*सिग्निफाय तर्फे लालबागच्या राजाच्या चरणी इकोलिंग उर्जा बचत करणारी उपकरणे*
• मोठ्या प्रमाणावर उर्जा बचत करणारा थंडावा देऊन अंदाजे ४२०० युनिट्स विजेचा वापर
मुंबई, १४ सप्टेंबर २०२६- सिग्निफाय (युरोनेक्स्ट: लाईट) या लायटिंग क्षेत्रातील जगभरांतील आघाडीच्या कंपनी तर्फे त्यांचे उर्जा वाचवणार्या पंख्यांचे तंत्रज्ञान येत्या गणेश चतुर्थीला लालबागच्या राजाच्या चरणी आणले आहे. मुंबईतील गणेश भक्त हे बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रवास करत असतांनाच, इकोलिंक च्या हा एअरफ्लो फॅन्स ची जोडणी ही मांडवासह दर्शन रांगेत बसवल्याने आता त्यांचा दर्शनाचा प्रवास हा गारेगार आणि अधिक आरामदायक होणार आहे.
अनेक भक्त हे दर्शनाचा अनुभव घेण्यासाठी दूरवरुन येत असतात आणि रांगेत उभे राहून त्यांना गर्दीत वेळ घालवावा लागतो. इकोलिंक फॅन्स मुळे हा अनुभव अधिक चांगला होऊन दर्शनरांगेत उभे राहून गारव्याचा अनुभव घेऊ शकतील.
या जोडण्यांमध्ये चार इकोलिंक फॅन्सची मॉडेल्स असून यामध्ये एअरोज्वेल, एअरोट्रियो, एअरोक्रिस्टल आणि एअरोक्वॉड ३ बी आहेत. हे फॅन्स ब्रशलेस डायरेक्ट करंट (बीएलडीसी) तंत्रज्ञानाने युक्त आहेत. बीएलडीसी फॅन्स हे परंपरागत इंडक्शन मोटर्स फॅन्सच्या तुलनेत जे साधारणपणे ७५-८० वॉट्स उर्जेचा वापर करतात त्यांच्या तुलनेत ५० टक्क्यांपर्यंत बचत होते. दहा दिवस चालणार्या या महोत्सवात हे फॅन्स २४ तास सुरु राहतील आणि अंदाजे ४२०० युनिट्स वीजेचा वापर करतील. या बचत करणार्या पंख्यांच्या तंत्रज्ञाना चा उपयोग मोठ्या प्रमाणावर जनतेसाठी केल्या मुळे सणासूदीच्या दिवसात भक्तांसाठी आराम सुध्दा प्राप्त झाला आहे.
यावेळी बोलतांना सिग्निफाय ग्रेटर इंडियाच्या हेड स्ट्रॅटेजी ॲन्ड मार्केटिंग चे प्रमुख निखिल गुप्ता यांनी सांगितले “ गणेश चतुर्थी ला अनेक लोक एकत्र येतात आणि सिग्निफाय मध्ये आंम्हाला आमचे नाविन्य हे खर्या जीवनात आणून त्यांचा अनुभव देण्याची मोठी संधी प्राप्त झाली आहे. इकोलिंक बीएलडीसी फॅन्स मुळे आम्ही उर्जा बचत करणारा थंडावा लालबागचा राजा येथे आणून भक्तांचा दर्शनाचा प्रवास अधिक आरामदायक करु इच्छित आहोत.”
इकोलिंकची उपस्थिती लालबागच्या राजाच्या अनुभवाच्या महत्वपूर्ण विभागात विस्तारलेली आहे, यामध्ये संपूर्ण स्थळावर मोठे होर्डिंग्ज, ड्रॉप-डाउन्स, लिलिपुट्स आणि इतर दृश्यमान घटकांसारख्या ब्रँडिंग साधनांचा समावेश आहे. ही ब्रँड उपस्थिती इकोलिंकच्या ऊर्जा-कार्यक्षम कुलिंगच्या संकल्पनेला बळकटी देते, तसेच संपूर्ण मांडव आणि रांगेच्या ठिकाणी ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी अनेक संपर्क बिंदू निर्माण करते. इकोलिंकचा अनुभव स्थळाच्या पलीकडे नेण्यासाठी, अभ्यागतांना खरेदी करण्यासाठी वैयक्तिक हातातील पंखे देखील उपलब्ध असतील.
प्रत्यक्ष सहभागाचा एक भाग म्हणून, सिग्निफाय एक संवादात्मक उपक्रम आयोजित करेल, जिथे अभ्यागत "हवा चा राजा इकोलिंक" साठी किती मोठ्याने जयघोष करू शकतात हे आजमावून आकर्षक भेटवस्तू जिंकण्याची संधी मिळवू शकतील, ज्यामुळे महोत्सवातील इकोलिंकच्या उपस्थितीला आणखी एक अनुभव मिळेल.

No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST