श्रीलंका टुरिझमचे भारताला आमंत्रण स्वर्गापेक्षाही सुंदर ठिकाणी लग्न साजरे करा
श्रीलंकेने मल्टी-सिटी लक्झरी वेडिंग शोमध्ये यशस्वीरित्या दाखवून दिले आहे की त्यांचे बेट एक प्रीमियर वेडिंग डेस्टिनेशन आहे
श्रीलंका टुरिझमने डेस्टिनेशन वेडिंगसाठी आपले दरवाजे अधिकृतपणे उघडले आहेत, भारतीय जोडप्यांना आणि कुटुंबांना जगातील एका सर्वात चित्तथरारक ठिकाणी त्यांच्या आयुष्यातील सर्वात खास क्षण साजरा करण्यासाठी अतिशय आपुलकीचे आमंत्रण दिले आहे. या प्रसंगी, श्रीलंका टुरिझमने संपूर्ण भारतात मल्टी-सिटी लक्झरी वेडिंग शोच्या मालिकेची यशस्वी सांगता केली, ज्यांना अविस्मरणीय विवाह अनुभव हवा असतो अशा जोडप्यांसाठी हे बेट एक प्रमुख पर्याय कसे बनू शकते हे यामध्ये दाखवले गेले.
या शोकेसमध्ये श्रीलंकेतील आघाडीची हॉटेल्स, रिसॉर्ट्स, हेरिटेज साइट्स आणि वेडिंग सर्व्हिसेस प्रोव्हायडर्स, मोठमोठे भारतीय वेडिंग प्लॅनर, ट्रॅव्हल एजंट आणि मीडिया प्रतिनिधी सहभागी झाले होते. प्रत्येक कार्यक्रमात विशेष नेटवर्किंग सत्रे, तल्लीन करणारे अनुभव आणि खास तयार केलेल्या, अनोख्या लग्न संकल्पनांचा समावेश होता - पारंपारिक भारतीय समारंभ आणि आधुनिक लक्झरी उत्सव दोन्ही आयोजित करण्याची श्रीलंकेची अतुलनीय क्षमता यामध्ये दर्शविली गेली.
श्रीलंका टुरिझम प्रमोशन ब्युरोचे अध्यक्ष बुद्धिका हेवावासम यांनी सांगितले, “श्रीलंका आता डेस्टिनेशन वेडिंगसाठी खुले आहे आणि आम्ही भारताला आमच्यासोबत प्रेम साजरे करण्यासाठी आमंत्रित करत आहोत. संपूर्ण भारतातून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे आमचा विश्वास दुणावला आहे आहे की, श्रीलंका भारतीय जोडप्यांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण करेल. स्वच्छ, रम्य समुद्रकिनारे आणि चहाच्या तजेलदार मळ्यांपासून ते कोलोनियल वाड्या आणि ऐतिहासिक वारसा दर्शवणाऱ्या किल्ल्यांपर्यंत, हे बेट संस्मरणीय विवाह समारंभ आयोजित करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी इथे आहेत.”




No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST