Tuesday, June 9, 2026

*हॉलिवूडच्या झगमगाटात रंगणार ‘नाफा २०२६’!*

*हॉलिवूडच्या झगमगाटात रंगणार ‘नाफा २०२६’!*


*७ ते ९ ऑगस्टदरम्यान सॅनहोजेमध्ये तिसरा नाफा मराठी चित्रपट महोत्सव*

*अमेरिकेतील भारतीयांसाठी मनोरंजन, संस्कृती आणि ग्लॅमरचा भव्य उत्सव*

*सॅनहोजे (कॅलिफोर्निया) प्रतिनिधी :* अमेरिकेतील भारतीयांच्या सांस्कृतिक दिनदर्शिकेतील सर्वात प्रतिष्ठित आणि बहुचर्चित ठरलेल्या ‘नाफा मराठी चित्रपट महोत्सवा’च्या तिसऱ्या पर्वाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, यंदाचा महोत्सव गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक भव्य, अधिक ग्लॅमरस आणि अधिक दिमाखदार स्वरूपात साजरा होणार आहे. ७ ते ९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सॅनहोजे थिएटरमध्ये रंगणारा हा सोहळा केवळ मराठी चित्रपटांचा उत्सव राहणार नसून, अमेरिकेतील संपूर्ण भारतीय समुदायाला एकत्र आणणारा सांस्कृतिक महाकुंभ ठरणार असल्याची माहिती नाफाचे संस्थापक अध्यक्ष आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते निर्माते अभिजित घोलप यांनी दिली.

मराठी चित्रपटसृष्टीचा दर्जा, वैभव आणि सांस्कृतिक समृद्धी उत्तर अमेरिकेतील नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या ध्येयातून स्थापन झालेल्या ‘नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन’ (नाफा)ने अवघ्या काही वर्षांत अमेरिकेतील सर्वाधिक चर्चिल्या जाणाऱ्या भारतीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. २०२६ मधील हा महोत्सव हॉलिवूडच्या रेड कार्पेट परंपरेची झलक, चित्रपटांचे भव्य प्रीमियर, कलाकारांशी थेट संवाद, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मनोरंजनाच्या विविध रंगांनी सजलेला असेल.

अमेरिका आणि कॅनडामध्ये वास्तव्यास असलेल्या लाखो भारतीयांसाठी 'नाफा' हे आता केवळ एक व्यासपीठ नसून भारतीय चित्रपट, कला आणि संस्कृती यांना जोडणारा सशक्त सांस्कृतिक पूल बनला आहे. विशेषतः मराठी चित्रपटांना जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी 'नाफा'ने केलेल्या प्रयत्नांमुळे उत्तर अमेरिकेतील प्रेक्षकांना महाराष्ट्रातील चित्रपट त्याच दिवशी चित्रपटगृहात पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

‘गुलकंद’, ‘सुजित सुशीला’, ‘संगीत मानापमान’, ‘चिकीचीकी बुबुम्बुम’, ‘पाणी’, ‘गुलाबी’, ‘नवरा माझा नवसाचा २’, ‘अशी ही जमवा जमावी’, ‘स्थळ’ आणि ‘सलतात रेशीम गाठी’ यांसारख्या चित्रपटांना अमेरिकेत आणि कॅनडामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. विशेष म्हणजे तरुण पिढीचा वाढता सहभाग हा नाफाच्या यशाचा महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.

अभिजित घोलप म्हणाले, “अमेरिकेत भारतीय आणि विशेषतः मराठी चित्रपटसृष्टीसाठी स्वतंत्र आणि सक्षम व्यासपीठ निर्माण करण्याचे स्वप्न आम्ही पाहिले होते. आज नाफाशी एक हजारहून अधिक सदस्य जोडले गेले आहेत. कलाकार, दिग्दर्शक, लेखक, गायक, तंत्रज्ञ, सिनेमॅटोग्राफर्स आणि विविध क्षेत्रातील सर्जनशील व्यक्तींचा सहभाग वाढत आहे. नाफाच्या फिल्म क्लबद्वारे अनेक लघुपट आणि कलाकृतींची निर्मिती होत असून, उत्तर अमेरिकेत भारतीय चित्रपटसृष्टीचा नवा अध्याय लिहिला जात आहे.”

नाफाच्या या प्रवासात प्रख्यात दिग्दर्शक, अभिनेते आणि कलावंतांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. त्यामुळेच अल्पावधीत नाफाने एक प्रभावी सांस्कृतिक चळवळ म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. निर्मितीसोबतच रेडिओसह ओटीटी क्षेत्रातही नाफाचा विस्तार झाला आहे. 'नाफा २०२६' च्या यशस्वी आयोजनासाठी संस्थापक अध्यक्ष अभिजित घोलप यांच्या नेतृत्वाखाली एक अनुभवी आणि समर्पित संचालक मंडळ कार्यरत असून, सह-समन्वयक म्हणून टेक्सासच्या अर्चना सराफ आणि कॅलिफोर्नियाच्या रिया ठोसर यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. कोषाध्यक्ष म्हणून विनायक फडणवीस (कॅलिफोर्निया) आर्थिक नियोजनाची जबाबदारी सांभाळत आहेत. विविध नियोजन समित्यांमध्ये मास्टरक्लासेस विभागासाठी गौरी कुलकर्णी (इंडियानापोलिस), चित्रपट स्पर्धा विभागासाठी भालचंद्र कुलकर्णी (टेक्सास), रेड कार्पेट समन्वयासाठी पूजा कारखानीस (कॅलिफोर्निया), आयटी इन्फ्रास्ट्रक्चरची जबाबदारी योगी पाटील (रिचमंड) यांच्याकडे असून, प्रसिद्धी जनसंपर्क नियोजन मानसी देवळेकर(कॅलिफोर्निया), अतिथी संपर्क विभागात लक्ष्मण आपटे यांचेही विशेष योगदान लाभत आहे. या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे यंदाचा नाफा फिल्म फेस्टिव्हल अधिक भव्य, व्यावसायिक आणि संस्मरणीय ठरणार आहे.

महोत्सवाची शान अधिकच वाढवण्यासाठी यावर्षी मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मातब्बर कलावंत अमेरिकेच्या भूमीवर येणार आहेत. जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, महेश मांजरेकर, महेश कोठारे, अतुल कुलकर्णी, नागराज मंजुळे, गुरु ठाकूर, श्रुती मराठे आणि गिरिजा ओक यांची विशेष उपस्थिती महोत्सवाला चार चाँद लावणार आहे. गेल्या वर्षी डॉ. मोहन आगाशे, अमोल पालेकर, संध्या गोखले, सचिन खेडेकर, गजेंद्र अहिरे, अवधूत गुप्ते, अश्विनी भावे, सोनाली कुलकर्णी, आदिनाथ कोठारे, वैदेही परशुरामी आणि मधुर भांडारकर यांनी रसिकांची मने जिंकली होती, तर त्याआधी दिलीप प्रभावळकर, सचिन-सुप्रिया पिळगांवकर, निवेदिता सराफ, महेश मांजरेकर, सुबोध भावे, जब्बार पटेल, उमेश कुलकर्णी, प्रसाद ओक आणि मृणाल कुलकर्णी यांनी महोत्सवाची शान वाढवली होती. यावर्षीची नावे पाहता हे सातत्य आणखी उंचावलेले दिसते!

हॉलिवूडच्या झगमगाटासोबत भारतीय संस्कृतीचा अभिमान, मराठी चित्रपटसृष्टीची ताकद आणि भारतीय कलावंतांची सर्जनशीलता यांचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी देणारा ‘नाफा २०२६’ हा उत्तर अमेरिकेतील भारतीय समुदायासाठी वर्षातील सर्वात मोठा सांस्कृतिक आणि मनोरंजन सोहळा ठरणार असल्याची उत्सुकता आतापासूनच निर्माण झाली आहे.

Monday, June 8, 2026

संघर्षानंतर अखेर ‘द महाराष्ट्र फाईल्स’ १२ जून रोजी होणार प्रदर्शित*

 *संघर्षानंतर अखेर ‘द महाराष्ट्र फाईल्स’ १२ जून रोजी होणार प्रदर्शित*

सामाजिक वास्तवावर भाष्य करणारा आणि समाजातील दुर्बल घटकांच्या न्यायासाठीच्या संघर्षाची कहाणी मांडणारा आगामी मराठी चित्रपट *‘द महाराष्ट्र फाईल्स’* अखेर १२ जून २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.

शासन दरबारी सामान्य माणसाला न्याय मिळवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष, व्यवस्थेतील अडथळे आणि वंचित समाजाच्या वेदना यांचे प्रभावी चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. समाजातील दुर्बल घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा हा चित्रपट केवळ मनोरंजन नसून वास्तवाचा आरसा ठरणार आहे. बंजारा समाजाच्या न्याय, हक्कांसाठी दाखविण्यात येणारी ही भारतातील पहिली फिल्म आहे.

मात्र या चित्रपटाचा प्रवास सोपा नव्हता. विविध कारणांमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाला विलंब झाला आणि या काळात निर्मात्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सेन्सॉर बोर्डाने केलेल्या विलंबामुळे चित्रपटाचं प्रदर्शन लांबल. एक मराठी निर्माता म्हणून या विलंबाचा आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागल्याची भावना निर्मात्यांनी व्यक्त केली आहे. पत्रकार परिषद घेत निर्माते आणि चित्रपटातील कलाकार मंडळींनी या विलंबाबाबत आपली मतं मांडली. यावेळी निर्माते संजीव कुमार राठोड, क्रिएटिव्ह दिग्दर्शक आणि सह निर्माते शालिनी राठोड, अभिनेते मंगेश देसाई यांची उपस्थिती होती.

एकूणच या प्रकरणाबाबत बोलताना निर्माते संजीव कुमार राठोड म्हणाले, “हा चित्रपट समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांच्या संघर्षावर आधारित आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आम्हालाही मोठा संघर्ष करावा लागला. अनेक अडथळे आणि सेन्सॉर बोर्डाच्या विलंबाचा सामना करून अखेर हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणत आहोत. सत्य मांडण्याचा आमचा प्रयत्न प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा आहे.”

या चित्रपटात दिग्गज कलाकार मंडळींची फौज पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री उषा नाडकर्णी, मंगेश देसाई, वीणा जामकर, सयाजी शिंदे, नागेश भोसले, सुनील गोडसे, सन्नी लिओनी, सपना चौधरी, आर्यन राठोड, गौतमी पाटील, मंगली ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी नितीन सावंत, अजित केतकर आणि सिद्धार्थ कश्यप यांनी सांभाळली आहे. दमदार कथा, प्रभावी अभिनय आणि सामाजिक आशय यामुळे *‘द महाराष्ट्र फाईल्स’* हा चित्रपट प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारा ठरणार आहे. अनेक अडचणींवर मात करत आता हा चित्रपट १२ जून रोजी राज्यभर प्रदर्शित होत असून, प्रेक्षकांच्या प्रतिसादाकडे संपूर्ण टीमचे लक्ष लागले आहे.

Sports Authority of India Mumbai Celebrates World Bicycle Day 2026 with Special Edition of ‘Sundays on Cycle’; Over 2,000 Cyclists Participate

 Sports Authority of India Mumbai Celebrates World Bicycle Day 2026 with Special Edition of ‘Sundays on Cycle’; Over 2,000 Cyclists Participate

Mumbai, June 7, 2026: The Sports Authority of India (SAI), Regional Centre Mumbai, under the Fit India Movement, successfully organized the 77th edition of “Sundays on Cycle” as a special celebration of World Bicycle Day 2026 at the iconic Worli Promenade on Mumbai’s Coastal Road. The event witnessed the enthusiastic participation of over 2,000 cyclists, fitness enthusiasts, and citizens from across the Mumbai Metropolitan Region.

The event was graced by Smt. Amruta Fadnavis as the Chief Guest, while renowned actor Shri Jackie Shroff, actor Shri Taha Shah Badussha, and fitness influencer Ms. Nivedita Sreyansh attended as Guests of Honour. Shri Pandurang Chate (IRS), Regional Director, SAI Regional Centre Mumbai, was also present on the occasion.

Addressing the gathering, Smt. Amruta Fadnavis lauded the efforts of all cyclists and participants for embracing cycling as a sustainable and eco-friendly mode of transport and fitness activity. She appreciated the growing cycling culture in Mumbai and highlighted how such initiatives contribute towards environmental conservation while promoting physical and mental well-being. She also commended the Fit India Movement for creating platforms that inspire citizens to lead healthier lives and actively contribute towards building a fitter nation.

Speaking on the occasion, Shri Taha Shah Badussha congratulated the young participants and cycling enthusiasts for their commitment towards fitness. Encouraging everyone to adopt regular physical activity, he reiterated the Fit India message of “Fitness Ki Dose, Aadha Ghanta Roz”, urging citizens to dedicate at least thirty minutes every day towards their health and well-being.

Renowned actor Shri Jackie Shroff highlighted the strong connection between cycling, fitness, and environmental responsibility. He encouraged participants to embrace cycling as a way of life and actively support tree plantation and environmental conservation efforts, reinforcing the importance of sustainable living for future generations.

The programme featured a vibrant 3-kilometre cycling rally along Mumbai’s Coastal Road, symbolizing the collective commitment towards fitness, health, and sustainable mobility.

The event witnessed overwhelming enthusiasm from participants of all age groups, reflecting the growing popularity of cycling as a means of fitness, recreation, and environmental responsibility. The celebration successfully reinforced the objectives of the Fit India Movement and conveyed the message of making fitness an integral part of everyday life.

The event received tremendous support from the cycling fraternity, with more than 40 cycling communities and clubs from across the Mumbai Metropolitan Region coming together to participate in and promote the ride. Their enthusiastic involvement highlighted the growing cycling movement in the region and demonstrated the collective commitment of the cycling community towards fitness, sustainable mobility, and environmental responsibility under the FIT India Movement.

The Sports Authority of India remains committed to promoting fitness and healthy living through initiatives such as Sundays on Cycle, inspiring citizens across the country to adopt active and healthier lifestyles.

*अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद*

 *अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद*


*कलाकार, तंत्रज्ञ आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनी बजावला मतदानाचा हक्क*

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची पंचवार्षिक निवडणूक आज, रविवार दि. ७ जून ला मुंबईत सकाळी ८.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. मुंबई सोबत पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर या विभागांत हे मतदान झाले असून महामंडळाच्या ३४०३ मतदारांपैकी १६९८ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. सरासरी ४९.९० टक्के मतदानाची नोंद झाली. 


सभासदांनी दिलेला हा प्रतिसाद उल्लेखनीय ठरला असून चित्रपट महामंडळाविषयी असलेला विश्वास आणि बांधिलकी अधोरेखित करणारा असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. यंदाच्या निवडणुकीत समर्थ पॅनल आणि चित्रकर्मी पॅनल यांच्यात चुरशीची लढत पहायला मिळाली.


मुंबईत मतदानासाठी उपस्थित असलेल्या कलाकारांमध्ये किशोरी शहाणे, जयवंत वाडकर, सोनाली खरे, केदार शिंदे, निलम शिर्के-सामंत, प्रसाद ओक, स्वप्निल जोशी, विजय गोखले, संजय जाधव, प्रिया बेर्डे, पुष्कर श्रोत्री, अभिजीत पानसे, संदीप पाठक, उषा नाईक, शरद पोंक्षे, प्रदीप वेलणकर, अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर, विद्याधर पाठारे, प्रशांत दळवी, मेघा घाडगे, सादिक चितळीकर, विशाखा सुभेदार, राजू पार्सेकर, ऋषी देशपांडे, रणजीत जोग, अनंत जोग, संजय छाब्रिया, मंगेश देसाई, प्रणव रावराणे, मैथिली जावकर, प्रदीप कबरे आणि सुषमा शिरोमणी आदीं मान्यवरांचा समावेश होता.

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या भविष्यातील वाटचालीसाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जात असून सभासदांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे महामंडळाच्या कार्याबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले. संपूर्ण मतदान प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडल्याबद्दल उपस्थित सभासदांनी समाधान व्यक्त केले.

निवडणुकीची मतमोजणी उद्या, दि. ८ जून रोजी कोल्हापूर येथे होणार असून त्यानंतर अधिकृत निकाल जाहीर करण्यात येईल. त्यामुळे संपूर्ण मराठी चित्रपट क्षेत्राचे लक्ष आता या निकालाकडे लागले आहेत.

Saturday, June 6, 2026

*गो. ब. देवल स्मृतिदिनी रंगकर्मींचा पुरस्कार वितरण सोहळा रंगणार*

 *गो. ब. देवल स्मृतिदिनी रंगकर्मींचा पुरस्कार वितरण सोहळा रंगणार*

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने प्रतिवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ १४ जून रोजी पुरस्कार वितरण सोहळा व कलावंत मेळावा आयोजित करण्यात येतो. यात रंगकर्मींना त्यांच्या रंगभूमीवरील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. *यावर्षीच्या जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस असून सदर ‘पुरस्कार वितरण. सोहळा रविवार, १४ जून रोजी दुपारी ४ वाजता, यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे संपन्न होणार आहे.* 

या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे ‘मर्म बंधातली ठेव ही’ ही बहारदार मैफिल यावेळी रंगणार आहे. स्वरस्वामिनी आशा भोसले आणि मा. दीनानाथ मंगेशकर यांनी अजरामर केलेल्या नाट्यपदांचा सुरेल नजराणा या कार्यक्रमातून रसिकांना अनुभवता येणार आहे. या मैफिलीत गायक श्रीरंग भावे, मृण्मयी फाटक आणि निधी रानडे हे आपल्या स्वरांनी नाट्यसंगीताची जादू उलगडणार आहेत. त्यांना महेश खानोलकर (व्हायोलिन), नीला सोहोनी (हार्मोनिअम) आणि धनंजय पुराणिक (तबला) यांची साथ लाभणार आहे. कार्यक्रमाचे निवेदन मयुरेश साने करणार असून, कार्यक्रमाचे समन्वयन मिती ग्रुप यांनी केले असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तरा मोने करणार आहेत.

नाट्यरसिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य असून पहिल्या पाच रांगा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. विनामूल्य प्रवेशिका ८ जूनपासून यशवंत नाट्य मंदिर येथे उपलब्ध होणार आहेत.

मराठी नाट्यसंगीताचा सुवर्णकाळ अनुभवण्याची आणि रंगभूमीतील मान्यवरांच्या उपस्थितीत एका संस्मरणीय सोहळ्याचा भाग होण्याची ही अनोखी संधी रसिकांनी आवर्जून साधावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघ हे या सोहळ्याचे प्रायोजक आहेत.

Friday, June 5, 2026

*‘समर्थ पॅनल’ कडून मराठी चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी आराखडा*

 *‘समर्थ पॅनल’ कडून मराठी चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी आराखडा*

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष श्री. मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील ‘समर्थ पॅनल’ने पत्रकार परिषदेत मराठी चित्रपटसृष्टीच्या सर्वांगीण विकासासाठी आपला दृष्टीकोन आणि विविध महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केल्या. पत्रकार परिषदेला बिनविरोध निवड झालेले ज्येष्ठ पार्श्वगायक आनंद शिंदे, संकलक विजय खोचीकर यांच्यासह अभिनेते सुशांत शेलार, दीपक कदम, चैत्राली डोंगरे, सुभाष नकाशे, राज काझी, गणेश गारगोटे, अजित शिरोळे, सुनील महाजन आणि प्रवीण पाटील हे उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते. या सर्वांनी ‘समर्थ पॅनल’च्या आगामी वाटचालीसाठी आपला पाठिंबा व्यक्त करत विविध विकासात्मक उपक्रमांची माहिती माध्यमांसमोर मांडली.

अध्यक्ष श्री. मेघराज राजेभोसले यांनी ‘समर्थ पॅनल’चा जाहीरनामा मांडताना मराठी चित्रपटसृष्टीच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण उपक्रमांची घोषणा केली. “आम्ही सर्वजण कलाकारांच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहोत. प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या विभागातील जबाबदाऱ्या आणि कामांचे नियोजन आधीच निश्चित केले आहे. निर्माता असल्याने निर्मात्यांच्या अडचणी आणि वेदना मला जवळून माहीत आहेत,” असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी ग्रामीण भागात लहान स्वरूपाची आधुनिक सिनेमागृहे उभारणे, प्रत्येक जिल्ह्यात नियमित सिनेमहोत्सव आयोजित करणे, तसेच कलाकार आणि चित्रपटसृष्टीशी संबंधित घटकांसाठी पर्यायी रोजगार व व्यवसायाच्या संधी निर्माण करणे, या महत्त्वाच्या योजनांवर भर दिला. मराठी चित्रपटसृष्टी अधिक सक्षम, स्वावलंबी आणि व्यापक करण्यासाठी ‘समर्थ पॅनल’ कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

“न्यायालयीन निर्णयापूर्वी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे सुमारे साडेसतरा हजार मतदार मतदानापासून वंचित राहणार आहेत. भविष्यात मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र सिनेमागृहे उभारण्यासोबतच विक्रम गोखले यांनी महामंडळाला दिलेल्या जमिनीवर वृद्धाश्रम उभारण्याचे काम आमचे संचालक मंडळ हाती घेईल,” असे सुशांत शेलार यांनी सांगितले.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पनवेल विभागातील अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सभासदांना समर्थ पॅनलच्या वतीने मतदानाचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी समर्थ पॅनलची निवडणूक निशाणी ‘पतंग’ असून सभासदांनी पतंग निशाणीसमोरील बटण दाबून पॅनलला विजयी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. महामंडळाच्या निवडणुकीचे मतदान शनिवार, दिनांक ७ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे.

समर्थ पॅनलच्या वतीने मराठी चित्रपट निर्मात्यांना शासनाच्या अनुदान योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा यासाठी महामंडळामार्फत अनुदान फाईल तयार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच मराठी चित्रपटांच्या जागतिक विक्रीसाठी विविध देशांतील फिल्म मार्केटमध्ये प्रभावी यंत्रणा उभारण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला. मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांसाठी राखीव स्क्रीन आणि प्राईम टाईम शो मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून, राज्यभर सक्षम चित्रपट वितरण व्यवस्था उभारण्याचाही संकल्प करण्यात आला. याशिवाय शासन-खाजगी भागीदारीतून राज्यभर ५०० मिनी थिएटर्स उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव मांडण्यात आला.

*जागतिक पर्यावरण दिनी ‘आऊट ऑफ सिलेबस’ टीमचा हरित संदेश; वृक्षारोपणातून चित्रपटाचे प्रमोशन*

 *जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘आऊट ऑफ सिल्याबस’ चित्रपटाच्या टीमकडून वृक्षारोपण*

*जागतिक पर्यावरण दिनी ‘आऊट ऑफ सिलेबस’ टीमचा हरित संदेश; वृक्षारोपणातून चित्रपटाचे प्रमोशन*

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत आगामी मराठी चित्रपट *‘आऊट ऑफ सिल्याबस’* च्या टीमने वृक्षारोपणाचा उपक्रम राबवत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. चित्रपटातील कलाकार, निर्माते आणि संपूर्ण टीमने उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेतला.

यावेळी टीमने विविध प्रकारची झाडे लावून पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित केली. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि वृक्षतोड यांसारख्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

वृक्षारोपणासोबतच ‘आऊट ऑफ सिलेबस’ चित्रपटाचे अनोख्या पद्धतीने प्रमोशनही करण्यात आले. पर्यावरणपूरक उपक्रमातून चित्रपटाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न टीमकडून करण्यात आला. 

यावेळी चित्रपटाचे निर्माते डॉ. सुगत जी वाघमारे, लेखक अनिकेत रामचंद्र कोरडे, AI क्रिएटिव्ह डायरेक्टर सचिन मनोहरराव ढोकणे आणि अभिनेता अजिंक्य राऊत, अद्वयी, शेषपाल गनवीर, अभिजीत रामचंद्र ही कलाकारांची टीम उपस्थित होती. मॅक्सिस सिटी नवी मुंबई येथे हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. सामाजिक जाणीव आणि मनोरंजन यांचा सुंदर संगम घडवणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला. ‘आऊट ऑफ सिल्याबस’ हा चित्रपट तरुणाई, शिक्षण आणि सामाजिक भान या विषयांवर भाष्य करणारा असून, प्रेक्षकांना एक वेगळा आणि प्रेरणादायी अनुभव देणार आहे. 

चित्रपटाबद्दलची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत असून, लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

शेतकऱ्यांच्या अश्रूंनी हादरला महाराष्ट्र; ‘द महाराष्ट्र फाईल’ चित्रपटातून वास्तवाचे दर्शन

  शेतकऱ्यांच्या अश्रूंनी हादरला महाराष्ट्र; ‘द महाराष्ट्र फाईल’ चित्रपटातून वास्तवाचे दर्शन मुंबई (प्रतिनिधी) गेल्या दोन दिवसांपासून महाराष्...