Monday, April 19, 2021

 अभिनेता स्वप्नील जोशीने 'लेटफ्लिक्स'सोबतच्या नव्या उपक्रमाची गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर केली घोषणा

 

 

                   आपल्या अभिनयाने हिंदी तसेच मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या स्वप्नील जोशीने लेटफ्लिक्स मराठी सोबतच्या नव्या उपक्रमाची घोषणा केली. निर्माता-उद्योजक नरेंद्र फिरोदिया व इंडिया नेटवर्कचे संस्थापक राहूल नार्वेकर या दोघांनी मिळून 'लेटफ्लिक्सहे नवे ओटीटी प्लॅटफॉर्म लाँच केले. लेट्सफ्लिक्स मराठीमुळे नवोदित कलाकारांना सुवर्णसंधी मिळणार आहे. लेट्सफ्लिक्स गुजरातीभोजपुरीबांगलासह इतर १२ प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रेक्षकांना वेगवेगळ्या विषयांवर आधारित कार्यक्रमवेब सीरिजशॉर्टफ्लिम्सडॉक्युमेंट्रीज व ओरिजनल मराठी सिनेमांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे. 'लेट्सफ्लिक्सच्या घोषणेपासून ते मनोरंजन क्षेत्रात चर्चेला उधाण आलं आहे.

 

                 गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून स्वप्नील जोशीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रदर्शित केला. या व्हिडिओमध्ये त्याने 'लेटफ्लिक्ससोबतच्या त्याच्या नव्या उपक्रमाची घोषणा केली. हा उपक्रम काय असेलकशाशी निगडित असेल हे मात्र त्याने गुलदस्त्यातच ठेवले. त्याच्या ह्या व्हिडीओमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

               स्वप्नील जोशीचा हा नवा उपक्रम सिनेमा असेल का किंवा एकदा कार्यक्रम किंवा वेब सीरिजया सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना येत्या १ मेला मिळणार आहेत.


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...