संस्कृतीचा वसा आणि कीर्तनाचा वारसा जपण्यासाठी ‘सन मराठी’ वाहिनीने उचलले महत्त्वाचे पाऊल
“वसा संस्कृतीचा - वारसा कीर्तनाचा” या ‘सन मराठी’च्या नव्या कार्यक्रमातून जपली जाणार आपली संत परंपरा
‘सन मराठी’ने केली नवीन वर्षाची सुरुवात आपल्या संत परंपरेपासून; “वसा संस्कृतीचा - वारसा कीर्तनाचा” पुढच्या पिढीपर्यंत पोहचवणार वारकरी संप्रदायाची, कीर्तनाची परंपरा
९ जानेवारी २०२४ पासून ‘सन मराठी’ जपणार “वसा संस्कृतीचा - वारसा कीर्तनाचा”
"ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस "...
महाराष्ट्राला लाभलेली आणि शतकांचा इतिहास असलेली आपली संत परंपरा. नवविधा भक्ती मधील दुसरी भक्ती म्हणजे कीर्तन.
महाराष्ट्र ही संतांची भूमी असे आपण अभिमानाने म्हणतो आणि या आपल्या महान संतांनी त्यांचे विचार, त्यांची संत वाणी ही विविध अभंगातून आपल्याला सांगितली. पण सामान्य माणसाला त्यातला मतितार्थ समजणे तसे कठीणच आणि तिथेच तयार झाले आपले कीर्तनकार.
कोणत्याही जाती धर्माची बंधनं न पाळता केवळ भगवत भक्ती हा ज्याचा पाया आहे, अशा वारकरी संप्रदायाची, कीर्तनाची परंपरा एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे पोहोचवण्याचा मानस ‘सन नेटवर्क’च्या ‘सन मराठी’ वाहिनीचा आहे.
‘सन मराठी’ वाहिनी आपल्या संस्कृतीचा वसा आणि कीर्तनाचा वारसा जपण्यासाठी, पुढील पिढीकडे पोहचवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत आहे आणि ते पाऊल म्हणजे कीर्तनाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत संतांचे विचार पोहचवणारा कार्यक्रम “वसा संस्कृतीचा - वारसा कीर्तनाचा”. नवीन वर्षाची सुरुवात अतिशय पारंपारिक विचारांनी होणार हे नक्की. ९ जानेवारी २०२४ पासून सकाळी ७:३० वाजता हा कार्यक्रम ‘सन मराठी’ वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्राला मिळालेला वारसा, अविरतपणे पुढे नेण्याचा प्रयत्न ‘सन मराठी’ वाहिनीने केला असून ‘ह.भ.प. भगवतीताई सातारकर’, ‘ह.भ.प. चिन्मयदादा सातारकर’, ‘ह.भ.प.कांचनताई जगताप’, ‘ह.भ.प. शिवलीलाताई पाटील’, ‘ह.भ.प. सोहम महाराज काकडे’ यांचे उल्लेखनीय योगदान लाभले आहे.
आपले कीर्तनकार म्हणजे संतांचे फॅन फॉलॉवर्सच म्हणा ना. अगदी ज्ञानोबा तुकाराम माऊलींपासून निळोबांपर्यंत संतांनी केलेले अभंग समजून घेऊन, स्वतः आचरणात आणून ते महान विचार आणि त्यामागील अर्थ लोकांनां समजावणे म्हणजे कीर्तन. कीर्तनातून समाज सुधारण्याचे मोलाचे काम घडते. काही कीर्तनकार मूळ अभंगात सध्याच्या काळानुसार थोडे फार बदल घडवून सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत त्यामागील विचार लोकांना सांगतात. ऐकणारा श्रोता ऐकता ऐकता गुंग होईल आणि संतांचे महान विचार हे आपल्या रोजच्या जीवनात आचरणात आणतील याची खात्री कीर्तनकार घेत असतात.
कीर्तन आता पुढच्या पिढीपर्यंत यशस्वीपणे पोहचणार, याची खात्री ‘सन मराठी’ वाहिनी घेणार असून प्रत्येकांनी आपली संस्कृती जपण्यासाठी ९ जानेवारी २०२४ पासून सकाळी ७:३० वाजता “वसा संस्कृतीचा - वारसा कीर्तनाचा” हा कार्यक्रम नक्की पाहा आणि आपल्या घरातील तरुण पिढीला सुध्दा नक्की पाहायला सांगा.
मुखी सदैव पांडुरंगाचे नाम घेऊ,
कीर्तनाचा वारसा अखंड चालू ठेऊ !
वसा संस्कृतीचा... 'वारसा कीर्तनाचा' ९ जानेवारीपासून दररोज सकाळी ७:३० वाजता फक्त आपल्या सन मराठीवर.
#VasaSanskrutichaVarsaKirtanacha #Sunमराठी #SunMarathi #सोहळानात्यांचा #SohalaNatyancha #Kirtansohala
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST