Monday, September 27, 2021

'जिंदगानी' चित्रपटाद्वारे नवोदित अभिनेत्री वैष्णवी शिंदेचे चित्रपटसृष्टीत पदार्पण !

 

नर्मदा सिनेव्हीजन्स निर्मित आणि विनायक भिकाजीराव साळवे दिग्दर्शित 'जिंदगानीचित्रपटाद्वारे वैष्णवी शिंदे हिचे चित्रपटसृष्टीत पदार्पण होत आहे. या चित्रपटात अभिनेते शशांक शेंडे आणि अभिनेते विनायक साळवे यांसमवेत वैष्णवी प्रमुख भूमिकेत आढळून येणार आहे.

 

'जिंदगानीह्या वैष्णवीच्या पहिल्याच चित्रपटात काम करतानाच्या तिच्या अनुभवाबद्दल सांगताना वैष्णवी म्हणते की, "चित्रीकरणाची संपूर्ण प्रोसेस माझ्यासाठी खूपच नवीन होती. त्यामुळे 'जिंदगानीचित्रपटात काम करायची संधी मला मिळतेय हे कळल्यावर मला खूप आनंद झाला. चित्रीकरणादरम्यान अनेक गोष्टी मला शिकता आल्या. शशांक शेंडेंसारख्या दिग्गज कलाकारांबरोंबर काम करण्याचे अविस्मरणीय क्षण गाठीशी बांधता आले."

 

अभिनेते शशांक शेंडेंबरोबर काम करतानाच्या तिच्या अनुभवाबद्दल सांगताना वैष्णवी म्हणते की, "हा माझा पहिलाच चित्रपट असल्यामुळे आणि शशांक सरांइतके दिग्गज कलाकार समोर असल्यामुळे सुरुवातीला मला खूप दडपण आलं होत. परंतु हे जेव्हा शशांक सरांना कळलं तेव्हा त्यांनी मला खूप छानप्रकारे सर्व गोष्टी समजावून सांगत तेथील संपूर्ण वातावरण एकदम  हसतं-खेळतं केलं त्यामुळे शूटिंग करायला खूप मजा आली.

 

लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेली वैष्णवी 'जिंदगानीचित्रपटात अभिनय करण्याच्या मिळालेल्या संधींसंदर्भात सांगते की, "मी शाळा आणि कॉलेजमध्ये नाटकात आणि वार्षिक मोहोत्सवात दरवर्षी न चुकता भाग घेत असे. त्याचबरोबर एखाद्या चित्रपटातील पात्र मला आवडलं तर घरी येऊन तसंच तयार होऊन फोटो काढायला मला आवडतं. माझ्या घरी माझे वेगवेगळ्या पात्रांच्या वेशभूषेतील फोटोज देखील लावलेले आहेत. एकदा दिग्दर्शक विनायक भिकाजीराव साळवे सहज एका कामानिमित्त घरी आले असता त्यांनी माझे घरी लावलेले फोटोज पाहून माझ्यातील अभिनय कला जाणली आणि मला 'जिंदगानीचित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

 

नर्मदा सिनेव्हीजन्स निर्मित आणि विनायक भिकाजीराव साळवे दिग्दर्शित 'जिंदगानीहा बदलत्या काळानुसार माणसाच्या बदलत्या जीवनशैलीची जीवनगाथा सांगणारा चित्रपट लवकरच आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...