Friday, January 5, 2024

१५ जानेवारीपासून ‘मुलगी पसंत आहे’; ‘सन मराठी’च्या नव्या मालिकेची पत्रकार परिषद आयोजित, हर्षदा खानविलकर, कल्याणी टिभे, संग्राम समेळ यांना पत्रकारांनी दिल्या शुभेच्छा

१५ जानेवारीपासून ‘मुलगी पसंत आहे’; ‘सन मराठी’च्या नव्या मालिकेची पत्रकार परिषद आयोजित, हर्षदा खानविलकर, कल्याणी टिभे, संग्राम समेळ यांना पत्रकारांनी दिल्या शुभेच्छा

‘सन मराठी’च्या ‘मुलगी पसंत आहे’ मालिकेच्या पत्रकार परिषदेत हर्षदा खानविलकर, कल्याणी टिभे, संग्राम समेळ यांनी पत्रकारांसोबत शेअर केला नव्या मालिकेचा आनंद

हर्षदा खानविलकर, कल्याणी टिभे, संग्राम समेळ यांची ‘मुलगी पसंत आहे’ मालिका १५ जानेवारीपासून फक्त ‘सन मराठी’ वर

हर्षदा खानविलकर, कल्याणी टिभे, संग्राम समेळ यांच्या ‘मुलगी पसंत आहे’ या ‘सन मराठी’च्या मालिकेची रंगली पत्रकार परिषद

भूतकाळात अशा काही वाईट गोष्टी घडतात ज्याचे पडसाद माणसांच्या मनावर आणि येणा-या भविष्यातील हालचालीवर उमटतात. घडलेल्या वाईट घटना मनाला इतक्या भिडतात की अन्यायाविरुध्द आवाज उठवणं गरजेचं वाटतं. अशीच एक भयानक घटना स्वत:च्या बहिणीच्या आयुष्यात घडल्यावर कोणती बहिण शांत बसेल? नेमंक कोणाच्या बाबतीत काय घडलंय हे प्रेक्षकांना ‘सन नेटवर्क’च्या ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘मुलगी पसंत आहे’ या नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे. 

‘मुलगी पसंत आहे’ मालिका येत्या १५ जानेवारीपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने ‘सन मराठी’ वाहिनी नवीन वर्षात एक आगळी-वेगळी कथा घेऊन येतेय जी सासू आणि सून या दोन पात्रांवर जास्त भर देते. या मालिकेत अभिनेत्री हर्षदा खानविलकर सासूच्या भूमिकेत दिसणार आहे तर अभिनेत्री कल्याणी टिभे सूनेची भूमिका साकारणार आहे. अभिनेता संग्राम समेळ हा मालिकेचा प्रमुख नायक आहे. संग्राम समेळ आणि हर्षदा खानविलकर या दोघांना पुन्हा एकत्र पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. 

या मालिकेची नवीन झलक सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आली. या झलकमध्ये सासू आणि सुनेचं नातं, दोघींचे स्वभाव याचा अंदाज प्रेक्षकांना आलाच असेल. सासू आणि सून दोघींचं वेगळंच नातं दिसून येत आहे. सासूचं भूतकाळातील वागणं आणि सुनेचं वर्तमानकाळातील वागणं, तसेच सून लक्ष्मीचं रूप न घेता दुर्गेचं रूप का घेऊ पाहते हे जाणून घ्यायची प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे. अशी तोडीस तोड सासू -सुनेची जोडी क्वचितच बघायला मिळते. 

नुकतीच, ‘मुलगी पसंत आहे’ मालिकेची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी मालिकेतील कलाकार उपस्थित होते. मालिकेचे प्रोमो दाखवल्यावर उपस्थिती पत्रकारांनी, पाहुणे मंडळींनी मालिकेच्या संपूर्ण टीमचे कौतुक करत त्यांच्या नवीन प्रवासाला शुभेच्छा दिल्या. 

सुश्रुत भागवत दिग्दर्शित ‘मुलगी पसंत आहे’ या मालिकेची कथा आणि पटकथा लेखिका रोहिणी निनावे यांनी लिहिली आहे तर मृणालिनी जावळे यांनी संवाद लिहिले आहेत. संगीताची जबाबदारी निलेश मोहरीर यांनी पेलली आहे.

यशोधराची सून होऊन आराध्या अन्यायाच्या विरोधात उभी राहू शकेल का?, हे जाणून घेण्यासाठी नक्की पाहा ‘मुलगी पसंत आहे’ १५ जानेवारीपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता फक्त ‘सन मराठी’ वर.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

  India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026 IIJS Bharat – Signature 2026 to expected to ge...