Friday, May 2, 2025

मैत्रीच्या धाग्यांनी विणलेली, निसर्गाच्या कुशीत रंगलेली तीन मित्रांची कथा

 मैत्रीच्या धाग्यांनी विणलेली, निसर्गाच्या कुशीत रंगलेली तीन मित्रांची कथा 


‘बंजारा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित..


सिक्कीमच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर चित्रीत झालेल्या ‘बंजारा’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, या ट्रेलरमध्ये तीन मित्रांचा भावनांनी भरलेला आणि रहस्यांनी गुंतलेला प्रवास उलगडताना दिसतो. १६ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.


टीझरमध्ये या तिघांच्या प्रवासाची झलक दाखवण्यात आली होती, पण ट्रेलरमध्ये हा प्रवास नेमका कशासाठी सुरू होतो, याचे धागेदोरे उलगडताना दिसत आहे. समीरच्या आजोबांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचे अस्थी विसर्जन करण्यासाठी हे तीन मित्र सिक्कीमकडे निघतात. मात्र, तिथे पोहोचल्यानंतर त्यांच्या वाट्याला एक अनपेक्षित आणि थरारक अनुभव येतो. जो त्यांच्या मैत्रीत, आयुष्यात आणि आत्मशोधात एक मोठा बदल घडवतो. पण तो अनुभव नेमका काय आहे? हे चित्रपट बघितल्यावरच कळेल. चित्रपटातील सिक्कीमचे अप्रतिम लोकेशन्स आणि दोन पिढ्यांतील मित्रांची भन्नाट केमिस्ट्री या चित्रपटाला खास बनवते. 



चित्रपटाबद्दल स्नेह पोंक्षे म्हणतो, ''आपण सगळेच खरंतर 'बंजारा' आहोत. कधीकधी निश्चित स्थळी पोहोचण्याचा नादात आपण प्रवासाचा आनंदच लुटत नाही. आयुष्यात या गोष्टी किती महत्त्वाच्या असतात, हेच दाखवण्याचा प्रयत्न ‘बंजारा’मध्ये करण्यात आला आहे. सर्वच वयोगटाला हा चित्रपट जवळचा वाटेल. ‘’ 


प्रस्तुतकर्ता शरद पोंक्षे म्हणतात, ‘’ प्रेक्षकांना जशी चित्रपटाची उत्सुकता आहे, तशीच आम्हालाही आहे. ‘बंजारा’ मध्यमवयीन प्रेक्षकांना आपल्या जुन्या मैत्रीची आठवण करून देईल. तर तरुणाई    या सफरीचा आनंद घेत, त्या आठवणी भविष्यात जपण्याचा प्रयत्न करतील. मैत्री आणि आत्मशोध यांची अनुभूती देणारा हा चित्रपट आहे. ‘’


 मोरया प्रॉडक्शन्स प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन स्नेह पोंक्षे यांचे आहे. प्रमुख भूमिकांमध्ये शरद पोंक्षे, भरत जाधव, सुनील बर्वे, स्नेह पोंक्षे, सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज झळकणार असून, निर्मिती रोहिणी विजयसिंह पटवर्धन यांची आहे.

https://youtu.be/ytWIliir5Ck?si=ar9-4Bd-iVy8vN24

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...