Friday, May 23, 2025

पैशांनी भरलेली बॅग… एक गाडी… आणि अनेक रहस्ये!

 पैशांनी भरलेली बॅग… एक गाडी… आणि अनेक रहस्ये! 

४ जुलैला उलगडणार ‘गाडी नंबर १७६०’ चे रहस्य 

मराठी चित्रपटसृष्टीत ड्रामा, सस्पेन्स आणि मनोरंजनाचा नवा स्फोट घडवणारा ‘गाडी नंबर १७६०’ येत्या ४ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून या पोस्टरने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकतेची लाट निर्माण केली आहे. पोस्टरमध्ये एक गाडी व त्यावर ठेवलेली पैशांनी भरलेली काळी बॅग दिसत आहे. पैशांनी भरलेली ही बॅग नेमकी कोणाची आहे? गाडी नंबर १७६० चं रहस्य काय रहस्य आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ४ जुलैला मिळतील. दरम्यान, हा एक वेगळा चित्रपट असल्याचे पोस्टरवरून कळतेय. या चित्रपटात प्रथमेश परब, शुभंकर तावडे, प्रियदर्शिनी इंदलकर, सुहास जोशी, प्रसाद खांडेकर, श्रीकांत यादव आणि शशांक शेंडे यांसारखे अफलातून कलाकार पाहायला मिळणार असून त्यांच्या अभिनयाने चित्रपट आणखीनच रंगतदार ठरेल. 

दिग्दर्शक योगिराज संजय गायकवाड म्हणतात, “ ‘गाडी नंबर १७६०’ या चित्रपटात एक ॲडव्हेंचर आहे जे पाहाणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरेल. प्रत्येक पात्राचे वेगळे रहस्य आहे, प्रत्येक वळणावर थरार आहे, यामुळे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणारा हा चित्रपट आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना काहीतरी वेगळे पाहायला मिळेल.”

निर्माते कैलाश सोराड़ी म्हणतात, “ हा एक वेगळा चित्रपट आहे. मराठी सिनेसृष्टीत अशा प्रकारचे चित्रपट फार कमी बनले आहेत. या चित्रपटात थ्रिल, सस्पेन्स, कॉमेडी, ड्रामा एकत्र पाहायला मिळेल. मनोरंजनाचा हा एक धमाका आहे. पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपट आल्यावरही प्रेक्षकांची हीच उत्सुकता कायम राहील, याची मला खात्री आहे. दमदार कलाकारांच्या उत्तम अभिनयाने चित्रपट रंगला असून प्रेक्षकांना ‘गाडी नंबर १७६०’ ची ही कहाणी नक्कीच आवडेल.” 

तन्वी फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माते कैलाश सोराडी आणि विमला सोराडी आहेत, तर लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी योगीराज संजय गायकवाड यांनी सांभाळली आहे.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...