Friday, September 24, 2021

महानायक अमिताभ बच्चन यांनी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातल्या हास्यवीरांचं कौतुक केलं!


 
विनोदवीरांना मिळाली महानायकाची कौतुकाची थाप - हास्यजत्रेच्या टीमनं महानायक अमिताभ बच्चन यांची भेट घेतली

सगळ्यांची लाडकी आणि प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारी सोनी मराठी वाहिनीची 'महाराष्ट्राची हास्यजत्राही अनेक मोठमोठ्या कलाकारांचीसुद्धा आवडती आहे आणि आता या कलाकारांच्या यादीत नाव जोडलं गेलं आहे दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांचंअगदी बरोबर वाचलंत मंडळीमहाराष्ट्राच्या लाडक्या हास्यकलाकारांनी फिल्मसिटी इथं जाऊन अमिताभ बच्चन यांची भेट घेतलीया वेळी अमिताभजींनी सर्व हास्यवीरांचं आणि हास्यजत्रेचं कौतुक केलं, 'तुम्ही लोकांना हसवण्याचं अतिशय कठीण असं  काम करताहातते सतत असंच करत राहा', असं ते म्हणाले आणि ते स्वतःही हास्यजत्रा पाहत असल्याचं आणि आपल्या कुटुंबालाही हास्यजत्रेबद्दल सांगत असल्याचं त्यांनी आवर्जून नमूद केलं.


 

सर्वांची आवडती हास्यजत्रा ही रविवारी केल्यावर अनेक प्रेक्षकांनी ती पुन्हा चार दिवस व्हावी आणि त्यांचा हास्याचा डोस आठवड्यातून चार दिवस मिळावाअशी मागणी केली होतीप्रेक्षकांच्या मागणीचा मान राखून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा२० सप्टेंबरपासूनसोमवार ते गुरुवार रात्री  वाअसे चार दिवस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेकार्यक्रमाच्या पहिल्या भागापासून हास्यजत्रेला प्रेक्षकांचं प्रेम मिळू लागलंसमीर-विशाखाप्रसाद-नम्रतागौरव-वनिता आणि हास्यजत्रेतल्या इतर हास्यवीरांनी मिळून प्रेक्षकांना आपल्या विनोदांनी आणि प्रहसनांनी नवी उमेद दिली आहे.

 

आता हसण्याचे वार होणार आठवड्यातून चारपाहायला विसरू नका 'महाराष्ट्राची हास्यजत्रासोमवार ते गुरुवाररात्री  वाफक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Zam Zam Perfumers brings 35 years of non-alcoholic fragrance heritage to Mumbai with first store launch

Zam Zam Perfumers brings 35 years of non-alcoholic fragrance heritage to Mumbai with first store launch Mumbai, June 20, 2026: Zam Zam Perfu...