Thursday, September 30, 2021

वैभव तत्ववादी अभिनित ग्रे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस!

 


अल्पावधीतच आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता वैभव तत्ववादी लवकरचं 'ग्रेनामक एक रहस्यमय थरारक चित्रपट घेऊन आपल्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झाला असून त्यास  प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद देखील मिळत आहे.

 

दिग्दर्शक अभिषेक जावकर दिग्दर्शित 'ग्रेचित्रपटात वैभव 'सिद्धांतनामक एका युवकाची भूमिका साकारत आहे. ग्रे ही सिद्धांतच्या कुटुंबाच्या दुर्दैवी बादल्याच्या बदल्याची कथा आहे. या चित्रपटात वैभव तत्त्ववादी समवेत पल्लवी पाटीलमयुरी देशमुखशरद पोंक्षेअविनाश नारकरपुष्कराज चिरपूटकर असे एकापेक्षा एक अव्वल कलाकार आपणांस ह्या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. अभिषेक जावकर आणि स्पृहा जोशी यांनी या चित्रपटाचे लेखन केलेले असून विजय भाटे आणि केवल वाळुंज यांच्या संगीताची जोड या चित्रपटास लाभली आहे.

 

रेड बल्ब मूव्हीज आणि का का किंडल एंटरटेनमेंट निर्मितअभिषेक जावकर दिग्दर्शित 'ग्रेहा चित्रपट येत्या १ ऑक्टोबरला झीप्रीमियर वर आपल्या भेटीस येणार आहे.

Below is the trailer link of grey-

https://youtu.be/9ZgCPdL7NQI


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

  India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026 IIJS Bharat – Signature 2026 to expected to ge...