Monday, April 26, 2021

नवीन सिनेमाच्या निमित्ताने मोनालिसा बागलने केले वजन कमी

 मोनालिसा बागलचा Fit & Fine  लूक लॉकडाऊनमध्ये फिटनेसकडे दिले जास्त लक्ष



 

नवीन सिनेमाच्या निमित्ताने मोनालिसा बागलने केले वजन कमी

 

What A Transformation! पाहा मोनालिसा बागलचा Fit & Fine  लूक

 

गेल्या वर्षीचा लॉकडाऊन आपण सर्वांनी अनुभवला आणि यंदाचा लॉकडाऊन देखील अनुभवतोय. लॉकडाऊनमध्ये आपण काय करू शकतो तर आपण घराबाहेर न पडता स्वतःची काळजी आणि इतरांची काळजी घेऊ शकतो. घरी बसल्या आपल्याला आवडेल त्या गोष्टी करून आपलं मन गुंतवून ठेवू शकतो. अनेक ठिकाणी कामांना पुन्हा ब्रेक लागला आहे. वर्क फ्रॉम होम सुरू झाल्यामुळे पुन्हा अनेकांना घरून काम  करावे लागतेय त्यामुळे 'जग थांबलंयही भावना पुन्हा एकदा बऱ्याच जणांच्या मनात सतत येतेय हे सोशल मीडियावरून लक्षात येते. यासाठी एकच उपाय म्हणजे 'संयम'. सर्व काही सुरळीतपणे पुन्हा सुरू होईल असा विश्वास बाळगाअसं अभिनेत्री मोनालिसा बागल सांगतेय.

 

सिनेमाचे शूटिंग सुरू झाले होतेनवीन वर्षाची नवी उमेद मिळाली होती आणि असं असताना सिनेसृष्टीला देखील ब्रेक लागला. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेचा मोनालिसा बागलने पुरेपूर वापर केलास्वतःला वेळ दिला आरोग्याची काळजी घेतली. नवीन वर्षात सर्वकाही सुरळीत चालू होतेत्यावेळी तिने वजन कमी करण्याकडे विशेष लक्ष दिले. एका सिनेमासाठी ती वजन कमी करत होती आणि पुन्हा लॉकडाऊन आला... पण आता मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करतफिटनेसकडे पूर्णपणे लक्ष देतयोग्य डाएट करून मोनालिसा कमी केलेले वजन तसेच मेन्टेन करण्याकडे विशेष लक्ष देतेय.

 

मोनालिसा ही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. मध्यंतरी तिच्या फोटोंवरूनइंस्टाग्राम रिल्सवरून तिचा Fit & Fine  लूक तिच्या चाहत्यांच्या लक्षात आला होता.  वजन कमी केल्या नंतरचे नवीन स्टायलिश आणि ट्रेडिशनल फोटो मोनालिसाने शेअर केले होते. अर्थाततिचे नवीन फोटोज् आणि तिच्या या नवीन लूक साठी त्यांनी तिचे कौतुक केले.


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

चाळीस वर्षांनी 'पुरुष' पुन्हा एकदा गाजवणार मराठी रंगभूमी

  चाळीस वर्षांनी 'पुरुष' पुन्हा एकदा गाजवणार मराठी रंगभूमी  १४ डिसेंबरला सादर होणार पहिला प्रयोग  जयवंत दळवी यांच्या लेखणीतून साकारल...