इन्फिनिटी इन्फोवे लिमिटेडचा IPO 30 सप्टेंबर 2025 रोजी खुला होणार आहे
● एकूण इश्यू साईज – ₹10 दर्शनी मूल्यासह एकूण 15,75,200 इक्विटी शेअर्स
● IPO साईज – ₹24.42 कोटी (उच्च किंमत बँडवर)
● किंमत बँड – ₹147 ते ₹155 प्रति शेअर
● लॉट साईज – 800 इक्विटी शेअर्स
मुंबई, 23 सप्टेंबर 2025 – इन्फिनिटी इन्फोवे लिमिटेड (कंपनी, इन्फिनिटी) ही एक SaaS प्रदाता कंपनी आहे, जी कस्टमाइज्ड आणि इंटीग्रेटेड ERP (एंटरप्राइझ रिसोर्स प्लॅनिंग) सोल्युशन्स देण्यात माहिर आहे. शिक्षण, उत्पादन, रिटेल आणि कन्स्ट्रक्शन यांसारख्या क्षेत्रांतील ग्राहकांना ही कंपनी सेवा देते. कंपनीचा IPO मंगळवार, 30 सप्टेंबर 2025 रोजी खुला होणार असून ₹24.42 कोटी उभारण्याचा उद्देश आहे. हे शेअर्स BSE SME प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध केले जातील.
या इश्यूमध्ये ₹10 दर्शनी मूल्याच्या 15,75,200 इक्विटी शेअर्स असून किंमत बँड ₹147 ते ₹155 प्रति शेअर इतका आहे.
इक्विटी शेअर वाटप:
• QIB अँकर पोर्शन – 4,08,000 शेअर्सपर्यंत
• क्वालिफाइड इन्स्टिट्युशनल बायर्स (QIB) – 2,72,800 शेअर्सपर्यंत
• गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार (NII) – किमान 2,06,400 शेअर्स
• खाजगी / वैयक्तिक गुंतवणूकदार – किमान 4,79,200 शेअर्स
• कर्मचारी राखीव वाटा – 1,29,600 शेअर्सपर्यंत
• मार्केट मेकर – 79,200 शेअर्स
IPO मधून मिळणारा निधी यासाठी वापरण्यात येणार आहे: “ZEROTOUCH” नावाच्या मालकी तंत्रज्ञान सोल्युशनच्या विकासासाठी, नवीन IT इन्फ्रास्ट्रक्चर आणि सर्टिफिकेशनसाठी, टेंडर डिपॉझिट व अर्नेस्ट मनी डिपॉझिटसाठी (EMD), वाढीव वर्किंग कॅपिटलसाठी, आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट गरजांसाठी अँकर पोर्शन 29 सप्टेंबर 2025 रोजी खुले होईल आणि IPO 3 ऑक्टोबर 2025 रोजी बंद होईल. बुक रनिंग लीड मॅनेजर: होलानी कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड. रजिस्ट्रार: बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड
भवेशकुमार धीरजलाल गधेथरिया, प्रमोटर आणि मॅनेजिंग डायरेक्टर, इन्फिनिटी इन्फोवे लिमिटेड म्हणाले: "IT क्षेत्रातील 17 वर्षांहून अधिक अनुभवासह, इन्फिनिटी इन्फोवे लिमिटेडने शिक्षण, उद्योग व शासकीय संस्थांसाठी प्रभावी SaaS सोल्युशन्स देण्यात सातत्य दाखवले आहे. हा IPO आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, जो आमच्या सेवा आणखी बळकट करेल आणि विस्तारास गती देईल. आज आम्ही 38 विद्यापीठे आणि 11 उद्योग क्षेत्रांमध्ये आमची मजबूत उपस्थिती दर्शवत आहोत, आमच्या कॅम्पस मॅनेजमेंट सिस्टीम आणि इन्फिनिटी ईआरपी च्या माध्यमातून कार्यक्षमतेला चालना देत आहोत."
IPO मधून मिळणारी रक्कम ही आमच्या ‘ZEROTOUCH’ सोल्युशनच्या विकासासाठी, IT इन्फ्रास्ट्रक्चर आणि सर्टिफिकेशनमध्ये गुंतवणूक, तसेच टेंडर डिपॉझिट्स, EMD, आणि वर्किंग कॅपिटल वाढवण्यासाठी वापरण्यात येईल. आमच्या सिद्ध कौशल्य आणि समर्पित टीमच्या जोरावर आम्ही इन्फिनिटी इन्फोवेला नवीन उंचीवर घेऊन जाण्याचा आत्मविश्वास बाळगतो."
श्री. अशोक होलानी, डायरेक्टर, होलानी कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणाले: “भारताचे SaaS आणि EdTech क्षेत्र डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, ऑटोमेशन आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 सारख्या प्रगत सुधारांमुळे झपाट्याने वाढत आहे. 17 वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या इन्फिनिटी इन्फोवे लिमिटेड ने या संधी मिळवण्यासाठी मजबूत क्षमता
विकसित केल्या आहेत — विशेषतः त्याच्या कॅम्पस व्यवस्थापन प्रणाली, इन्फिनिटी ईआरपी, आणि AI-आधारित सोल्युशन्स च्या माध्यमातून. हा IPO कंपनीला नवोन्मेष वाढवण्यासाठी, IT पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी, आणि शिक्षण, उद्योग आणि सरकारी संस्थांमध्ये अधिक ग्राहकांना सेवा देण्यासाठी मदत करेल. भारताच्या डिजिटल विकासात योगदान देऊ शकणाऱ्या कंपनीच्या IPO प्रवासाचा भाग होण्याचा आम्हाला अभिमान आहे."
कंपनीविषयी इन्फिनिटी इन्फोवे लिमिटेड:- इन्फिनिटी इन्फोवे लिमिटेड ही एक SaaS प्रदाता कंपनी आहे जी ERP, EdTech, आणि एंटरप्राइज सॉफ्टवेअर सोल्युशन्स प्रदान करते. कंपनीकडे ₹5,555.17 लाखांचे ऑर्डर बुक आहे. कंपनी सध्या 38 विद्यापीठे, 11 उद्योग आणि शासकीय संस्थांना सेवा देते. मुख्य उत्पादने: कॅम्पस व्यवस्थापन प्रणाली, इन्फिनिटी ईआरपी (हिशेब व मानव संसाधन व्यवस्थापनासाठी) ही सिस्टीम शाळा, विद्यापीठे व लघु उद्योगांना सेवा देत असून विद्यार्थी माहिती व्यवस्थापन जसे हजेरी, गृहपाठ, परीक्षा वेळापत्रक व असाइनमेंट्स यांचे व्यवस्थापन करते.
इतर सेवा: एज्युकेशन ERP, AI-सक्षम बुद्धिमान कॅम्पस व्यवस्थापन, एआय-संयुक्त औद्योगिक ईआरपी (iERP), AI-आधारित ऑनलाइन परीक्षा प्रश्नपत्रिका वितरण प्रणाली (QPDS) व प्रॉक्टरिंग, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 शी सुसंगत डिजिटल लर्निंग. कंपनी ISO 9001:2015 आणि ISO 27001:2013 प्रमाणित आहे. आउटसोर्स मॅनपॉवर व ERP सपोर्ट सर्व्हिसेस मध्येही यशस्वी कामगिरी आहे.
FY25 मध्ये कंपनीचे आर्थिक प्रदर्शन: राजस्व (Revenue): ₹1,319.23 लाख EBITDA: ₹616.06 लाख नफा (PAT): ₹419.15 लाख
अस्वीकरण (Disclaimer): या दस्तऐवजात दिलेली काही विधाने ऐतिहासिक तथ्य नसून भविष्याभिमुख (forward-looking) विधाने आहेत. अशा प्रकारची विधाने काही जोखीम व अनिश्चिततेला अधीन असतात — जसे की सरकारी धोरणे, स्थानिक, राजकीय किंवा आर्थिक घडामोडी, तांत्रिक धोके इत्यादी — जे कंपनीच्या अपेक्षेपेक्षा भिन्न परिणाम दर्शवू शकतात. कंपनी अशा कोणत्याही विधानांवर आधारित कृतीस जबाबदार राहणार नाही आणि भविष्यातील घटनांनुसार ही विधाने सार्वजनिकरीत्या अपडेट करण्याची कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाही.


No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST