Tuesday, August 14, 2018




&TV वरील लाल इश्क मालिकेत पहिल्यांदाच प्रिन्स आणि युविका खऱ्या आयुष्यातील प्रेम पडद्यावरही साकारणार
प्रिन्स नरूला आणि युविका चौधरी हे जोडपं टीव्ही जगतातलं सर्वात लाडकं जोडपं आहे. एका रिअॅलिटी शोमधून त्यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली. या  सुंदरशा कहाणीनंतर हे जोडपं लवकरच लाइव्ह लग्नबंधनात अडकणार आहे. एकमेकांवरचा विश्वास दृढ होत जातो, तेव्हा ते जोडपं प्रेमात मुरायला लागलेलं असतं, त्याची ही पोचपावतीच आहे. पण सुपरनॅचरल गोष्टींमध्ये त्यांचं हे प्रेम हरवून गेलं तर? याच धर्तीवर या जोडप्याला प्रेमाची अनाकलनीय बाजू शोधायची आहे. &TVवरील लाल इश्क या मालिकेमध्ये या शोधाला चालना देण्यासाठी हे जोडपं पूर्णपणे तयार आहे.
खऱ्या आयुष्यातील हे प्रेमी युगुल प्रतीक शर्मा (एलएसडी फिल्म्स)निर्मित या मालिकेतील एका भागात प्रमुख पात्रं रंगवणार आहेत. परंतु या भागाची कहाणी त्यांच्या खऱ्या आय़ुष्यातील प्रेमकहाणीपेक्षा अगदी वेगळी आहे. सुपरनॅचरल गोष्टींचा शोध घेत जाणारी ही कथा आर्यन (प्रिन्स) आणि शिखा (युविका)च्या सुंदर लग्नाची कहाणी उलगडते.
ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याबरोबर पहिल्यांदाच काम करण्याबद्दल युविका बोलत होती, ``प्रिन्स आणि मी एकत्र पडद्यावर यावं अशी अनेक चाहत्यांची इच्छा होती आणि लाल इश्कने इतक्या चांगल्या कथेद्वारे ती संधी आम्हाला दिली. कथा किंवा माझ्या पात्राबद्दल काही शंकाच नव्हती, त्यामुळे कथा सोडण्याचा प्रश्नच नव्हता, शिवाय प्रेक्षकांसाठी हा उत्तम भाग असणार आहे, अशी माझी खात्री आहे.’’
प्रिन्स म्हणाला की, ``लाल इश्कमध्ये एकत्र काम करतोय याबद्दल युवि (युविका) आणि मी अतिशय उत्सुक आहोत, आमच्या चाहत्यांनाही आम्ही पडद्यावर एकत्र काम करावं असं वाटतंच होतं. कथा अतिशय उत्साहवर्धक आणि अचानक वळण घेणारी असल्याने आम्हाला शूटिंग करताना खूपच मजा आली. आम्हा दोघांपैकी कुणी असं काम केलेलं नव्हतं, म्हणून आमचा उत्साह द्विगुणित झाला होता. या भागाबद्दलची प्रेक्षकांची प्रतिक्रिया बघण्यासाठी आता आम्ही उत्सुक आहोत. अर्थात, युविकाबरोबर रोमान्स करण्याची आणखी एक संधी यामुळे मला मिळाली आहे.’’
प्रेमी युगुलाची आणि त्यांच्या प्रेमाला असलेल्या काळ्या झालरीची ही गोष्ट पाहा लाल इश्कमध्ये
शनिवार आणि रविवारी रात्री १० वाजता फक्त &TVवर
.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

  India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026 IIJS Bharat – Signature 2026 to expected to ge...