Friday, January 12, 2024

कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांची मुलगी आणि नातू भगवतीताई सातारकर आणि चिन्मयदादा सातारकर जपणार “वसा संस्कृतीचा.

 कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांची मुलगी आणि नातू भगवतीताई सातारकर आणि  चिन्मयदादा सातारकर जपणार “वसा संस्कृतीचा - वारसा किर्तनाचा”; नक्की अनुभवा आपली कीर्तन परंपरा 'सन मराठी' वर


"ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस "...
महाराष्ट्राला लाभलेली आणि शतकांचा इतिहास असलेली आपली संत परंपरा. नवविधा भक्ती मधील दुसरी भक्ती म्हणजे कीर्तन.

महाराष्ट्र ही संतांची भूमी असे आपण अभिमानाने म्हणतो आणि या आपल्या महान संतांनी त्यांचे विचार, त्यांची संत वाणी ही विविध अभंगातून आपल्याला सांगितली. पण सामान्य माणसाला त्यातला मतितार्थ समजणे तसे कठीणच आणि तिथेच तयार झाले आपले किर्तनकार.

कोणत्याही जाती धर्माची बंधनं न पाळता केवळ भगवत भक्ती हा ज्याचा पाया आहे, अशा वारकरी संप्रदायाची, कीर्तनाची परंपरा एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे पोहोचवण्याचा मानस ‘सन नेटवर्क’च्या ‘सन मराठी’ वाहिनीचा आहे.

‘सन मराठी’ वाहिनी आपल्या संस्कृतीचा वसा आणि कीर्तनाचा वारसा जपण्यासाठी, पुढील पिढीकडे पोहचवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत आहे आणि ते पाऊल म्हणजे कीर्तनाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत संतांचे विचार पोहचवणारा कार्यक्रम “वसा संस्कृतीचा - वारसा किर्तनाचा”. नवीन वर्षाची सुरुवात अतिशय पारंपारिक विचारांनी झाली हे नक्की. ९ जानेवारी २०२४ पासून दररोज सकाळी ७:३० वाजता हा कार्यक्रम ‘सन मराठी’ वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्राला मिळालेला वारसा, अविरतपणे पुढे नेण्याचा प्रयत्न ‘सन मराठी’ वाहिनीने केला असून ‘ह.भ.प. भगवतीताई सातारकर’, ‘ह.भ.प. चिन्मयदादा सातारकर’, ‘ह.भ.प.कांचनताई जगताप’, ‘ह.भ.प. शिवलीलाताई पाटील’, ‘ह.भ.प. सोहम महाराज काकडे’ यांचे उल्लेखनीय योगदान लाभले आहे.

आपले किर्तनकार म्हणजे संतांचे फॅन फॉलॉवर्सच म्हणा ना. अगदी ज्ञानोबा तुकाराम माऊलींपासून नीलोबांपर्यंत संतांनी केलेले अभंग समजून घेऊन, स्वतः आचरणात आणून ते महान विचार आणि त्यामागील अर्थ लोकांनां समजावणे म्हणजे किर्तन. कीर्तनातून समाज सुधारण्याचे मोलाचे काम घडते. काही किर्तनकार मूळ अभंगात सध्याच्या काळानुसार थोडे फार बदल घडवून सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत त्यामागील विचार लोकांना सांगतात. ऐकणारा श्रोता ऐकता ऐकता गुंग होईल आणि संतांचे महान विचार हे आपल्या रोजच्या जीवनात आचरणात आणतील याची खात्री किर्तनकार घेत असतात.

कीर्तन आता पुढच्या पिढीपर्यंत यशस्वीपणे पोहचणार, याची खात्री ‘सन मराठी’ वाहिनी घेणार असून प्रत्येकांनी आपली संस्कृती जपण्यासाठी दररोज सकाळी ७:३० वाजता “वसा संस्कृतीचा - वारसा किर्तनाचा” हा कार्यक्रम नक्की पाहा आणि आपल्या घरातील तरुण पिढींनासुध्दा नक्की पाहायला सांगा.


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...