. एका समारंभात ही घोषणा करण्यात आली, जेथे आंध्र प्रदेश सरकारातील माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि दळणवळण, रिअल टाइम गव्हर्नन्स आणि मानव संसाधन विकास मंत्री श्री. नारा लोकेश तसेच, आंध्र प्रदेश सरकारमधील उपस्थित होते. या नवीन संयंत्राचे कार्यान्वयन 2026 च्या अखेरपर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे.
श्री सिटीच्या औद्योगिक क्षेत्रात मोक्याच्या ठिकाणी असलेले हे नवीन उत्पादन संयंत्र LGEIL ची उत्पादन क्षमता आणि या भागात स्थानिक रोजगाराच्या शक्यता वाढवेल. ही नवीन सुविधा LG इलेक्ट्रॉनिक्सचे भारतातील तिसरे संयंत्र आहे. इतर दोन संयंत्रे ग्रेटर नोयडा, उत्तर प्रदेश आणि पुणे, महाराष्ट्र येथे आहेत. त्यांच्या या गुंतवणुकीमधून LG इलेक्ट्रॉनिक्सच्या जागतिक पुरवठा साखळीतील महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून भारताची क्षमता अधोरेखित होते.
आंध्र प्रदेश सरकारने LGEIL ला या नवीन संयंत्रासाठी 247 एकर जमीन श्री सिटी येथे दिली आहे. या संयंत्रामुळे सुमारे 1495 थेट नोकऱ्या उभ्या राहतील अशी अपेक्षा आहे. LGEIL या सुविधेत चार वर्षांमध्ये मिळून US $ 600 मिलियन (5001 कोटी रु.) गुंतवणूक करणार आहे, ज्याच्यात या क्षेत्रात साहाय्यक उपकरणे आणण्याची क्षमता असेल. यामुळे, आंध्र प्रदेश राज्यात मोठ्या घरगुती इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या (white goods) उत्पादनासाठी एक ईकोसिस्टम तयार होईल.
श्री सिटीमधील या नवीन संयंत्राद्वारे उत्पादन अधिक स्थानिक बनवले जाईल आणि देशभरातील LG उत्पादनांची वाढती मागणी पूर्ण करण्यात येईल, अशी अपेक्षा आहे. या संयंत्रामुळे दक्षिण भारतातील LGEIL ची पुरवठा साखळी देखील अधिक मजबूत होईल आणि या भागात राहणाऱ्या उपभोक्त्यांसाठी LG उत्पादनांची पोहोच सहज आणि सुलभ होईल. या संयंत्रात AC कॉम्प्रेसर, रेफ्रीजरेटर, वॉशिंग मशीन आणि एअर कंडिशनर वगैरे विविध उपकरणांचे उत्पादन करण्यात येणार आहे.
श्री. नारा लोकेश यांच्या व्यतिरिक्त प्रस्तुत समारंभात इतर वरिष्ठ सरकारी मंडळी तसेच LG होम अॅप्लायन्स सोल्यूशन कंपनीचे अध्यक्ष ल्यू जेई चेओल; LG ईको सोल्यूशन कंपनीचे अध्यक्ष जेम्स ली आणि LGEIL चे मॅनिजिंग डायरेक्टर हाँग जू जिओन सहित दक्षिण कोरियामधील सीनियर LG इलेक्ट्रॉनिक्स एक्झिक्युटिव्ह्ज देखील उपस्थित होते. इतर सरकारी अधिकारी आणि LGEIL मधील वरिष्ठ नेतृत्व देखील या प्रसंगी हजर होते.
आंध्र प्रदेशाची नवी राजधानी अमरावती येथून आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री माननीय श्री. N चंद्राबाबू नायडू यांनी शुभेच्छा देताना म्हटले, “आम्ही LG इलेक्ट्रॉनिक्सचे श्री सिटी, आंध्र प्रदेश येथे मनःपूर्वक स्वागत करतो. आंध्र प्रदेशात LG इलेक्ट्रॉनिक्सच्या नवीन उत्पादन संयंत्राच्या घोषणेतून उद्योगांसाठी अनुकूल असण्याबाबत, येथे व्यवसाय करण्यास सुलभता असण्याबाबत, इनोव्हेशनला प्रोत्साहन देण्याबाबत आणि जागतिक दर्जाच्या उत्पादन केंद्रांना आश्रय देण्याबाबत आंध्र प्रदेशाची धोरणे प्रगतीशील असल्याची ग्वाही मिळते. चांगल्या प्रकारे विकसित असलेली औद्योगिक ईकोसिस्टम, उत्तम कनेक्टिव्हिटी आणि व्यवसायांसाठी पोषक वातावरण यामुळे नवीन संयंत्रासाठी श्री सिटी हे श्रेष्ठ स्थान आहे.
आंध्र प्रदेश सरकारातील माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि दळणवळण, रिअल टाइम गव्हर्नन्स आणि मानव संसाधन विकास मंत्री श्री. नारा लोकेश म्हणाले, “LG इलेक्ट्रॉनिक्सने आपल्या तिसऱ्या उत्पादन सुविधेसाठी श्री सिटीची निवड केली याचा आम्हाला आनंद वाटतो. हा LG इलेक्ट्रॉनिक्सच्या भारताविषयीच्या निष्ठेचा पुरावा आहे आणि मला विश्वास वाटतो की, आंध्र प्रदेशात केलेला हा विस्तार देशभरातील LG उत्पादनांची वाढती मागणी पूर्ण करेल.”
ल्यू म्हणाले, “आमची भारताशी असलेली भागीदारी आणखी वाढवण्याच्या आणि भारताच्या आर्थिक विकासात योगदान देण्याच्या दिशेने आम्ही आणखी एक पाऊल उचलले आहे. आमच्या तिसऱ्या उत्पादन संयंत्राचे बांधकाम नोयडा आणि पुणे येथील आमच्या सध्याच्या उत्पादन सुविधांना पूरक ठरेल. ही नवीन सुविधा नवीन रोजगारांची निर्मिती करेल आणि स्थानिक उत्पादन वाढवेल.”
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST