Saturday, January 6, 2024

सवंगडीचा ११ वा वर्धापनदिन होणार साजरा


 सवंगडीचा ११ वा वर्धापनदिन होणार साजरा



मुलूंडची सवंगडी अशी वेगळी ओळख निर्माण होण्यासाठी संशोधनाची जोड असलेला ११ वर्षाचा अविरत प्रवासच कारण आहे. ७ जानेवारीला सवंगडीचा वर्धापनदिन महाराष्ट्र सेवा संघ मुलूंड पश्चिम येथे साजरा होत आहे.मुलांचे बालपण व भावविश्वाचा अभ्यासपूर्ण विचार ही खरी सवंगडीची ओळख आहे. “मुलांना शिकवू नका,शिकू द्या” हे सवंगडीचे ब्रिद वाक्य श्रध्दा ताईंच्या विचाराचे वेगळेपण सवंगडीत घडणा-या मुलांमध्ये ही जाणवते. सवंगडीच्या संचालिका श्रध्दाताई सवंगडीच्या माध्यमातून मुलांच्या नैसर्गिक वाढीला पोषक वातावरण देऊन,मुलांच्या उपजत क्षमतांना संधी देणारे उपक्रम राबवत आहेत.

लहान वयात शाळा,स्पर्धा यांची शृंखला मुलांच्या आयुष्याला फुलण्यासाठी ,मोकळा श्वास घेण्यासाठी व सर्वात महत्वाचे स्वतःला ओळखण्यासाठी वेळ देतात का ? या प्रश्नाचे उत्तर सवंगडीच्या उपक्रमांना बघितल्यावर मिळते.

संपूर्णपणे मराठी भाषा,संस्कृती व वैज्ञानिक दृष्टीकोन यांचा सुरेख संगम सवंगडीत दिसतो.सवंगडीच्या माध्यमातून सुदृढ शरीर व संस्कारक्षम मन घडते.कुटूंबाचा व समाजाचा विचार करणारी पिढी घडावी ही इच्छा मनात ठेवूनच श्रध्दाताईंनी सवंगडी सुरू केली. आता हा सवंगडीचा वटवृक्ष बहरत राहो हि वर्धापन दिनाचे औचित्य साधुन शुभेच्छा देऊ या.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

‘जर्नी’तील आत्मशोधावर आधारित शीर्षक गीत प्रदर्शित..

‘जर्नी’तील आत्मशोधावर आधारित शीर्षक गीत प्रदर्शित..  सचिन दाभाडे फिल्म्स प्रस्तुत ‘जर्नी’ या आगामी चित्रपटाचे शीर्षक गीत नुकतेच प्रदर्शित झा...