Tuesday, August 14, 2018




यंदा स्वातंत्र्याच्या महिन्यात, तेचतेच पुन्हापुन्हा दाखवले जाणारे चित्रपट नकोतच.
एपिक वाहिनीने टीव्हीवर आणले आहेत खरेखुरे नायक आणि भारताच्या शूर लष्करी रेजिमेंट्स यांचे आतून दर्शन घडवणाऱ्या कहाण्या रेजिमेंट डायरीज नावाच्या मालिकेतून       
भारतीय टेलिव्हिजन प्रथमच दाखवणार भारतीय लष्कराच्या रेजिमेंट सेंटर्समधील दृश्ये आणि सैनिकांशी व्यक्तिगत स्तरावर साधलेला संवाद
मुंबई, १३ ऑगस्ट २०१८: एपिक वाहिनीवरील एक आगामी ओरिजिनल मालिका तुम्हाला घेऊन जाणार आहे लष्कराच्या रेजिमेंटल सेंटर्सच्या अतिसंरक्षित तटबंदीच्या आतील जगात.  ही रेजिमेंट सैनिकासाठी दुसरे कुटुंब असते आणि प्रत्येक रेजिमेंटचा स्वत:चा असा एक प्रसिद्ध इतिहास  असतो व वैभवशाली परंपराही असतातया मालिकेतून रेजिमेंटच्या आतील गोष्टीत्या देत असलेले प्रशिक्षणत्यांचा वारसा आणि एका सामान्य नागरिकाचे रूपांतर सैनिकामध्ये करणाऱ्या प्रत्येक बाबीबद्दल बरेच काही बघायला मिळणार आहे.   
१६ ऑगस्टपासून प्रसारित होणारी रेजिमेंट डायरीज ही मालिका म्हणजे या रेजिमेंट्स घडवणाऱ्या आणि आयुष्यातील सर्वांत साध्या गोष्टीलामातृभूमीवरील प्रेमालासर्वांत अग्रस्थानी ठेवणाऱ्या शूरवीरांना केलेला सलाम आहेया मालिकेचा प्रत्येक भाग हृदय उचंबळवून टाकणाऱ्या, डोळ्यांच्या कडा ओलावणाऱ्या आणि भारताच्या या सर्वांत धाडसी सुपुत्रांबद्दलचा आदर आणखी वाढवणाऱ्या कहाण्यांचे दर्शन घडवणार आहे
यापूर्वी भारतीय लष्कराबद्दल सांगणारे अनेक माहितीपट आणि चित्रपट आले आहेत पण रेजिमेंटल सेंटर्सच्या आतमधील जगाचे दर्शन एवढ्या मोठ्या प्रमाणावर घडवले जाण्याची ही पहिलीच वेळ आहेलष्करातील अनेक खऱ्याखुऱ्या सैनिकांनीयात सेवानिवृत्त झालेल्या व सध्या कार्यरत असलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या सैनिकांचा समावेश होतोत्यांच्या आयुष्याबद्दल तसेच शांततेच्या व युद्धाच्या काळात एक सैनिक म्हणून आलेल्या अनुभवांबद्दल सांगितले आहे.  
एपिक वाहिनीने या मालिकेसाठी भारतीय लष्कराचा माहिती व जनसंपर्क विभाग अर्थात एडीजी-पीआयसोबत बरेच काम केले आहेत्याचप्रमाणे प्रत्येक रेजिमेंट सेंटरकडे मालिकेसाठी परवानग्या मागणेत्यासाठी आवश्यक ती प्रत्येक प्रक्रिया पूर्ण करणे आणि राष्ट्राच्या शूरवीरांना शोभेल अशा पद्धतीने त्यांच्या कहाण्या लोकांसमोर मांडणे यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे.
एपिक वाहिनीचे कंटेण्ट आणि प्रोग्रामिंग विभागाचे प्रमुख अकुल त्रिपाठी म्हणालेभारताचे प्रत्येक अंग साजरे करणे हे आमचे उद्दिष्ट आहे आणि भारतीय लष्कराचा समावेश होत नाहीतोवर हे साजरीकरण अपूर्णच राहिले असतेही मालिका आमच्यासाठी अनेक मार्गांनी विशेष आहेआम्हाला लष्कराबद्दल व्यक्तिगत स्तरावर वाटणारी कृतज्ञता आणि अभिमान व्यक्त करण्याचा हा एक मार्ग आहेया मालिकेवर काम करणाऱ्या प्रत्येकाने आपल्या कामावर थोडेसे जास्त कष्ट घेतले आहेत आणि त्याबद्दल त्यांच्याकडे एकच सांगण्यासारखे आहे- ‘इतना तो बनता है’.”
ही साप्ताहिक मालिका दर गुरुवारी रात्री १० वाजता प्रसारित होईलयामध्ये भारताच्या इतिहासातील विविध युद्धांच्या कथा सांगणारे आणि यातील प्रत्येक रेजिमेंटच्या योगदानाविषयी सांगणारे भाग आहेतयात युद्धाच्या आणि युद्धासाठी केलेल्या तयारीच्यासैनिकांना युद्धासाठी सज्ज करण्याच्या आठवणी आहेतप्रत्येक भागात रेजिमेंटच्या विशिष्ट अशा परंपरा व संस्कृती तसेच भारतीय लष्कराच्या व्यक्तिमत्वात व वैविध्यात त्या कशा रितीने भर घालतात हे उलगडून दाखवण्यात आले आहे
मालिका सुरू होईल ती मद्रास इंजिनीअर्स ग्रुप रेजिमेंटवरील भागानेत्यानंतर राजपुताना रायफल्ससिख रेजिमेंटजाट रेजिमेंटमराठा लाइट इन्फंट्री यांच्यावरील भाग या मालिकेत आहेत.
स्वातंत्र्यदिनी रेजिमेंट डायरी या मालिकेचे सार सांगणारे चार मिनिटांचे ट्रेलर एपिक वाहिनीवर प्रसारित केले जाईलस्वातंत्र्यदिनासाठी विशेष तयार करण्यात आलेल्या दिवसभराच्या कार्यक्रमाचा हे ट्रेलर भाग असेलयाशिवाय वाहिनीच्या लोकप्रिय मालिकांतील भागमेजर जनरल जीडीबक्षी यांचे भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या युद्धांबद्दलचे खिळवून ठेवणारे माहितीपट दाखवले जाणार आहेतयाशिवाय, ‘भारत की आवाज’ या मालिकेतील भारतीय नेत्यांची भारतीय राजकारण व समाजाचे स्वरूप बदलून टाकणारी वैशिष्ट्यपूर्ण भाषणेही दाखवली जाणार आहेत.
बघा रेजिमेंट डायरीज १६ ऑगस्टपासूनदर गुरुवारीरात्री १० वाजताकेवळ एपिक वाहिनीवर.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

  India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026 IIJS Bharat – Signature 2026 to expected to ge...