Monday, May 14, 2018


अदाकारा माधुरी म्हणते "होऊन जाऊ द्या!"
OR

"होऊन जाऊ द्या!" बकेट लिस्ट चित्रपटाचं पहिलं-वहिलं गाणं आजपासून सोशल मीडियावर प्रसारित.
OR

"होऊन जाऊ द्या!" म्हणत जगण्याचा अर्थ उलगडणार बकेट लिस्ट.


लवकरच संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणाऱ्या 'बकेट लिस्ट' या माधुरी दीक्षितच्या आगामी मराठी चित्रपटाचं 'होऊन जाऊ द्या!' हे पहिलं-वहिलं गाणं आज दिनांक 9 मे रोजी सोशल मीडियावर प्रसारीत झाले आहे.लाखो लोकांना आपल्या नृत्याने मोहून टाकणारी आपली मराठमोळी मोहिनी 'माधुरी दीक्षित' पुन्हा एकदा 'बकेट लिस्ट' या आपल्या आगामी चित्रपटाच्या संपूर्ण कास्ट बरोबर नृत्याचा ठेका पकडत आपल्या सर्वांना त्यावर नाचायला लावण्यासाठी सज्ज झाली आहे. 'बकेट लिस्ट' हा चित्रपट व्यक्तीच्या मनातील एका गूढ कोपऱ्यात असणाऱ्या ईच्छा, आकांक्षांना उजाळा देणारा असल्यामुळे त्यातील सर्वच गाणी देखील प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस येतील.

'होऊन जाऊ द्या!' हे गाणं आपल्याला आयुष्य जगायला, जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद लुटायला व सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्यास प्रोत्साहीत करते आहे. ह्या गाण्याचं विशेष म्हणजे धकधक गर्ल माधुरी दीक्षितने स्वतः ह्या मराठी गाण्यावर नृत्याचा ताल धरलेला असून तिच्यासमवेत सुमित राघवन, वंदना गुप्ते, शुभा खोटे, प्रदीप वेलणकर, सुमेध मुडगलकर, दिलीप प्रभावळकर, इला भाटे, रेणुका शहाणे, कृतिका देव, मिलिंद पाठक, शालवा किंजवडेकर या 'बकेट लिस्ट' चित्रपटाच्या संपूर्ण टीमने तालात ताल मिसळलेला दिसून येतो आहे.


श्रेया घोषाल, साधना सरगम आणि शान या सुराधिशांच्या स्वरांनी सजलेलं 'होऊन जाऊ द्या!' हे सूर मधुर गाणं रोहन-रोहन या संगीतकार जोड गोळीने संगीतबद्ध केलेलं आहे. तर मंदार चोळकर यांच्या लेखणीतून ते अवतरलं आहे. 


धर्मा, करण जोहर आणि ए ए फिल्म्स प्रस्तुत, दिग्दर्शक  तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित , डार्क हॉर्स सिनेमाज्, दार मोशन पिक्चर्स आणि ब्लू मस्टँग क्रिएशन्स निर्मित चित्रपट बकेट लिस्टयेत्या 25 मे ला संपुर्ण जगभरात प्रदर्शित होणार असून मराठमोळ्या गाण्यावर माधुरीने धरलेला आपल्या नृत्याचा ताल सर्वांना घायाळ करेल यात काही शंकाच नाही.

Song ‘Houn Jau Dya’ from ‘Bucket List’ is a

Celebration of life…

Bucket List is a debut film for Madhuri Dixit in Marathi releasing on the 25th May. The film is all about aspirations and wishes whether they are accumulated within heart or penned down…The aspirations are about the moments that one wishes to come by and brighten life.

The first song ‘Houn Jau Dya’ from the film Bucket List being launched on the 9th May digitally, is a celebration of life full of joy, happiness and dance as also with most modern method of going public.

            Lyrics for the song ‘Houn Jau Dya’ are by Mandar Cholkar and the same has been set to a vibrant tune by the famous duo Music Directors Rohan Pradhan and Rohan Gokhale.

‘Houn Jau Dya’ has been sung by an ace trio Shreya Ghoshal, Sadhana Sargam and Shaan.
             
Bucket List is presented by Karan Johar and AA Films and produced by Jamashp Bapuna and Amit Pankaj Parikh from Dark Horse Cinemas Pvt. Ltd, Arun Rangachari and Vivek Rangachari from Dar Motion Pictures & Aarti Subhedar and Ashok Subhedar from Blue Mustang Creations Pvt. Ltd.

The story is written by Tejas Prabha Vijay Deoskar and screenplay is co-written by him along with Devashree Shivdekar

Bucket List is directed by Tejas Prabha Vijay Deoskar






No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...